भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – ‘पिडीलाईट’ची यशोगाथा (भाग २)

Reading Time: 4 minutes

मागील भागात आपण “पिडिलाइटची” उत्पादने आणि त्याच्या यशस्वी प्रवासाबद्दल माहिती घेतली. या भागात आपण कंपनीचा इतिहास, डिस्ट्रिब्युशन नेटवर्क, जाहिरात धोरण व आर्थिक निकालांसंदर्भात माहिती घेऊया.

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -“पिडीलाईट’ची यशोगाथा”(भाग १)

कंपनीचा इतिहास-

 • पिडीलाईटचे ‘श्री.बळवंत पारेख‘ हे “फेविकॉल मॅन” म्हणून सर्वत्र ओळखले जात.  
 • बळवंत पारेख यांचा जन्म गुजरात मधील भावनगर जिल्ह्यातील महुआ नावाच्या छोट्या खेड्यात झाला होता. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी तिथेच घेतले आणि पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. गव्हर्नमेंट कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. कायद्याचे शिक्षण घ्यावे असा घरच्यांचा दबाव त्यांच्यावर होता. त्यांना मात्र सुरुवातीपासूनच उदयोजक व्हायचे होते. कायद्याची प्रॅक्टिस करायची का उद्योग उभारायचा या द्वंद्वात त्यांनी वकिली करायची नाही असे ठरवले. 
 • मुंबईमध्ये एका डाईंग व प्रिंटिंग प्रेस मध्ये त्यांनी कामगार म्हणून काम करायला त्यांनी सुरुवात केली. पुढे त्यांना एका लाकडाच्या व्यापाऱ्याकडे शिपाई म्हणून सुद्धा काम करावे लागले. सततच्या तंगीमुळे त्याच व्यापाऱ्याच्या गोदामात आपल्या पत्नीबरोबर त्यांना राहावे लागत होते. 
 • याच काळात मोहन नावाच्या गुंतवणूकदाराबरोबर बळवंत पारेख यांची ओळख झाली. बळवंत यांच्यातली क्षमता, उत्साह, व्यापारी उद्योजकता मोहन यांनी ओळखली आणि बळवंत यांच्या कल्पनांवर मोहन यांनी पैसे गुंतवायला सुरुवात केली. सुरुवातीला पश्चिमी देशांतून सायकल, सुपारी अशा वस्तूंची आयात-निर्यात व्यवसाय करण्यास सुरुवात केली. या व्यवसायातून त्यांना चांगला फायदा मिळायला लागला. 
 • हा सर्व स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा कालावधी होता. इतर देशांमधून वस्तू आयात करण्याऐवजी आपल्या मातृभूमीतच वस्तू निर्माण  करायला अनेक देशभक्त उद्योजकांनी सुरुवात केली. याच काळात बळवंत पारेख याना एका नवीन व्यवसायात संधी दिसली. 
 • सुतारकाम करणाऱ्या कारागिरांना लाकूड जोडताना बरच कष्ट घ्यावे लागत होते. प्राण्यांच्या चरबीपासून तयार होणारा ‘गोंद’ या जोडकामासाठी वापरावा लागत होता. घट्ट स्वरूपातील गोंद पातळ करण्यासाठी उकळावं लागत असे. यादरम्यान निर्माण होणाऱ्या घाणेरड्या वासाचाही त्यांना त्रास होत असे. 
 • सुतारांना होणार त्रास दूर करण्यात बळवंत यांना संधी दिसली. सिंथेटिक रसायने वापरून सहजासहजी वापरता येणार गोंद आपल्याला तयार करता येईल का याबाबत त्यांनी संशोधन केले. 
 • १९५९ मध्ये पांढऱ्या शुभ्र स्वरूपात असणाऱ्या सुगंधी गोंदाचे उत्पादन बळवंत पारेख यांनी ‘फेविकॉल’ या नावाने सुरु केले. FEVICOL या नावातील COL हा जर्मन शब्द आहे. COL चा अर्थ म्हणजे २ गोष्टी जोडणे.  ‘MOVICOL’ ही जर्मन कंपनी फेविकॉल सारखेच उत्पादन पूर्वीपासून बनवत होती. या नावातून प्रेरणा घेत ‘FEVICOL’ नाव उदयास आले. 
 • सुतारांचा भरपूर वेळ वाचत तर होताच त्याचबरोबर फेविकॉल वापरायला पण सोपे होते. फेविकॉल ‘रेडी टू युज’ होता यामुळे कुठल्याही प्रकारे तापवणे वगैरेचे  त्रास करावे लागत नव्हते. सर्वसामान्य सुतारांचा त्रास फेविकॉलमुळे दूर झाला होता.
 • अल्पावधीतच लोकांमध्ये फेविकॉल ब्रँड लोकप्रिय झाला. ग्राहकांच्या मागणीनुसार फेविकॉलने अनेक नवनवीन उत्पादने बाजारात आणली. 
 • बळवंत पारेख यांना २०१३ मध्ये देवाज्ञा झाली. सध्या पिडीलाईटचे चेअरमन श्री. मधुकर पारेख आहेत ते संस्थापक बळवंत पारेख यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले अमेरिकेत असून गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीची धुरा वाहतात. 

