Reading Time: 3 minutes

घर खरेदीसाठी घेतलेले कर्ज हा दीर्घकालीन जबाबदारीचा भाग आहे. गृह कर्ज घेणे म्हणजे तुमच्याच स्वप्नपूर्तीसाठी केलेली एकप्रकारची तडजोड आहे. सध्याच्या वाढत्या व्याजदराचा अंदाज घेतला तर दिवसेंदिवस कर्जाची परतफेड करणे कठीण होत आहे. कर्ज परतफेड म्हणजे सामान्य माणसाचा खिसा रिकामा होत जाण्यासारखा आहे !

गृह कर्जाची परतफेड करण्यासाठी आपण प्रोव्हिडंड फ़ंडातल्या पैशाचा म्हणजे ईपीएफचा उपयोग करू शकतो का? आजच्या लेखात आपण याबद्दल माहिती करून घेऊया. (PF Account to repay home loans in Marathi)

  • होय, ईपीएफ सेक्शन 68BB नुसार,गृहकर्जाच्या परतफेडीसाठी आपण ईपीएफ अकाउंट मधील रक्कमेचा उपयोग करू शकतो. 
  • घराचा मालकी हक्क वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या पीएफ अकाउंट असणाऱ्या व्यक्तीच्या नावावर असणे आवश्यक आहे.
  • ईपीएफ मध्ये तुमचे कमीत कमी दहा वर्षे योगदान असणे गरजेचे आहे.
  • तुमच्या नोकरीचे पाच वर्ष पूर्ण झाले असल्यास ईपीएफ मधील रक्कम काढायची असेल तर त्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही.

ईपीएफ ची रक्कम कुठे आणि कशी वापरू शकता ?  (how and how much amount you can use) 

  • गृह खरेदीसाठी डाऊन पेमेंट करताना तुम्ही ईपीएफ ची रक्कम वापरू शकता. 
  • ईपीएफ अकाउंट मध्ये असणाऱ्या रकमेपैकी 90% रक्कम तुम्ही डाऊन पेमेंट किंवा कर्ज परतफेड साठी वापरू शकता. 
  • उदाहरणार्थ, समजा तुमच्या ईपीएफ अकाउंट मध्ये Rs.10 लाख असतील  तर तुम्ही Rs.9 लाख रुपये पर्यंत रक्कम कर्ज परतफेड किंवा डाऊन पेमेंट साठी वापरू शकता. 

प्लॉट खरेदीसाठी : (for buying plots )

  • ईपीएफ चा वापर प्लॉट खरेदीसाठी करत असाल तर तुमचा 24 महिन्याचा  पगार + महागाई भत्ता 

किंवा प्लॉट ची किंमत या दोन्ही पैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम तुम्ही अकाउंट मधून काढू शकता. 

प्लॉट घेऊन घर बांधणी करताना ईपीएफ मधून हप्त्याने पैसे काढू शकतात.  यामध्ये पहिला हप्ता मिळाल्या नंतर सहा महिन्यांमध्ये घराचे बांधकाम सुरू होणे आवश्यक असते. तसेच हे बांधकाम बारा महिन्यांमध्ये पूर्ण होणे आवश्यक असते.  

बांधून तयार असलेले घर खरेदीसाठी : (for buying ready to move home)

  • ईपीएफ चा वापर बांधून तयार असलेले घर खरेदी करण्यासाठी करत असाल तर तुमचा 36 महिन्याचा पगार + महागाई भत्ता किंवा घराची किंमत या दोन्ही पैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम तुम्ही अकाउंट मधून काढू शकता. 
  • ईपीएफ ची रक्कम काढल्यानंतर सहा महिन्याच्या आत घर खरेदी करणे आवश्यक असते. 
  • ईपीएफ ची रक्कम गृह कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरायची असल्यास तुम्ही घेतलेले कर्ज हे नमूद केलेल्या संस्थेपैकी असणे आवश्यक आहे. 
  • नॅशनलाईज बँक
  • रजिस्टर को-ऑपरेटिव्ह बँक
  • सार्वजनिक वित्तीय संस्था 
  • राज्य गृहनिर्माण संस्था 
  • महानगरपालिका 
  • महाराष्ट्र शासन 
हे ही वाचा : गृहकर्ज परतफेडीचे विविध पर्याय

प्रोव्हिडंड फ़ंडातून पैसे काढण्याचे काही फायदे व तोटे : (EPF pros and cons)

  • ईपीएफ ची मोठी रक्कम म्हणजे एक भक्कम आधार मानला जातो, त्यामुळे निवृत्तीनंतर तुम्ही निश्चिंत राहू शकता.   
  • ईपीएफ मधील रक्कम ही दीर्घकालीन सुरक्षितता ठेव समजली जाते, त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींसाठी ही रक्कम बाजूला काढून ठेवणे हिताचे असू शकते,त्यामुळे इतर पर्याय उपलब्ध असतील तर त्याचा विचार आधी करावा.  
  • ईपीएफ चा व्याजदर जर तुमच्या बाकीच्या फिक्सड डिपॉझिट किंवा पीएफ च्या व्याजदरापेक्षा जास्त असेल तर इतर पर्यायाचा विचार करणे योग्य ठरेल. 
  • ईपीएफ खात्यातून तुम्ही एकदाच एकरकमी पैसे काढू शकता किंवा हप्त्यांमध्ये पैसे काढू शकता. 
  • ईपीएफ चा व्याजदर लक्षात घेता, ईपीएफ च्या रक्कमें मधून गृह कर्जाची परतफेड केली तर भविष्यात घराच्या गुंतवणूकीतून मिळणारा नफा जास्त असेल तर नक्की या पर्यायाचा विचार योग्य ठरेल.मात्र या उलट घराच्या गुंतवणुकीचा मोबदला जर ईपीएफ खात्याच्या व्याज दरापेक्षा कमी असेल तर ही ठेव बाजूला ठेवणे सोयीचे ठरेल.  
  • तुम्ही तुमच्या वैयक्तिक खर्चासाठी ईपीएफ अकाउंट मधील पैसे वापरू शकत नाही. तुम्ही ईपीएफ च्या माध्यमातून ज्याना हे पैसे वळते करणार आहे त्याचे बँकेची माहिती आधीच तुम्हाला फॉर्म मध्ये भरावी लागते. 
  • त्यामुळे बँक किंवा बिल्डर यांची माहिती दिल्यावर त्याच्या अकाउंट ला पैसे वळते केले जातात. 

इन्कम टॅक्स  बेनिफिट : (income tax benefit )

  • ईपीएफ खात्यातून तुम्ही ५ वर्ष जर कुठलीही रक्कम काढली नसेल तर तुम्ही सहजपणे ही रक्कम काढू शकता आणि तुम्हाला मिळणारी रक्कम ही करमुक्त असते.
  • मात्र त्या रकमेवर तुम्हाला जी काही व्याजाची रक्कम मिळाली आहे ती करास पात्र असते. 
महत्वाचे : Interest on Home Loan: तुम्ही तुमच्या गृहकर्जाची परतफेड करताना व्याजच अधिक भरताय?

निष्कर्ष  : 

  • घराच्या कर्जाची परतफेड करताना ईपीएफ चा नक्कीच उपयोग होऊ शकतो, वरील सर्व गोष्टीचा काळजीपूर्वक अभ्यास करून ,व्याजदर तपासून योग्य तो निर्णय घेणे हितावह ठरेल.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…