Reading Time: 2 minutes

अर्थसाक्षर.कॉम या संकेत स्थळावर माझी “बाजाराची आगामी दिशा” या विषयावर लेखमाला सुरु झाली आहे. यामध्ये बाजाराची आधीच्या आठवड्यात झालेल्या हालचालीचा विचार करून, पुढील आठवड्यात बाजाराची हालचाल कशी असेल? यावर मी प्रकाश टाकणार आहे.

या लेखमालेच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे माझ्या लेखनाचा पाया हा तंत्र विश्लेषण (Technical Analysis) हा असणार आहे. या अभ्यासामध्ये पुढील आराखडे बांधताना, आधी कशाप्रकारे हालचाल झाली आहे,  हे विचारात घेतले जाते. तसेच काही गणितीय सूत्रे वापरून पुढील अंदाज बांधला जातात.

जस जसे तुम्ही लेख वाचाल, तस तशी तुम्हाला खात्री पटेल की, बाजार हा ठराविक टप्पे पार करतच पुढे-मागे होत असतो. या शास्त्राचा शोध साधारण ११९ वर्षापुर्वी म्हणजे १९०० साली लागला. अमेरिकेतील चार्ल्स डॉव यांना त्याचे श्रेय द्यावे लागेल.

आज ११९ वर्षानंतर सुद्धा त्यांनी सांगून ठेवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच बाजाराचे विश्लेषण करावे लागते. तसे केल्यास बऱ्यापैकी अचूक पद्धतीने बाजाराची किंवा शेअरची पुढील दिशा ठरविणे शक्य होते. माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज काल गोष्टी खूपच सोप्या झाल आहेत. पूर्वी तांत्रिक विश्लेषणासाठी लागणारे आलेख (charts) हाताने काढावे लागत होते. परंतु आता या गोष्टी एकदम सहज झाल्या आहेत.  

  • मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे इथे फक्त शेअर बाजार एवढाच विचार करून चालत नाही तर, बाकी ज्या गोष्टींचा शेअर बाजारावर परिणाम होतो त्याही विचारात घेऊन अभ्यास करावा लागतो. यानुसार येणाऱ्या पुढील वाटचालीचा विचार करण्याअगोदर थोडेसे मागे वळून बघणे आवश्यक आहे.
  • गेल्या आठवड्यात जेव्हा मी लेख लिहिला होता, त्यात मी अस म्हटल होत की,
    • सद्य स्थितीत तेजी वाल्यांना धोक्याची चिन्हे नाहीत.
    • बाजारामधे कमजोरी येण्यासाठी ११७५० ही पहिली पातळी तोडून खाली जाणे आवश्यक आहे. आणि तसे झाल्यास ११५०० या पुढील पातळीच्या दिशेने बाजाराची वाटचाल होईल असेसुद्धा सांगितले होते.
    • प्रत्यक्ष बाजाराची पातळी बघता बाजार खाली ११७६९ या पातळी पर्यंत गेला होता. तसेच, मी असे सुद्धा म्हटले होते की, बाजार अजून मजबूत होण्यासाठी किंवा तेजी येण्यासाठी बाजाराला १२००० या पातळीच्यावर टिकून राहणे महत्वाचे ठरेल. तसे झाल्यास त्याची पुढील पातळी १२२००-१२३०० ही दिसू शकेल. त्याप्रमाणे बाजार १२००० च्या पातळीवर गेला नाही आणि खाली आला.
    • चलन बाजाराचा विचार करता रुपया ६९.२७ अमेरिकन डॉलरच्या तुलनेत वर गेला आणि त्याने ६९.६७ ही खालची पातळी गाठली. इथे एक गोष्ट विचारात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊन सुद्धा रुपया फार मजबूत झालेला दिसत नाही. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची किंमत सुद्धा थोडी कमी झाली होती.
  • आता पुढील काळाचा विचार करता –
    • बाजार तेजीत टिकून राहण्यासाठी बाजाराला ११८०० ही पातळी टिकवून ठेवणे महत्वाचे राहील. तसे न झाल्यास आणि दोन दिवस बाजार ११८०० या पातळीच्या खाली आल्यास ११५०० ही पुढील पातळी दिसू शकेल.
    • बाजाराची वरच्या दिशेने आगेकूच सुरु राहण्यासाठी त्याला १२००० या पातळीच्या वर दोन दिवस टिकून राहणे आवश्यक आहे. तसे झाल्यास १२२००-१२३०० ही पुढची पातळी दिसू शकेल.
    • चलन बाजाराचा विचार करता पुढील वाटचालीमध्ये रुपया मजबूत होण्यासाठी रुपयाला ६९ ही पातळी ओलांडून जाणे गरजेचे आहे. तसे झाल्यास रुपया ६७ पर्यंत वर जाऊ शकेल. रुपयामध्ये कमजोरी दिसण्यासाठी रुपयाला ७१.२५ ही पातळी तोडून खाली जाणे गरजेचे आहे. तसे झाल्यास रुपया ७३ पर्यंत कमजोर होऊ शकेल.

बाजाराच्या वाटचालीचा विचार करता, सद्य स्थितीत तेजीवाल्यांना धोका असण्याची चिन्हे दिसत नाहीत.

– मंदार दात्ये

98690 42683.    

[email protected]

(सुचना :- बाजाराचे इथे प्रकाशित होणारे विश्लेषण हे केवळ लोकांच्या माहितीसाठी देत आहे. हे विश्लेषण म्हणजे खरेदी विक्रीचा सल्ला नाही. खरेदी विक्री करून कोणाचे नुकसान झाल्यास  त्यास गुंतवणूकदार स्वतः जबाबदार असेल. शेअर संदर्भातील शंका अथवा अधिक माहितीकरता मला वरील मोबाईल क्रमांकावर अथवा ईमेल आयडीवर संपर्क करू शकता. )

शेअरबाजारः DHFL चे महाभारत,

शेअर बाजार – मनी वसे ते सत्यात दिसे

शेअर्स खरेदीचं सूत्र,

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.