STF
https://bit.ly/3rlPhAX
Reading Time: 3 minutes

SFT: विशेष आर्थिक व्यवहार

आजच्या लेखात आपण विशेष आर्थिक व्यवहार आणि त्याच्या सांकेतांकांबद्दल म्हणजेच Statement Of Financial Transactions (SFT) बद्दल माहिती घेणार आहोत.

व्यक्तीने केलेले मोठे व्यवहार, त्यासाठी वापरलेला पैसा कायदेशीर मार्गाने मिळवलेला आहे का, याची पडताळणी आयकर खात्याकडून होत असते. अधिकाधिक लोक आयकर खात्याच्या कक्षात यावेत व सर्व व्यवहार पारदर्शक पद्धतीने व्हावेत असा यामागील हेतू असतो. 

  • आर्थिक व्यवहार करताना वैध स्रोत सांगता न आल्यास ते व्यवहार करणारी व्यक्ती अडचणीत येऊ शकते. यामुळेच असे मोठ्या रकमेचे व्यवहार हे विशेष आर्थिक व्यवहार असे समजण्यात येतात.  
  • या व्यवहाराशी संबंधित व्यक्ती,वित्तीय संस्था, महसूल विभाग यांची असे व्यवहार झाले असल्याची माहिती आयकर विभागास देणे ही कायदेशीर जबाबदारी असून, ती विशिष्ट कालावधीत विहित नमुन्यात आयकर विभागास कळवावी लागते. 
  • यानंतर त्याची छाननी होऊन आवश्यकता असल्यास त्याच्याशी संबंधित व्यक्तींकडून त्याचे स्पष्टीकरण मागवले जाते. 
  • उदा ₹30 लाखापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहाराची नोंदणी रजिस्ट्रारकडे झाल्यास संबंधित रजिस्ट्रारला या व्यवहाराशी संबंधित व्यक्तींचा कायम नोदणी क्रमांक, मालमत्तेची किंमत याची माहिती आयकर खात्यास द्यावी लागते. 
  • ही माहिती विभागास मिळाल्यावर संबंधित खरेदीदार व्यक्तीच्या 26AS या फॉर्म मध्ये अद्ययावत केली जाते. 
  • यानंतर आयकर खाते खरेदीदाराचे आयकर विवरणपत्र तपासून त्यात दिलेल्या माहितीशी सदर माहिती पडताळून पहाते जर तपशील योग्य असेल तर ठीक, नाहीतर आयकर खात्याकडून संबंधित व्यक्तीस नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागवले जाते.
  • यातील विविध प्रकारच्या व्यवहारांसाठी काही सांकेतांक निर्माण केले असून, यात दर्शविलेले व्यवहार विभागास संबंधित संकेतांकाखालील व्यवहार म्हणून विविध खात्यांकडून कळवले जातात. 
  • असे संकेतांक व त्यात अंतर्भूत व्यवहार यांचा तपशील हे सर्व व्यवहार एकाच आर्थिक वर्षातील असावेत. 

महत्वाचा लेख: आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

SFT: विशेष आर्थिक व्यवहार व सांकेतांक 

SFT-001

एक अथवा अनेक धनाकर्ष, पे ऑर्डर, बँकर्स चेक यांची एकत्रित किंमत ₹10 लाख किंवा अधिक रकमेची रोखीने केलेली खरेदी.

SFT-002

एक अथवा अनेक प्रीपेड व्यवहार ज्यांची एकत्रित किंमत ₹10 लाख अथवा अधिक.

SFT-003A

एक अथवा अनेक चालू खात्यात ₹50 लाख किंवा त्याहून अधिक जमा केलेली रोख रक्कम.

SFT-003B

एक अथवा अनेक चालु खात्यातून ₹50 लाख किंवा त्याहून अधिक काढलेली रक्कम, या रकमेत बेअरर चेकचाही समावेश होतो.

SFT-004

एक वा अधिक खात्यात (चालू खाती / मुदत ठेव वगळून) यात जमा केलेली ₹10 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम. 

SFT-005

एक वा अधिक मुदत खात्यात जमा केलेली ₹10 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम. (यात पूर्वी ठेवलेल्या व मुदतपूर्तीनंतर नूतनीकरण केलेल्या मुदत ठेवींचा समावेश होत नाही).

SFT-006

एखाद्या व्यक्तीस रोखीने दिलेली ₹1 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम किंवा ₹10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे, एक वा अधिक क्रेडिट कार्ड वापरून केलेले व्यवहार.

SFT-007

₹ 10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे कर्जरोखे खरेदी करण्यासाठी मिळालेले पैसे. (यात आधी जारी केलेल्या कर्जरोख्याच्या नूतनीकरणाचा समावेश होत नाही).

हे नक्की वाचा: विविध आयकर नोटीस आणि त्यांचे अर्थ

SFT-008

₹10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे समभाग खरेदी करण्यासाठी मिळालेले पैसे (यात समभाग खरेदीसाठी केलेल्या अर्जाबरोबर दिलेल्या रकमेचा समावेश होतो).

SFT-009

₹10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या समभागांची केलेली पुनर्खरेदी (यात सार्वजनिक देकाराद्वारे बाजारातून केलेल्या पुनर्खरेदीचा समावेश होत नाही).

SFT-010

₹10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे व एक किंवा अधिक म्युच्युअल फंड योजनांचे युनिट खरेदी करण्यासाठी मिळालेले पैसे (यात आधीची योजना मोडून अन्य योजनेत केलेल्या गुंतवणुकीचा सामावेश होत नाही).

SFT-011

परकीय चलनात मिळालेली ₹10 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम (यात अशा प्रकारच्या चलनात ट्रॅव्हलर्स चेक, धनाकर्ष, क्रेडिट/ डेबिट कार्डच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेचा सामावेश होतो).

SFT-012

₹30 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या अचल मालमत्तेची खरेदी/ विक्री (मालमत्तेची रेडी रेकनरनुसार किंमत ₹30 लाख किंवा त्याहून अधिक आहे परंतू त्यांचा खरेदी/ विक्री व्यवहार याहून कमी किमतीत असेल असेही व्यवहार यात धरले जातील).

SFT-013

वस्तू आणि सेवा यांचे ₹ 2 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे कोणत्याही प्रकारचे विक्री व्यवहार (यातून नियम 114 E मधील अनुक्रम 1 ते 10 यात उल्लेख केलेले व्यवहार वगळण्यात आले आहेत).

SFT-014

9 नोव्हेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत ₹2 लाख 50 हजार किंवा त्याहून अधिक भरणा केलेली रोख रक्कम एक अथवा अधिक बचत/ चालू खाते यामध्ये.

यातील कोणतेही व्यवहार करताना प्रामाणिक व्यक्तीस कोणतीही कायदेशीर अडचण नसून यासंबंधी विचारणा आयकर खात्याकडून बरेच दिवसानंतर झाल्यामुळे गोंधळ उडू शकतो. त्यामुळे अशा व्यवहारांचे संदर्भ जतन करावेत, एवढेच!

उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Statement Of Financial Transactions (STF) in Marathi, Statement Of Financial Transactions (STF) Marathi Mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutesअनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutesटॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutesआयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

PAN Card: पॅन कार्ड विषयी सर्व काही

Reading Time: 3 minutesपॅन कार्ड हे महत्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे.  अगदी बँक खाते उघडण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. तुम्ही करदाते (Tax payer) असाल किंवा नसाल, पण तुमच्याकडे तुमचे स्वतःचे पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. या लेखात आपण पॅन कार्डबद्दलची विस्तृत माहिती घेणार आहोत.