अर्थसाक्षर शेअर बाजार पार्टिसिपंटस
https://bit.ly/2C8sO6v
Reading Time: 2 minutes

शेअर बाजार पार्टिसिपंटस – प्रकार आणि अर्थ 

शेअर बाजाराचा भाग असणारा आणि व्यवहार करणारा प्रत्येक जण म्हणजेच शेअर बाजारात सहभागी घटक (शेअर बाजार पार्टिसिपंटस)!  अगदी विद्यार्थ्या पासून ते श्रीमंत व्यक्तींपर्यंत सर्वच जण शेअर बाजाराकडे आकर्षित होत असतो. . 

शेअर बाजार पार्टिसिपंटस

1. घरगुती किरकोळ सहभागी (Domestic Retail Participants)

सर्वसामान्य व्यक्ती ज्या जे शेअर बाजारात व्यवहार करतात त्या यामध्ये येतात.

देशांतर्गत गुंतवणूकदार संस्था (Domestic Institutional Investors)

भारतातील मोठ्या कंपन्या सूची बद्ध कंपन्यांच्या सेक्यूरिटीजमध्ये गुंतवणूक करतात, त्या या गटात मोडतात. यामध्ये कर्मचार्‍यांची भविष्य निर्वाह निधी संस्था आणि भारतीय जीवन विमा महामंडळ अशा प्रकारच्या संस्था येतात.

घरगुती मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (Domestic Asset Management Companies -AMC)

साधारणतः या गटामध्ये म्युच्युअल फंड कंपन्या येतात. उदा. अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड इत्यादी.

परदेशी गुंतवणूकदार संस्था (Foreign Institutional Investors)

या अशा संस्था असतात ज्या भारता बाहेरील असतात अथवा बाहेरून चालवल्या गेलेल्या असतात. या संस्थांना भारतीय सेक्यूरिटीज मध्ये गुंतवणूक करायची असते. उदाहरणार्थ – ब्लॅकरोक, आधीची फ्रँकलिन टेम्पलटन इ.

एनआरआय आणि ओसीआय

भारतीय वंशाचे मात्र भारताबाहेर राहणारे लोक या गटात येतात.

प्रकार अनेक ध्येय एक 

  • प्रत्येक वर्गामध्ये हुशार, मध्यम आणि नापास होणारे असे विद्यार्थी असतात मात्र त्यांचे ध्येय एकच असते ते म्हणजे त्यांच्या परीने चांगल्या गुणांनी पास होणे. अगदी त्याचप्रमाणे शेअर मार्केट मध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणी मधील लोक तसेच संस्था आहेत ज्यांना इथे पैसा कमवायचा असतो.
  • ज्याप्रमाणे वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन क्षमता वेगवेगळी असते त्याचप्रमाणे इथे मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते.
  • एखादा सामान्य गुंतवणूकदार हजारोने गुंतवणूक करू शकतो तेच एखादा एन.आर.आय. किंवा संस्था कोरोडो रुपयांची गुंतवणूक करू शकतात, म्हणूनच लोकं अशा व्यक्ती किंवा संस्थांचा मागोवा घेतात जेणेकरून त्यांची विक्री उच्च दरात आणि खरेदी कमी दरात झाली पाहिजे.   
  • यामुळेच वृत्तपत्रांमध्ये अशा लोकांची आणि संस्थांची खरेदी-विक्री माहिती आपण पाहतो.

उदाहरणार्थ –

तर, ही होती अगदी सोप्या पद्धतीने शेअर मार्केट सहभागीं घटकांची माहिती.

माझा शेअर्स पोर्टफोलिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आदित्य कोंडावार 

96209 18600

(आदित्य कोंडावार हे शेअर मार्केट विश्लेषक असून गुंतवणुकीविषयी सल्ला देणारी JST Investment या फर्मचे संस्थापक आहेत. त्यांना संपर्क करण्यासाठी aditya.kondawar@jstinvestments.com या ईमेल आयडीवर संपर्क साधा.)

For suggestions and queries – Contact us: info@arthasakshar.com 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: Stock Market Participants Marathi Mahiti, Stock Market Participants in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…