आरोग्य विमा
https://bit.ly/2HJSZ6q
Reading Time: 3 minutes

आरोग्य विमा घेताना

आपल्या देशात सर्वाना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळत नाही. अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी केवळ 1% च्या आसपास रक्कम आरोग्य सेवांवर खर्च केली जाते. 135 कोटी जनतेतील अत्यंत गरीब अशा केवळ 10 कोटी लोकांना शासनाकडून प्रति कुटूंब 5 लाखाचा आरोग्य विमा मिळण्याची तरतूद सध्या आहे. त्यास ‘राष्ट्रीय स्वास्थ विमा योजना’ असे नाव असून याचे लाभार्थी कोण याची पात्रता निश्चित करून  यासाठी लागणारा प्रीमियम सरकार सरकार देत असल्याने त्याचा कोणताही भार या लोकांवर पडत नाही. याहून थोड्या वरच्या स्तरावरील लोकांना विकसीत देशात राहून वेगाने काम करणे हे अधिकाधिक तणावपूर्ण बनत चालल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. 

हे नक्की वाचा: Insurance Repository: विमा भांडार म्हणजे काय? 

आरोग्य संजीवनी योजना

  • 1 एप्रिल 2020 पासून आयआरडीए सर्व जनरल इन्शुरंस कंपन्यांना सर्वाना परवडेल, समजायला सोपी असेल अशी सर्वसमावेशक अशी ‘आरोग्य संजीवनी योजना’ या नावाने आरोग्यविमा योजना आणण्याचे आदेश दिले ही योजना फक्त ऑनलाईन घेता येते. 
  • ती सर्वाना उपलब्ध असून अत्यंत उपयोगी आणि अन्य योजनांच्या तुलनेत कमी खर्चिक आहे.
  • तिचा लाभ व्यक्तिगतरित्या अथवा सर्व कुटुंबासाठी अशा दोन्ही प्रकारे घेता येतो. 
  • 1 लाख ते 5 लाख रुपयांचे  50 हजार रुपयांच्या पटीत अधिक रकमेचे सुरक्षा कवच आपल्याला घेता येईल. मात्र याचा पुरेसा प्रसार आणि प्रचार होत नसल्याने दुर्लक्षित राहिली आहे. 
  • विविध आस्थापना ही आपले कामगार व त्यांचे कुटुंबीय यांना आता ही सुविधा पुरवू शकतात.   

आरोग्य विम्याची गरज 

  • आरोग्य विमा योजनेचे सुरक्षा कवच आपल्याला व आपल्या कुटुंबातील सर्वाना हवे याची जाणीव फारच थोड्या लोकांना असते. त्यामुळेच स्वतःहून आरोग्यविमा घेणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. 
  • गंभीर आजाराचे मोठे संकट क्षणार्धात आपली अनेक वर्षे जमा केलेली पुंजी नष्ट करू शकते.  
  • हृदयविकार व मधुमेह यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. श्वसनरोग, संसर्गजन्य रोग यांच्याशीही अनेकांना सामना करावा लागतो. 
  • यामुळे मध्यम आर्थिक स्तरातील लोकांना सातत्याने वाढत असलेल्या आरोग्य खर्चाशी सामना करण्यासाठी आपला आरोग्यविमा असणे गरजेचे आहे. असा विमा वेगवेगळ्या मार्गाने घेता येऊ शकतो. 
  • आपण वैयक्तिकरित्या स्वतःसाठी, कुटूंबासाठी एकत्रितरित्या अथवा खास घरातील जेष्ठ नागरिकांसाठी त्याचप्रमाणे आपल्या मालकाने दिलेली सुविधा, विशिष्ट गंभीर आजाराचे संरक्षण करणारी विशेष योजना त्याचप्रमाणे आजारी पडल्यास बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई देणारी योजना अशा प्रकारे असू शकते. 
  • हा खर्च भागवण्यासाठी अनेकदा कर्ज घ्यावे लागते किंवा मालमत्ता विकावी लागते. 
  • अनेक लोक केवळ करात सूट मिळते एवढ्याच कारणाने आरोग्य विमा घेणे पसंत करतात. 
  • हा एक विशिष्ट कालावधीचा, सर्वसाधारणपणे एक वर्षाच्या कालावधीचा करार असल्याने त्यात मान्य केलेल्या अटी शर्तीनुसार तो लागू होतो. 
  • त्यासाठी रक्कम घेतली जाते अशी घटना न घडल्यास घेतलेली रक्कम परत मिळत नाही. कदाचित याचमुळे अनेकांना यातून काय मिळते? असा प्रश्न पडतो. त्यांना हे समजत नाही की यासाठी मोजलेली रक्कम ही आपल्या आरोग्याची किंमत असून आपल्याला या सोयीचा वापर करावा न लागणे म्हणजे आपले आरोग्य उत्तम असणे होय. 
  • कराराची मुदत वाढवण्यासाठी दिलेल्या मुदतीतच म्हणजे पॉलिसी संपल्यावर 30 दिवसाच्या आत नवीन करार करावा लागतो. त्यासाठी पुन्हा ठराविक रक्कम द्यावी लागते. 
  • मुदत संपल्यावर आपण नूतनीकरण केले नसेल, तर या काळातील खर्चाची भरपाई मिळत नसल्याने मुदतीपूर्वी नूतनीकरण करून घ्यावे. 
  • हे नूतनीकरण आता ऑनलाईन करण्याची सोय उपलब्ध आहे अथवा जवळील कोणत्याही शाखेत जाऊन आपण ते करू शकतो. 
  • वास्तविक असा करार वेळेत केल्याने आपण अथवा आपल्या कुटुंबास काही आजार झाल्यास त्यावरील संभाव्य खर्चाबाबत आपण चिंतामुक्त राहू शकतो. 
  • याशिवाय आपण वर्षभरात कोणताही भरपाई/ मागणी केली नसेल, तर त्याबद्दल मिळणाऱ्या बोनस करिता पात्र होतो. 
  • हा बोनस दोन प्रकारे, प्रिमियममध्ये सूट अथवा आरोग्य विमा मर्यादेत वाढ अशा प्रकारचा असू शकतो.
  • 70% भारतीय लोकांना कधीतरी आपली पूर्ण जमापुंजी गंभीर आजारासाठी खर्च करावी लागते, तर प्रतिवर्षी 3.2% लोक हे केवळ आरोग्यावर करायला लागणाऱ्या खर्चामुळे दारिद्र्यरेषेखाली ढकलले जातात असा जागतिक आरोग्य संघटनेचा सन 2017 चा अहवाल म्हणतो.