डिस्ट्रिब्युशन नेटवर्क-

 • फेविकॉलचे डिस्ट्रिब्युशन नेटवर्क ही कमालीचे होते. या काळात इतर स्पर्धक आपलं माल किरकोळ दुकानदारांना विकत असत व त्यांच्याकडून सुतार व इतर ग्राहक विकत घेत. थोडक्यात गोंद उत्पादक कंपनी व सुतार यांच्यात कुठलंही थेट संबंध नव्हता. 
 • पिडीलाईट इंडस्ट्रीजने प्रत्यक्ष सुतारांशी नाते प्रस्थापित केले व माल त्यांना विकायला सुरुवात केली. यामुळे आपले उत्पादन वापरणाऱ्या ग्राहकाला नक्की कोणत्या अडचणी येत आहे याबाबत पिडीलाईट इंडस्ट्रीजला माहिती मिळवायला सुरुवात झाली. उदा : वॉटरप्रूफ फेविकॉल तयार करणे यासारख्या आयडीया कंपनीला प्रत्यक्ष सुतारांकडूनच मिळाल्या.
 • बाजारातल्या मागणीनुसार नुसत्या फेविकॉलची उपउत्पादने कंपनीने पुढील प्रकारांमध्ये करून आपली विक्री व नफा वाढवत नेला आहे.  

 • लाकूड काम करणारे कारागीरच आपले मुख्य ग्राहक आहेत. ते मागतील तो माल दुकानदार विकतात हे ध्यानात घेऊन सुतारांशी पिडीलाईटने फक्त व्यावसायिक नातेच तयार केले नाही तर वैयक्तिक नटे तयार केले. यामध्ये सुतारांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे यासारखे विविध उपयोगी कार्यक्रम पिडीलाईटने घेतले. 
 • पिडीलाईट चे डिस्ट्रिब्युशन नेटवर्क खूप मोठे असून ६००० डिलर्सद्वारे ६ लाखापेक्षा जास्त रिटेलर्सला माल विकला जातो. 

जाहिरात धोरण: 

 • पिडीलाईटने सुरुवातीपासूनच ‘हटके’ गमतीशीर जाहिरातींना प्राधान्य दिले. ‘फेविकॉल’ ब्रँड इतका मोठा झाला की बॉलीवूडच्या गाण्यांमध्ये ‘फेविकॉल’ शब्दाचा वापर करण्यात आला. 

कंपनीचे आर्थिक निकाल :

 • पीडिलाइट ची आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी उत्पादन निहाय विक्री पुढीलप्रमाणे आहे : 

 • आर्थिक वर्ष २०१८-१९ पर्यंत कंपनीची विक्री पुढीलप्रमाणे होती:

 • आर्थिक वर्ष २००८-०९ ते आर्थिक वर्ष २०१८-१९ या १० वर्षांत पीडिलाइट ची विक्री १३% दराने (CAGR) वाढली आहे.    

आर्थिक माहितीबाबत 

 • तुम्हाला कंपनीचा वार्षिक अहवाल आणि इतर आर्थिक माहिती अभ्यासायची असेल, तर येथे क्लिक करा.
 • कंपनीचे गेल्या काही वर्षातील शेअर्सचे भाव बघण्यासाठी येथे क्लिक करा. 

अधिक अभ्यास करण्यासाठी काही नामवंत ब्रोकर्सचे रिसर्च रिपोर्ट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

– सी.ए. अभिजीत कोळपकर

(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून ते अर्थसाक्षरता अभियानात काम करतात. तसेच अर्थसाक्षरता अभियानाच्या कार्यशाळा घेतात). 

(या लेखमालेतील कंपनीच्या शेअर्समध्ये अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची उपलब्ध माहितीप्रमाणे कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच या कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात माहिती दिलेल्या कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *