Arthasakshar स्टॉक मार्केटवर आधारित चित्रपट
https://bit.ly/3g09Ixx
Reading Time: 2 minutes

स्टॉक मार्केटवर आधारित काही चित्रपट !

स्टॉक मार्केटवर आधारित चित्रपट तयार होऊ शकतो याचा विचारही अनेकांनी केला नसेल. विविध भाषा, संस्कृतींमध्ये सिनेमाकडे फक्त मनोरंजनाचा एक पर्याय म्हणून पाहीले जाते, पण याच सिनेमांमधून आपल्याला अनेक गोष्टी शिकायलाही मिळतात. आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांना समोर ठेवूनच साधारणतः सिनेमांचे विषय असतात. या विषयांपकी एक विषय म्हणजे स्टॉक मार्केट हा आहे. त्यातीलच काही निवडक सिनेमे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी पाहीले तर त्याचा त्यांना नक्कीच उपयोग होईल. 

Netflix -नेटफ्लिक्स कंपनीच्या यशाची ७ रहस्ये

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यावरील कंटाळवाणी पुस्तके वाचण्यापेक्षा मस्त सोफ्यावर बसून काही सिनेमे किंवा डॉक्युमेंटरीज पाहण्याचा पर्याय जास्त चांगला नाही का? असेच काही हॉलिवूडमधील सिनेमे कोणते आणि त्यात नक्की काय दर्शविले आहे, ते आज आपण या लेखामधून पाहणार आहोत. 

स्टॉक मार्केटवर आधारित चित्रपट

1. ट्रेडिंग प्लेसेस (१९८३)

जॉन लॅन्डिस दिग्दर्शित या सिनेमामध्ये एडी मर्फी यांनी अभिनय केला आहे. हा विनोदी प्रकारातील सिनेमा आहे आणि यामध्ये अमेरिकेतील त्याकाळातील सामाजिक, आर्थिक आणि राहणीमानाबाबतीतील मूलभूत तत्त्वे विनोदी पद्धतीने दाखवली आहेत. शिवाय या सिनेमामध्ये अनेक काल्पनिक आर्थिक उलाढाली पाहावयास मिळतात.

 

चिनी ॲप्सवर बंदी: ५ स्वदेशी ॲप्सचा पर्याय 

2. वॉल स्ट्रीट (१९८७):

मायकल डग्लस आणि चार्ली शिन यांचा अभिनय असलेला, ऑलिव्हर स्टोन दिग्दर्शित हा सिनेमा एका अशा तरुण स्टॉक ब्रोकरभोवती फिरत राहतो, जो एका अत्यंत धनाढ्य आणि निर्दयी हल्लेखोरासाठी काम करत असतो. या सिनेमामध्ये जास्तीत जास्त पैसे कमावण्यासाठी काही गुंतवणूकदार कशा प्रकारे गुप्त पद्धतीने माहिती मिळवतात हे दाखवले आहे. या सिनेमातून आपल्याला शेअर मार्केटमधील चढ-उतारांचे अत्यंत बेभरवशाचे वास्तव समजते.

3. ग्लेनगॅरी ग्लेन रॉस (१९९२):

हा सिनेमा डेव्हिड मॅमेट यांनी त्यांच्याच १९८४ साली पुलित्झर पुरस्कार विजेत्या याच नावाच्या त्यांच्या नाटकावरून बनवला आहे. यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये अल पॅसिनो आणि केविन स्पेसी यांनी काम केले आहे. हा चित्रपट म्हणजे चार स्थावर मालमत्ता विक्रेत्यांमधील एकमेकांशी चढाओढ करण्याच्या दृष्टीने ते कशा प्रकारे संशयित पद्धतींचा वापर करत असतात यावर आहे.

Charlie Munger : कोण आहेत गुंतवणूक तपस्वी चार्ली मुंगर ? 

4. रोग (Rogue) ट्रेडर (१९९८):

हा चित्रपट बारिंग नावाच्या बँकेचा स्टार डेरीव्हेटीव्ह्ज चा व्यापारी निक लिसन याच्या सत्य घटनेवर त्याने याच नावाने लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहे. एक चुकीचा व्यवहार लपवण्यासाठी लिसन यांनी अशा प्रकारच्या व्यवहारांचे सत्रच सुरु केले. परिणामी, जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जुनी व्यापारी बँक असणाऱ्या बारिंग बँकेला १.३ अब्ज डॉलर्स इतकी मोठी किंमत चुकवावी लागली. त्याच्या या बेजबाबदारपणामुळे बारिंग बँक १९९५ मध्ये बंद पडली. याच सर्व कथेवर हाr चित्रपट आधारित आहे. 

5. बॉयलर रूम (२०००): फेब्रुवारी २०००, मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा बेन यंगर यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचे मूळ पात्र सेठ डेव्हिस, ज्याने यशाच्या आणि पैसे कमावण्याच्या तीव्र इच्छेने शिक्षण सोडलेले असते. वडिलांच्या राहणीमानाला शोभेल इतके पैसे कमावण्याच्या उद्देशाने बेन, एका उपनगरातील गुंतवणूक कंपनीमध्ये स्टॉक ब्रोकर म्हणून नोकरी करू लागतो. सुरुवातीला त्याला वाटत असल्याप्रमाणे हे काम कायदेशीर असेलच असे सांगता येत नाही. अशा प्रकारचे या चित्रपटाचे कथानक आहे.

शेअर ट्रेडिंग ॲप्स – सुरक्षित ट्रेडिंग करण्याचे ५ मार्ग

6. गफला (२००६): हा चित्रपट म्हणजे नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध सिक्युरिटीजचा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहता यांची सत्य कथा. १९९२ साली शेअर बाजार आणि बँकिंग उद्योगात ४,०२५ रुपयांचा घोटाळा करणारी ही व्यक्ती. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केतन पारेख नावाची मेहतांचे समर्थन करणारी व्यक्तिरेखा दाखवलेली आहे जी २०००-०१ मध्ये आणखी एका घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असेल असे दर्शविले आहे. हा घोटाळा त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत होता.

या चित्रपटांमधून मनोरंजनासोबतचे शेअर बाजाराचे विविध पैलू, यामध्ये कशा प्रकारे व्यवहार केले जातात, शेअर्सच्या किमतीमध्ये रोज होणारे चढ-उतार आणि त्यानुसार गुंतवणूकदारांच्या क्लृप्त्या यांचा अंदाज येतो. याचा उपयोग शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना कसे निर्णय घ्यायचे हे ठरवण्यासाठी होऊ शकतो. अशाच अजून काही चित्रपटांबद्दल आपण पुढील लेखामध्येही जाणून घेणार आहोत.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…