महत्वाचे लेख:  तुम्हाला विमा भेट कार्डबद्दल माहिती आहे का?

कॉर्पोरेट विमा 

  • अनेक व्यक्ती व त्यांचे कुटुंबातील सदस्य याना ते काम करीत असलेल्या आस्थापनेकडून आरोग्यविमा मिळतो. 
  • आजकाल अनेक जण एकाच ठिकाणी फार कमी काळ काम करतात. जर नोकरी बदलली तर आपल्याला मिळत असलेल्या सोई रद्द होतात. 
  • केवळ आरोग्य विमा मिळतो एवढ्याच कारणासाठी आहे ती नोकरी चालू ठेवून आपली उज्वल भविष्याची संधी आजकाल कोणी सोडणार नाही. त्यामुळेच आपल्या कंपनीकडून जरी आरोग्य विमा असेल तरी त्यातून आपल्या कुटुंबातील कोणाचा समावेश होतो कोणाचा नाही. 
  • विमा संरक्षण एकत्रिक आहे की सामायिक आहे त्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे ते पाहून घ्यावे.
  • यात समावेश न होणाऱ्या गोष्टीसाठी स्वतःचा वेगळा आरोग्य विमा असणे अत्यंत गरजेचे आहे.  यात जरुरी प्रमाणे टॉप अप करून संरक्षण वाढवणे यासारख्या सोई असाव्यात. 
  • अपुऱ्या निधीअभावी उपचार योजनांबाबत तडजोड करायाला लागू शकते त्यामुळे पुरेसा आरोग्य विमा आपण गावात, शहरात की महानगरात राहतो त्याप्रमाणे आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 2 ते 4 पट असणे गरजेचे आहे.

हे नक्की वाचा: नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन

विमा क्लेम 

  • विमा कंपनीकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 100 जणांनी आरोग्यविमा घेतला तर त्यातील  8% हून किंचित अधिक लोकांकडून विमा दावा उपयोगात आणला जातो.  
  • याचाच अर्थ असा की 12 वर्षात आपल्याला कधीतरी त्याचा उपयोग पडण्याची शक्यता जास्त असते.
  • आरोग्यविमा लवकरात लवकर घेणे कधीही चांगले जसजसे वय वाढेल तसे वेगवेगळ्या आजारांची शक्यता वाढते त्यामुळे मग असा काही आजार झाल्यावर नंतर पॉलिसी मिळवण्यात अडचणी येतात. 
  • असलेला आजार आणि त्याचा परिणाम होऊन येणारे आजार याचे दावे कंपनीनुसार 24 ते 48 महिने स्वीकारले जात नाहीत. 
  • आपली गरज लक्षात घेऊन पॉलिसी घ्यावी अनेक कंपन्या काही विशिष्ट आजारांवरील उपचारासाठी मर्यादा घालतात. त्याची कमाल मर्यादा कोणती ते माहिती करून घ्यावे याहून अधिक खर्चाची भरपाई कंपनीकडून केली जात नाही. 
  • काही पॉलिसी डिलिव्हरी खर्च देत नाहीत, तर काही ठिकाणी आपले आधीच्या आजारामुळे थोडा खर्च करण्याची जबाबदारी आपल्यावर टाकतात हे लक्षात ठेवावे. 

आरोग्य विमासंदर्भातील अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

– उदय पिंगळे 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.