Reading Time: 2 minutes

आता प्रत्येक पाऊलाचा अर्थ समजावून घेऊयात !

आजपासूनच आर्थिक स्वातंत्र्याचा श्री गणेशा …….. करूयात ………

लक्षात असुदयात की, It is Never too Late !

  • पहिले पाऊल म्हणजेच ‘निग्रह’ ….. आपल्याला ‘आर्थिक वळण’ लागावे.  जीवन ‘आर्थिक दृष्टया’ तणावमुक्त असावे प्रत्येकाला वाटते परंतु त्यासाठी लागणारी ‘इच्छा शक्ती’ मात्र ज्याची त्यालाच निर्माण करावी लागते. 
  • आर्थिक नियोजन  अव्याहत, निरंतर प्रक्रिया आहे त्यामुळे गुंतवणूकदाराने निर्धार करणे गरजेचे आहे. निर्धारानंतर येते ‘तितिक्षा’ !! बऱ्याच गुंतवणूकदार वाचकांना ह्या तितिक्षेची ‘फोड’ करून सांगावी लागेल. 
  • ‘तितिक्षा’ म्हणजेच योजलेले फळ किंवा साध्य मिळेपर्यंत सबुरी ठेवल्यास लागणारी मानसिक तयारी: ह्या प्रतीक्षा काळात कितीही संभ्रम, चढ-उतार, शंका आल्या तरीही आपल्या ध्येयावरून किंचितही विचलित न होण्याची मनाची बैठक!

लक्षात असुदयात आर्थिक क्षेत्रात बुद्धिमत्तेपेक्षाही मानसिक-भावनिक हुशारी जास्त कामी येते.

 

नक्की वाचा : काळ बदलला तरी आर्थिक जीवनास लागू असणाऱ्या या ‘म्हणी’ लक्षात ठेवा…!

 

1) जीवनलक्ष्ये सुस्पष्टपणे मांडणे –

  • गुंतवणूकदाराला गुंतवणूकीद्वारे नेमके काय साध्य करायचे आहे, योजलेले ध्येय किती कालावधीत अपेक्षित आहे, नियोजित जीवनलक्ष्य ही गरज आहे. की स्वप्न तसेच ध्येय पूर्तीसाठी प्राधान्यक्रम ठरवणे असे संलग्न निर्णय जीवनलक्ष्ये ठरवताना घ्यावे लागतात. 
  • नेमके सांगायचे झाले आर्थिक नियोजनकार गुंतवणूकदाराची जणु ‘ पैशाविषयीची नाडीपरीक्षाच ‘ करत असतो. प्रत्येकाने जीवन प्रवासात अनेक इच्छा, आकांक्षा, स्वप्ने मनात बाळगलेली असतात. कुटुंबातील सदस्यांची स्वप्नेपूर्ण करण्यात बऱ्याच इच्छांना मुरड घालावी लागते. निवृत्तजीवनात स्वतःची राहून गेलेली स्वप्ने पूर्ण करावी अशा योजना सामान्य वर्ग आखतो. 
  • परंतु ‘ जीवनलक्ष्ये ‘ ‘ सुस्पष्टपणे ‘ मांडून त्यावर ‘ आर्थिक अंदाजपत्रक ‘ आखले नाही तर ही जीवनलक्ष्ये (Financial Life Goals)  ‘ दिवास्वप्ने ‘ ठरतात! त्यासाठी गरज आहे आर्थिक नियोजन नकाशाची !
  • स्वतःची Targets माहीत असणे खरच गरजेचे आहे का ? फक्त ‘ श्रीमंत ‘ होणे आणि मुद्दल व्दिगुणीत करणे असं स्वप्न असू शकत नाही का ? असा साधा सहज विचार प्रत्येकाच्या डोक्यात एव्हाना डोकावलाही असेल. जेंव्हा जशी ‘ नड ‘ निर्माण होईल तशी गुंतवणूक ‘ मोडून ‘ गरज भागवली तर ते आर्थिक नियोजन’ नसेल का ? अस वाटणंदेखील स्वाभाविक आहे.
  • गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावे की, कोणाचेही आर्थिक जीवन स्थिर असत नाही. जीवनातील अनपेक्षित चढ-उतारांप्रमाणे आर्थिक जीवन सुद्धा अस्थिर आणि लहरी असते. त्यामुळे ‘आर्थिक योजना ‘ सतत जीवनक्रमानूसार भाकिते आखत बदलती असावी लागते. Personal Finance क्षेत्रातील चलनवाढीचा दर, आयकराचे दर, विमा हप्त्यांचे दर, आरोग्यावरील खर्चातील चलनवाढ अशा बाबींवर सामान्य गुंतवणूकदारांचे नियंत्रण नसते. त्यामुळे दरवर्षी गुंतवणूकींचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.
  • जीवनलक्ष्ये सुस्पष्टपणे मांडणे, आर्थिक नियोजनकारासोबत विस्ताराने संवाद साधून जीवनलक्ष्ये वास्तवाशी जुळवून ठरवली आहेत का याची पडताळणी करणे हा ‘ आर्थिक ‘ नियोजनाचा पाया आहे. 

 

नक्की वाचा : निवृत्ती नियोजनातील चुका

 

2) मासिक अंदाजपत्रक तयार करणे – आर्थिक नियोजनातील अत्यंत महत्वाचा परंतू तितकाच दुर्लक्षित टप्पा म्हणजे मासिक जमाखर्चाची नोंद! बचत आणि गुंतवणूकांचा हिस्सा ठरवण्यासाठी मासिक आणि वार्षिक अंदाजपत्रक आखणे, त्यातील अवाजवी खर्च टाळणे, बचतीचे मार्ग शोधणे. खर्चीक बाबींवर तोडगा शोधणे. असे निर्णय घेणे सहजपणे साध्य करण्यासाठी मासिक-वार्षिक अंदाजपत्रकाची नोंद करणे गरजेचे ठरते.  

  • Cash – Flow Planning, Monthly Budgeting ह्या सवयी आर्थिक नकाशा (Roadmap) तयार करण्यासाठी कच्चा मसुदा तयार करतात. प्रसंगी आर्थिक प्रवासाचे संपूर्ण चित्र रेखाटणे शक्य होते. भविष्यातील छोटे-मोठे खर्च उदाहरणार्थ प्रवासखर्च, सहलखर्च, घराची सजावट, सणांसाठीचा खर्च असे खर्च विशेष वेगळी गुंतवणूक करून भागवण्याची गरज रहात नाही. मासिक अंदाजपत्रकातून शिल्लक बाजूला ठेऊन हे लहान- मोठे खर्च साध्य करता येतात. 
  • तात्पर्य आर्थिक शिस्त लागण्यासाठी, जबाबदारीने,  Informed निर्णय घेण्यासाठी Cash – Flow Statement  तयार करणे गरजेचे ठरते. 
  • आर्थिक नियोजनकार Data – Gathering Meeting मध्ये ही सांख्यिकी माहीती मिळवतो. गुंतवणूकदाराचे समुपदेशन करतो. त्याला आर्थिक वळण लावण्याकरता त्याची आणि त्याच्या जोडीदाराची खर्चविषयक मनोवृत्ती तपासतो. लक्षात ठेवा नियोजनकार केवळ वित्त नियोजन न करता वित्तीय व्यक्तिमत्वाशी  जीवनलक्ष्यांची अभ्यासपूर्वक सांगड घालत असतो. (क्रमशः)

 

 

भक्ती रसाळ

Mumbai 

Certified Financial Planner, AIII, Health Insurance Expert

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.