Samsung: सॅमसंग कंपनीचा इतिहास
आज कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही की संपूर्ण जगामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानातील विविध विभागांमध्ये अग्रेसर असणारी सॅमसंग कंपनी (Samsung) म्हणजे १९३८ साली दक्षिण कोरियामध्ये एक साधे किराणा मालाचे दुकान होते. ज्याची स्थापना ली ब्यून्ग-चूल यांनी केली. त्यांचा मुख्य व्यवसाय नूडल्स, वाळलेले मासे, फळे आणि भाज्या या वस्तू त्यांच्या गावात व गावाच्या आसपासच्या गावांमध्ये पुरवण्याचा होता.
भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग १)
सॅमसंग कंपनीची स्थापना व विस्तार (Samsung: Establishment and expansion)
- सॅमसंग कंपनी चीनमध्येदेखील त्यांच्या वस्तूंची निर्यात करीत असत.
- १९५० च्या सुरुवातीला झालेल्या कोरियन युद्धानंतर श्री ली ब्यून्ग-चूल यांनी कोरियातील सर्वांत मोठा लोकरीचा कारखाना सुरु करून कापड व्यवसायाची सुरुवात केली.
- त्याकाळी कोरिया हा सर्वांत गरीब देशांपैकी एक होता आणि त्यावेळी श्री ब्यून्ग-चूल यांनी कारखानदारीवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात बराच हातभार लावला.
- त्या काळामध्ये, म्हणजे १९६० च्या दशकात, कोरियन सरकारने त्यांच्या देशातील मोठ्या कंपन्यांना विस्तार करण्यासाठी भरपूर सहकार्य केले, त्याला ‘चायबोल’ (chaebol) असे नाव दिले.
- अनेक कोरियन कंपन्या ‘चायबोल’ अंतर्गत मोठ्या झाल्या, विस्तारल्या, सॅमसंग त्यांपैकीच एक होती.
भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग २)
इलेक्ट्रॉनिक्सचा विभाग:
- १९६९ मध्ये सॅमसंगने त्यांच्या कंपनीतच इलेक्ट्रॉनिक्सचा एक छोटासा विभाग सुरु केला आणि तेव्हाच त्यांनी त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय लोगो लोकांसमोर आणला.
- सॅमसंग – Samsung या शब्दाचा अर्थ ‘३ तारे’ असा आहे आणि त्यांच्या पहिल्या लोगोमध्ये छोट्या आकारात ते दिसतही होते.
- सॅमसंग कंपनीने सुरु केलेल्या छोट्या इलेक्ट्रॉनिक्स विभागात त्यांनी त्यांचे सर्वांत पहिले उत्पादन केले ते ‘ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजन’चे.
- अशा प्रकारे सॅमसंग कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. त्यांनी याच्या निर्यातीची सुरुवात १९७१ साली ‘पनामा’ देशापासून केली.
- १९७० च्या दशकाच्या मध्यापर्यंत त्यांनी बऱ्याच विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन सुरु केले होते, यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजन्सच्या उत्पादनांसोबतच त्यांनी रंगीत टेलिव्हिजन्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु केले. त्यांच्या जोडीला रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स बनवण्यासाठीही ते प्रयत्नरत होते.
- काळाच्या ओघात आपण कुठेही मागे पडता काम नये हे उद्दिष्ट समोर ठेऊन, त्यांनी १९७० च्या काळात सॅमसंग जहाज बांधणी, सॅमसंग अवजड उद्योग आणि सॅमसंग प्रिसिजन कंपनी अशा अनेक कंपन्यांची सुरुवात केली. इतकेच नाही तर, सॅमसंग कंपनीने तेल उद्योगांमध्येही गुंतवणूक करण्यास प्रारंभ केला.
- १९९० च्या दशकात सॅमसंग मायक्रो चिप्स मधील अग्रेसर बनले, ज्याची सुरुवात १९७४ मध्ये त्यांनी हँकूक सेमीकंडक्टर नावाची कंपनी विकत घेऊन केली होती. ज्यासाठी त्यांना जगातील सेमिकंडक्टर बनवणाऱ्या अग्रेसर कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते.
- आजही, अँपलच्या बऱ्याच आयफोन्समध्ये सॅमसंगच्या मेमरी चिप्स वापरल्या जातात.
भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -“पिडीलाईट’ची यशोगाथा”(भाग १)
सॅमसंग – निर्यातीस प्रारंभ (Samsung – Export division):
- १९७० मध्ये सॅमसंगने त्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची इतर देशांमध्ये निर्यात करण्यास सुरुवात केली, १९७८ मध्ये त्यांनी त्याकाळात सर्वांत जास्त म्हणजे ४ दशलक्ष ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजन्स निर्यात केले. याच वर्षी त्यांनी त्यांच्या देशाबाहेर त्यांचे पहिले कार्यालय सुरु केले, ते ही अमेरिकेमध्ये.
- १९८० मध्ये ली यांनी टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील त्यावेळची मोठी कंपनी, ‘हॅंगूक जेओंजा टोंगसीन’ विकत घेतली आणि त्यांनी टेलीफोन्स, फॅक्स मशिन्स, स्विचबोर्डस यांचे उत्पादन सुरु केले.
- १९८४ साली त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या ‘व्हीसीआर’ची निर्यात अमेरिकेमध्ये केली.
- याच दरम्यान आता त्यांच्या कंपनीचे नाव बदलून ‘सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड’ असे केले. आज आपण जो कंपनीचा लोगो पाहतो तो १९९३ साली बनवला गेला आहे.
- या सर्वांसोबत सॅमसंग अत्यंत खराब प्रतीच्या उत्पादनांसाठी ओळखले जाऊ लागले. कोरियन बिझनेसचे प्राध्यापक, श्री चँग साई-जीन यांनी त्यांच्या ‘सोनी विरुद्ध सॅमसंग’ या पुस्तकात दिले आहे, की सॅमसंग कंपनीचा पंखा एका हाताने उचलायचा म्हणले तरी त्याची मान तुटते.”
१९३८ साली किराणा मालाच्या व्यवसायापासून सुरुवात केलेल्या या कंपनीने पुढे अनेक विविध क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. पण या सोबतच त्यांच्यावर त्यांच्या हलक्या दर्जाच्या उत्पादनांसाठी ताशेरेही मारले गेले. पण या सर्व संकटांवर मात करून सॅमसंगने जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांमधील एक असे आपले स्थान कसे निर्माण केले ते पुढील लेखात पाहूया.
भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – ‘पिडीलाईट’ची यशोगाथा (भाग २)
For suggestions and queries – Contact us: [email protected]
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Samsung Marathi Mahiti, Samsung Marathi, Samsung in Marathi, Samsung History in Marathi