फाल्गुनी नायर Falguni Nayar
Reading Time: 3 minutes

फाल्गुनी नायर (Falguni Nayar)

फाल्गुनी नायर (Falguni Nayar) हे नाव आज श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये घेतले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये स्वप्न पूर्ण करण्याची महत्वकांक्षा असते तेव्हा कोणतीही गोष्ट त्याला स्वप्न पूर्ण करण्यापासून अडवू शकत नाही, हे सिद्ध करून दाखविले आहे नायका ब्रँडच्या संस्थापक फाल्गुनी नायर यांनी.

वयाच्या पन्नाशीत आल्यावर जेव्हा लोक त्यांचा रिटायरमेंटची प्लानिंग करत असतात तिथे वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी नायका या ब्रँडची सुरुवात केली व स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची मर्यादा नसते हे दाखवून दिले. वयाच्या पन्नाशीत प्रवेश करत असताना नायका हा ब्रँड सुरू करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. पुढे ही कल्पना नुसतीच डोक्यात न ठेवता तिला प्रत्यक्षात आणून देखील दाखविले व Age is no barrier. It’s a limitation you put on your mind, हे वाक्य त्यांनी खरे करून दाखविले. फाल्गुनी नायर यांच्या नेतृत्वाखाली आज ‘नायका’ हे एक प्रसिद्ध सौंदर्य उत्पादन ब्रँड म्हणून जगभरात ओळखले जाते.

नायकाचा यशस्वी आयपीओ 

  • १० नोव्हेंबरला नायकाचा आयपीओ बाजारात आला आणि, गुंतवणूकदारांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला. 
  • नायकाच्या शेअर्सची किंमत आयपीओ श्रेणीच्या सूचीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाली. त्यामुळे बाजारपेठेत आता नायका व त्याच्या संस्थापक फाल्गुनी नायर हे नाव चांगलेच प्रसिद्ध झाले आहे.
  • नायका कंपनीच्या या यशानंतर फाल्गुनी नायर यांचा देशातील २० सर्वात श्रीमंत लोकांमध्ये समावेश झाला आहे व त्या भारतातील स्वयंनिर्मित सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. फाल्गुनी नायर व त्यांच्या परिवाराची एकूण संपत्ती आता $७.४ अब्ज एवढी आहे.

फाल्गुनी नायर (Falguni Nayar)– यशाचा प्रवास 

  • फाल्गुनी नायर यांचा जन्म १९फेब्रुवारी १९६३ मध्ये झाला. त्यांनी सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथून पदवी प्राप्त केली व अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्या पदव्युत्तर झाल्या. 
  • फाल्गुनी यांच्या वडिलांचा  बेअरिंगचा व्यवसाय होता . त्यामुळे व्यापार व गुंतवणूक या क्षेत्रांशी त्यांचा संबंध आधीपासूनच होता. त्यानंतर त्यांनी कोटक महिंद्रा मध्ये १९ वर्षे काम केले आणि कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम पाहिले.
  • काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा जिद्दीमुळे इथेच न थांबता फाल्गुनी नायर यांनी २०१२ मध्ये  नायकाची स्थापना केली. इथूनच त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली.
  • जेव्हा नायकाची स्थापना झाली, तेव्हा भारतामध्ये असे कोणतेच दुसरे व्यासपीठ नव्हते.
  • भारतामध्ये सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्यासाठी शॉपिंग मॉल हाच पर्याय उपलब्ध होता. नकली व बनावट उत्पादनांमुळे ग्राहक ऑनलाइन सौंदर्य प्रसाधने खरेदी करत नव्हते. 
  • ग्राहकांच्या याच गरजेला ओळखून फाल्गुनी नायर यांनी नायका या ई कॉमर्स कंपनीची सुरवात केली. 
  • सौंदर्यप्रसाधनांच्या महागड्या किमतीमुळे किंवा सौंदर्यप्रसाधनांबद्दल असणाऱ्या अपुर्‍या माहितीमुळे भारतामधील बऱ्याच महिला सौंदर्यप्रसाधनांचा वापर जास्त प्रमाणात करत नव्हत्या.  परंतु नायकाचा ब्रॅण्ड बाजारात आल्यावर ऑनलाइन मिळत असणार्‍या सौंदर्य प्रसाधनांमुळे व त्याच्या फायदेशीर किमतीमुळे व उत्कृष्ट श्रेणीतील सौंदर्यप्रसाधनांमुळे नायका हा ब्रँड भारतामध्ये लोकप्रिय झाला.
  • २०१२ मध्ये नायकाची अधीकृत वेबसाईट तयार करण्यात आली व २०१३ साली या वेबसाइटला प्रोफेशनल व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले.
  • नायका या शब्दाचा अर्थ अभिनेत्री असा देखील आहे. नवनवीन ट्रेण्ड फॅशन यावर लक्ष केंद्रित करून फाल्गुनी नायर व त्यांच्या टीमने नायका हा ब्रँड  भारतामध्ये सर्वोत्कृष्ट बनवला आहे.
  • २०१८ मध्ये कंपनीने नायका मेन व नायका फॅशन देखील चालू केले व २०२० मध्ये नायकाने नायका प्रो देखील लाँच केले.        
  • सध्याच्या घडीला ३० शहरांमध्ये मिळून नायकाची ७० स्टोअर्स असून कंपनीचे हेडक्वार्टर मुंबईला आहे.  २०१५ पासून नायकाने ‘नायका फेमिना ब्युटी अवॉर्ड्स’चे आयोजन केले होेत.
  • २०१९ पासून नायका फॅशनने  व्होग इंडिया सह भागीदारीत ‘द पॉवर लिस्ट’ लाँच केल आहे.   
  • नायकाचे  Nykaa Luxe, Nykaa On Trend आणि Nykaa beauty Kiosks नावाचे तीन ऑफलाइन स्टोअर स्वरूप आहेत. तसेच Nykaa Beauty या सौंदर्य उत्पादनांचा इन-हाउस कलेक्शन आहे. 
  • फाल्गुनी नायर व त्यांच्या टीमने घेतलेल्या मेहनतीमुळेच दिवसाला केवळ २० ऑर्डर घेणारी नायका कंपनी आजच्या घडीला जवळपास ७० हजार ऑर्डर्स यशस्वीपणे डिलिव्हर करत आहे. 
  • प्रतिमाह ५५ दशलक्ष पेक्षा जास्त युजर्स नायकाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देतात .
  • गुंतवणूकीद्वारे  नायका कंपनी ने २०२० मध्ये १०० दशलक्ष पेक्षा जास्त नफा कमवला आहे.

नायका हा ब्रँड आता भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फॅशन प्लॅटफॉर्म पैकी एक मानला जातो. त्यांच्या याच यशामुळे भारतीय महिला अगदी कोणत्या क्षेत्रात मागे नाही हे सिद्ध होते. स्वतःला कधीही कमी समजू नये. प्रत्येक महिला ही तिच्या स्वतःच्या आयुष्याची नायिका आहे, असा संदेश फाल्गुनी नायर यांनी देशभरातील सर्व महिलांना दिलेला आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी कोणताही अनुभव नसताना फाल्गुनी नायर यांनी नायकाचा प्रवास सुरू केला हे भारतातील प्रत्येक महिलेसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Falguni Nayar in Marathi, Falguni Nayar Marathi Mahiti, Falguni Nayar Marathi 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…