Reading Time: 3 minutes

भयकथाकार नारायण धारपांची ‘पानघंटी’ नावाची एक कथा आहे.

कथेतील पटकथा लेखक श्री शामराव देसाई एकदा सर्व खलनायकांचा मेरुमणी ठरेल असा, काळाकभिन्न, निखाऱ्यासारखे डोळे असलेला, कपटी, कावेबाज, कारस्थानी खलनायक ‘पानघंटी’ रंगवतात.

पण पुढे तो खलनायक काल्पनिक नसून खरा आहे. श्री देसाईंवरच नाराज आहे. सूड उगविण्याचा प्रयत्न करीत आहे असे भास त्यांना (श्री देसाई) होऊ लागतात.

सिनेमागृह असो, नदीकिनारी फिरताना असो, की घरी…

‘पानघंटी’ आपल्या मागावर आहे या अनामिक भीतीने ते मानसिक तणावाखाली येतात.

शेवटी एके दिवशी घरांतच हृदयविकाराने निःष्प्राण झालेला त्यांचा देह आढळतो.

अर्थांत मुळ कथेंत लेखक धारपांनी शामराव देसाईंना मदत करणाऱ्या पात्रांच्या करवी असे का होते? याचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरणही दिले आहे…

‘मन’ हे जेथे आपल्या श्लोक भारुडांपसुन कथा कादंबऱ्यापर्यंतचा सर्वव्यापी विषय आहे. तेथे बाजार आणि मनाचा संबंध नाही, असे कसे शक्य आहे??

  • बाकी ठिकाणी निदान ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ असे तरी असते. बाजारात मात्र ‘पानघंटीच्या’ कथेप्रमाणे ‘मनी वसे ते सत्यात दिसे’ अशी परिस्थिती असते.
  • अधिक सोपे करुन सांगायचे तर कोणत्याही तेजीचे अंकुर अथवा मंदीचा भयगंड काही कारणाने (मग ती रास्त असोत अथवा अनाठायी) आधी गुंतवणुकदारांच्या मनात रुजतो. त्या भावना मग खरेदी /विक्रीच्या क्रियेतून बाजारात परावर्तीत होतात आणि अंततः तेजी मंदीचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येतो.
  • मानवी मनाचा आणखी एक कंगोरा म्हणजे त्याला ‘आज काय झाले??’ यापेक्षाही ‘उद्या, परवा, भविष्यात काय होणार??’ हे जाणुन घेण्यांत जास्त रस असतो. आणि गोष्ट शेअर बाजाराची असेल तर मग विचारायलाच नको.
  • बाजाराची भावी दिशा अथवा कल ओळखण्याकरिता तांत्रिक विश्लेषणावर (Technical Analysis) अवलंबुन असणाऱ्या मंडळीचे एक सोपे, लोकप्रिय आणि प्रभावी साधन म्हणजे वेगवेगळ्या काळातील सरासरी भावांची ( Moving Averages) तुलना.
  • जेव्हा भावाच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा अल्पकालीन सरासरी जास्त दिसू लागते. विश्लेषक याचा अर्थ बाजारांत तेजीचे वातावरण तयार होऊ लागले आहे असा घेतात.
  • याउलट भावाची अल्पकालीन सरासरी खाली जाऊ लागल्यास तेजीवाल्यांकरिता ती मंदीची सुचना असते. (यामागचा तर्क समजणे विशेष अवघड नसावे).
  • बाजाराच्या तांत्रिक परिभाषेत या संदर्भांत दोन लक्षवेधी संज्ञा आहेत, ‘गोल्डन क्रॉस’ (Golden Cross) आणि ‘डेथ क्रॉस’ (Death Cross).
    • सर्वसामान्यतः एखाद्या आलेखाच्या २०० काळांच्या सरासरीला ५० काळांची सरासरी ज्याक्षणी मागे टाकते त्या छेदबिंदूला (Cross) तेजीच्या सुरवातीचा ‘सुवर्णक्षण’ या अर्थी ‘गोल्डन क्रॉस’ असे संबोधतात.
    • आणि जेव्हा अशी पुढे गेलेली ५० काळांची सरासरी कधीतरी परत घसरु लागते आणि २०० काळांच्या सरासरीच्या खाली जाते. ‘तेजीची मृत्युघंटा’ या अर्थी ‘डेथ क्रॉस’ असा शब्द प्रचलित आहे.
  • क्रॉसचे (Cross) प्रवचन सांगायचे कारण हे की ०२ मे २०१७ नंतर प्रथमच, गेल्या आठवढ्यांत २२ मे रोजी, आपल्या ‘NIFTY MIDCAP 100’ या निर्देशांकांत ‘गोल्डन क्रॉस’ची स्थिती पहायला मिळाली (50 SMA – 17,772.8 200 SMA 17,670.84).
  • दुर्दैवाने माझ्याकडे ‘NIFTY MIDCAP 100’ चा मागचा तपशील लगेच तयार नाही. परंतु ‘निफ्टी’ आणि ‘गोल्डन क्रॉस’ यांच्या संदर्भात सांगायचे झाल्यास-
    • निफ्टीबाबत असाच ‘गोल्डन क्रॉस’ १५ मार्च २०१९ रोजी (भाव ११,४२७) झाला आहे..
    • ७ जुलै २००३ पासून, म्हणजे गेल्या जवळजवळ १६ वर्षांत निफ्टीबाबत एकुण १० वेळा असे ‘गोल्डन क्रॉस’ पहायला मिळाले.
    • या१५/१६ वर्षांत प्रत्येक वेळी असा ‘गोल्डन क्रॉस’ होताक्षणीच निफ्टी विकत घेतला. असे गृहित घरल्यास पुढील एका वर्षांत झालेला सरासरी फायदा १९.५२% आहे. (अत्यल्प नुकसान झाल्याचे एक / दोन प्रसंगही यात अंतर्भुत आहेत.)
  • अभ्यासकांच्या दृष्टिने ‘गोल्डन क्रॉस’ हा ‘कपिला षष्ठीचा योग’ असतो तो काही उगीच नव्हे. अर्थांत कितीही झाले तरी हे निकष हे केवळ अंदाज मात्र असतात, एखादी गोष्ट घडेलच याची हमी नव्हे, ही जाणीव असायलाच हवी.

‘लबाडाघरचे आवताण ..जेवल्याशिवाय खरे नाही’, या ग्रामिण म्हणीप्रमाणेच, तज्ज्ञ लोकांचे अंदाज…घडतील तेव्हाच खरे हे आहेच. पण असे असले तरी आज निदान ‘आवताण तरी आले’, याचा आनंद साजरा करायला काय हरकत आहे??

– प्रसाद भागवत

९८५०५०३५०३

(महत्वाची सुचना- ही पोस्ट केवळ माहिती म्हणूनच दिली आहे. कोणत्याही खरेदी किंवा विक्रीची शिफारस म्हणून नाही.)

अर्थसाक्षरद्वारे प्रकाशित होणाऱ्या पुस्तक प्रकाशनाच्या कामात आम्हाला आपलं मोलाचं सहकार्य आवश्यक आहे.  यासाठी फक्त खालील लिंकला क्लिक करून त्यावरील फॉर्म भरून आम्हाला लेखांच्या निवडीसाठी मदत करा.

                  लिंक : http://bit.ly/Question_Form

(अधिक माहितीसाठी आम्हाला [email protected] वर संपर्क करा.)

शेअर्स खरेदीचं सूत्र,

 शेअर्सची पुनर्खरेदी (Shares buybacks) ,

शेअर्सची साधी बदलती सरासरी,

शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…