अर्थसाक्षर Success Story सॅमसंग
Reading Time: 3 minutes

Success Story of Samsung

‘सॅमसंग’ कंपनीचा इतिहास या लेखामध्ये आपण कंपनीची सुरवात आणि त्यांनी विविध क्षेत्रात पसरलेले जाळे याबद्दल माहिती घेतली. आजच्या लेखात आपण सॅमसंग कंपनीची यशोगाथा (Success Story of Samsung) कशी सुरु झाली याबद्दल माहिती घेणार आहोत. 

सॅमसंग कंपनीने जरी विविध क्षेत्रात आपले जाळे पसरवले असले तरी ‘दर्जा’ या कारणामुळे त्यांच्या यशाच्या प्रवासात अडथळा येत होता. कालानंतरने त्यांनी यावरही मात केली आणि आपल्या यशाच्या प्रवासाला सुरुवात केली.

Samsung: सॅमसंग कंपनीचा इतिहास

Success Story : सॅमसंग कंपनीचा मेकओव्हर

  • १९८७ साली ली यांचा फुफ्फुसाच्या कर्करोगाने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर या एवढ्या मोठ्या सामाज्याची जबाबदारी त्यांचे पुत्र कून-ही याच्या खांद्यावर आली. 
  • ‘हलक्या दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी’ अशा नावलौकिकाला कंटाळून श्री कून-ही यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितले, “change everything except your wife and children”(‘तुमची पत्नी आणि मुले सोडून बाकी सर्व काही बदला’). त्यांच्या या वाक्याला त्यावेळी बरीच प्रसिद्धीदेखील मिळाली होती. 
  • कंपनीने त्यांच्या कार्यपद्धती, ब्रॅण्डिंग आणि चांगल्या प्रतीच्या तांत्रिक वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी बरेच बदल घडवून आणले. 

जेफ बेझोस आणि अमेझॉनच्या यशाचे रहस्य

Success Story : सॅमसंग कंपनीचे पुनर्बांधणीचे यशस्वी धोरण

  • सर्व काही सुरळीत चालू आहे असं  वाटत असताना सॅमसंगच्या इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंप्रमाणेच त्यांच्या प्रथम मोबाईल हॅंडसेट्स मध्येही अनेक दोष आढळले. 
  • त्यावेळी कून-हा यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या मोबाईल्सचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याला भेट दिली आणि तेथील त्यांच्या कर्मचारीवृंदाला १ ते १.५ लाख मोबाईल्स निकामी करण्यास सांगितले.
  • यानंतरच्या त्यांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रवासास “यशस्वी पुनर्बांधणीचा धोरणांचा धडा” असे संबोधले गेले. 
  • साहजिकच त्यांच्या या यशस्वी पाऊलाचा ठसा म्हणजे, १९९९ साली, त्यांनी जगातील सर्वांत पहिला MP3 फोन बाजारात आणला. 
  • त्यावेळी नोकिया ब्रँड मोबाईल हॅंडसेट्समध्ये अग्रेसर होता. तरीही सॅमसंग कंपनीने त्यांचे हॅंडसेट्स मधील संशोधन सुरूच ठेवले. 
  • याचा परिणाम म्हणजे २००२ मध्ये सॅमसंग जगातील पहिला SGH ११०० हा LCD डिस्प्ले असणारा अगदी कमी जाडीचा फोन घेऊन आले. ज्याला जगभरातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली. 
  • त्या काळात संपूर्ण जगामध्ये या फोनची १२ दशलक्ष हॅंडसेट्सची विक्रमी विक्री झाली. 
  • त्यावेळी, म्हणजे १९९० च्या दशकाच्या मध्येत, जेव्हा डिजिटल क्रांतीची नुकतीच सुरुवात झालेली असताना,   कून-ही यांनी अमेरिकेच्या पाऊलावर पाऊल न ठेवता, स्वतःचा स्वतंत्र मार्गच निर्माण केला आणि परिणामी  १९९८ साली सॅमसंग ने जगातील पहिला डिजिटल टीव्ही आणला. 

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -‘आयटीसी’ची यशोगाथा

Success Story : सॅमसंग कंपनीचा बांधकाम क्षेत्रात प्रवेश

https://bit.ly/3i1Rb5g
  • तांत्रिक क्षेत्रातील संशोधनासोबतच सॅमसंगने बांधकाम क्षेत्रातही प्रवेश केला आणि जगातील सर्वांत उंच इमारत संयुक्त अरब अमिरातीतील ‘बुर्ज खलिफा’, मलेशियामधील ‘पेट्रोनास टॉवर्स’ यांसारख्या मोठे बांधणी प्रकल्प मिळवले. 
  • सॅमसंग ग्रुपमधील काही महत्वपूर्ण नावे म्हणजे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, समसिंग सी अँड टी कॉर्पोरेशन, सॅमसंग हेवी इंडस्ट्रीज, सॅमसंग एस डी एस, सॅमसंग लिफे इंश्युरन्स, सॅमसंग फिरे अँड मरीन इंश्युरन्स इ. 
  • हलक्या प्रतीच्या उत्पादनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सॅमसंगला ली यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र कून-ही यांच्या नेतृत्वाने जगातील सर्वोत्कृष्ट कमान्यांमधील एक अशी ख्याती निर्माण करून दिली आणि त्यांच्या वडिलांचे सर्व क्षेत्रात अव्वल राहण्याचे स्वप्न कून-ही यांनी देखील विविध क्षेत्रात संशोधन व विकासाच्या आधारावर साध्य केले.

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -‘आयटीसी’ची यशोगाथा (भाग २)

इलेकट्रोनिक अप्लायन्सेस आणि स्मार्टफोन बनविणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांच्या यादीमध्ये आज सॅमसंग कंपनीचे नाव आदराने घेतले जात आहे. यशाच्या या प्रवासात सॅमसंगने अनेक चढ-उतारांचा सामना केला. हा प्रवास कंपनीसाठी नक्कीच सोपा नव्हता. भारतामध्ये स्मार्टफोनच्या स्पर्धेत यशाच्या शिखरावर असताना अचानक चायनीज स्मार्टफोन्सचे तगडे आव्हान सॅमसंग समोर निर्माण झाले होते. परंतु,  सध्या कोव्हीड-१९ मुळे  बदललेल्या परिस्थितीनंतर चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालणारे भारतीय पुन्हा एकदा सॅमसंगच्या स्मार्टफोनकडे वळले आहेत.

For suggestions and queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.