Policybazaar.com
Reading Time: 4 minutes

Policybazaar.Com

भारतात काम सुरू केलेल्या ‘पॉलिसी बाजार.कॉम (Policybazaar.com) या कंपनीने यूएई मध्ये सुद्धा आपलं काम सुरू केलं आहे. ‘पॉलिसी बाजार’ने हा प्रवास कसा साध्य केला याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

जीवन विमा ही संकल्पना भारतात जगातील इतर देशांपेक्षा उशिराच आली. मागच्या काही वर्षात मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. विमा का गरजेचा आहे? हे आता लोकांना पटवून सांगावं लागत नाही. अचानक ओढवू शकणाऱ्या आजारपणातून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्यानंतर आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी विमा आवश्यक आहे हे आता एव्हाना सर्वांना तत्वतः पटलं आहे. असं असलं तरीही, आजही भारतात केवळ ३.६९% लोकांनी आपला विमा काढला आहे ही वस्तुस्थिती आहे. सरकारी विमा कंपन्यांचा एकसुरी कारभार, विमा प्रतिनिधींची मनमानी यामुळे सुद्धा काही लोक विम्यापासून लांब राहिले आहेत हे ही एक सत्य आहे. 

हे नक्की वाचा: मासिक पगार रु. ८,००० ते अब्जावधींची संपत्ती -झिरोधाची यशोगाथा ! 

Policybazaar.Com: पॉलिसी बाजार डॉट कॉम – पार्श्वभूमी 

 • भारतीय विमा क्षेत्र हे प्रामुख्याने विमा प्रतिनिधी किंवा एजंट यांच्या मर्जीने, पद्धतीनेच चालायचं. ज्या विमा प्रतिनिधींकडे ज्या कंपनीची एजन्सी, त्या कंपनीची पॉलिसी कशी चांगली आहे हे तो एजंट लोकांना समजावून सांगायचा. 
 • मर्यादित प्रसारमाध्यम आणि इंटरनेटचा आजच्या इतका वापर नसलेल्या त्या काळात लोक गरज नसलेल्या विमा योजनेमध्ये पैसे गुंतवायचे. 
 • ठराविक वर्गाला त्याचा फायदा व्हायचा. पण, कित्येक लोक असे असायचे ज्यांना विमा योजनेबद्दल अधुरीच माहिती असायची. 
 • लोकांना उपलब्ध असलेल्या सर्व सरकारी, खाजगी विम्याची तुलना सहजपणे शक्य व्हावी, कमीत कमी वेळात विमा उतरवता यावा यासाठी २००८ मध्ये ‘याशीष दहिया’, ‘आलोक बन्सल’ आणि ‘अवनिश निर्जर’ या तीन मित्रांना ‘पॉलिसी बाजार डॉट कॉम’ची संकल्पना सुचली.
 • ‘ग्राहकांची सोय’ हेच ध्येय असलेल्या ‘पॉलिसी बाजार’ने आपली सुरुवात एका स्टार्टअपच्या स्वरूपात गुरुग्राम मधून केली. 
 • हळूहळू ग्राहक वर्ग केवळ उत्तम सेवा, पारदर्शक व्यवहार हे फायदा लक्षात घेऊन ‘पॉलिसी बाजार’ कडे अल्पावधीतच आकर्षित झाला.

Policybazaar: केवळ १३ वर्षात अग्रस्थानी 

 • पहिल्या १३ वर्षातच ‘पॉलिसी बाजार’ ही कंपनी ‘ऑनलाईन इन्श्युरन्स’ क्षेत्रात अग्रस्थानावर पोहोचली आहे. 
 • पॉलिसी बाजार ची सुरुवात ही केवळ ‘तुलना’ करण्याची वेबसाईट अशी झालेली असली तरीही आज त्या प्लॅटफॉर्म वरून मोठ्या प्रमाणात विम्याची विक्री होत असल्याचं आकड्यांवरून स्पष्ट झालं आहे. 
 • विम्याची माहिती फक्त इंग्रजीत न ठेवता प्रत्येक ग्राहकाला आपल्या प्रादेशिक भाषेत सुद्धा ही माहिती उपलब्ध व्हावी यासाठी ‘पॉलिसी बाजार’ आग्रही आहे. नुकतीच त्यांनी आपल्या तेलगू भाषेतील वेबसाईटची सुरुवात केली आहे. 
 • २०१५ मध्ये ‘पॉलिसी बाजार’ कंपनीने मोबाईल ॲप्लिकेशनची सुरुवात केली आणि विमा खरेदी  ग्राहकांसाठी अजून सोपी केली. 
 • २०१८ मध्ये ‘ॲमेझॉन पॉली’ या तंत्रज्ञानाचा वापर करून ‘पॉलिसी बाजार’ने ‘चॅटबॉट’ प्रणालीची सुरुवात केली. या सुविधेमुळे ‘पॉलिसी बाजार’ वेबसाईटला भेट देणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्याला आवश्यक असलेली सर्व माहिती लगेच उपलब्ध होत असते. 
 • ऑगस्ट २०१८ मध्ये ‘पॉलिसी बाजार’ने डॉक प्राईम हे ‘ऑनलाईन मेडिकल सर्विस’ देणाऱ्या अप्लिकेशन ची सुरुवात केली. भारतातील प्रमुख शहरातील डॉक्टर्स सोबत सल्ला आणि अपॉइंटमेंट मिळवून देणे असं डॉक प्राईमचं कामाचं स्वरूप आहे. पहिल्या ६ महिन्यातच डॉक प्राईमला १० लाख लोकांनी भेट देऊन त्यांच्या सुविधांचा उपभोग घेतला आहे. 
 • २०१९ मध्ये यश दहिया यांनी ‘पॉलिसी बाजार’ कपंनीच्या ग्रुप सीईओ पदाची सूत्रं सांभाळली. 

विशेष लेख: कोरोना व्यतिरिक्त आरोग्य विमा खरेदी करण्याची ६ महत्वाची कारणे 

Policybazaar.Com: आर्थिक प्रगती

 • ‘पॉलिसी बाजार’ कंपनीने मागील काही वर्षात केलेली आर्थिक प्रगती ही डोळे दिपवणारी आहे.
 • २०१६-१७ मध्ये ‘पॉलिसी बाजार’ कंपनीचा टर्नओवर ४९.१ करोड रुपये इतका होता. 
 • हा टर्नओवर २०१७-२०१८ मध्ये वाढून १५९.४ करोड रुपये इतका झाला. 
 • २२५% टक्क्यांनी झालेली ही वाढ लोकांना, गुंतवणूकदारांना खूपच आश्वासक वाटत आहे.
 • ‘ट्रेसेंट होल्डिंग’ या कंपनीच्या गुंतवणुकीनंतर आज ‘पॉलिसी बाजार’ कंपनीची किंमत ही १०० करोड यूएस डॉलर्स इतकी झाली आहे. 
 • ‘पॉलिसी बाजार’ या वेबसाईटवर प्रत्येक महिन्यात ३ लाख ऑर्डर्स इतकी उलाढाल होत असते. ज्यामध्ये प्रत्येक महिन्यात १५,००० विमा विक्री होत असते. 
 • २०२१ मध्ये ‘ऑनलाईन इन्शुरन्स’ या क्षेत्रात ५०% इतका मार्केट शेअर पॉलिसी बाजारने व्यापला आहे. 

Policybazaar.Com: व्यवसाय विस्तार

 • परदेशात व्यवसाय विस्तार करताना ‘पॉलिसी बाजार’ कंपनीने गल्फ मार्केटची निवड केली. ‘पॉलिसी बाजार डॉट एई (Policybazaar.AE)‘ ही नवीन वेबसाईट सुरू केली आहे. 
 • गल्फ मधील लोकांना ऑनलाईन इन्श्युरन्सची सोय सर्वप्रथम उपलब्ध करून दिली आहे. दुबईमध्ये आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय कार्यालय सुरू करून ‘पॉलिसी बाजार’ कंपनीने गल्फमधील ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली. 
 • पुढील ३ वर्षात गल्फमध्ये आपलं ‘नेटवर्क’ वाढवून ५०० कोटी रुपये इतका टर्नओवर फक्त गल्फमधून करण्याचे नियोजन ‘पॉलिसी बाजार’ कंपनीने केलं आहे. 
 • सध्या कंपनीने १० विमा कंपन्यांसोबत हात मिळवणी करून ५० प्रकारच्या विमा योजनांवर विविध ऑफर देण्याचं काम हाती घेतलं आहे. 

Policybazaar.Com: आयपीओ मधून ६,५०० कोटी ?

 • ‘पॉलिसी बाजार’ कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या आयपीओ मधून ६,५०० करोड रुपये रक्कम उभी करण्याचा विचार आहे. 
 • ‘पॉलिसी बाजार’ ही भारतातील पाचवी स्टार्टअप कंपनी आहे ज्याने या पध्दतीने पैसे उभे करण्याच्या प्रयत्नात आहे.  
 • पीबी फिनटेक लिमिटेड या नावाने कंपनीने एका खाजगी कंपनीतून सार्वजनिक कंपनीमध्ये परिवर्तन केलं आहे. 
 • ‘पॉलिसी बाजार’ कपंनीने आयआरडीए कडून मान्यता घेऊन आपले स्वतःचे ‘इन्शुरन्स प्लॅन्स’ विक्रीसाठी आणण्याचं ठरवलं आहे. 
 • ग्राहकांना एकाच ठिकाणी विमा विकत घेणं, त्याचा ‘क्लेम’ सेटल करणं हे सहज शक्य व्हावं म्हणून १५ शहरांमध्ये कंपनी लवकरच आपले ऑफिस सुद्धा सुरू करणार आहे.
 • ‘पॉलिसी बाजार’ने ‘पैसा बाजार डॉट कॉम’ ही पण एक नवीन वेबसाईट सुरू करून लोकांना सीबील स्कोर, क्रेडिट कार्ड, कर्ज सहज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
 • २०२० मध्ये कंपनीने ६६% इतकी वाढ नोंदवली आहे. आज कंपनीची मार्केट किंमत २४० करोड पर्यंत पोहोचली आहे. 

संबंधित लेख: योग्य आरोग्य विम्याची निवड

Policybazaar.Com: विमा क्षेत्रातील योगदान 

 • आज भारतात विकल्या जाणाऱ्या विमा विक्रीपैकी २५% इतकी विक्री ही ‘पॉलिसी बाजार’ वेबसाईटवरून होते. 
 • आरोग्य विमा विक्री आणि त्याचा ग्राहकांना वेळेत परतावा मिळवून देणे यामध्ये पॉलिसी बाजारचा ७% वाटा आहे. 
 • मोटार विमा, प्रवास विमा आणि कंपनीचा ‘ग्रुप विमा’ अशा विविध सोयी देऊन कंपनीने उद्योग जगतातही आपला ग्राहक वर्ग वाढवला आहे. 

भारतात जिथे विमा म्हणजे फक्त कर वाचवण्यासाठी आहे असं मानलं जातं, तिथे पॉलिसी बाजारने कमावलेलं हे यश कौतुकास्पद आहे. विमा खरेदी ही प्रक्रिया विमा प्रतिनिधींकडून ऑनलाईन कडे वळवणाऱ्या ‘पॉलिसी बाजार’ कंपनीला आर्थसाक्षरचा मानाचा मुजरा. 

(या लेखमालेतील कंपनीच्या शेअर्समध्ये अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची उपलब्ध माहितीप्रमाणे कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच या कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात माहिती दिलेल्या कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…