Reading Time: 2 minutes

सुकन्या समृद्धी योजनेचे सर्व फायदे समजले असतील तर आपल्या मुलीच्या पंखाना बळ देण्यासाठी महत्वाचं पाऊल म्हणजे, तिच्या दूरगामी भविष्याची सोय करून ठेवणं. यासाठी तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा उत्तम पर्याय आहे. या भागात सुकन्या समृद्धी खात्यासंदर्भात पडणारे महत्वाचे प्रश्न व उत्तरे जाणून घेऊया.  

  • सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) खाते कुठे उघडता येते?
    • सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) खाते कोणत्याही अधिकृत पोस्ट ऑफिस शाखेत किंवा व्यावसायिक बँकांच्या अधिकृत शाखांमध्ये उघडता येते.
    • सर्वसाधारणपणे, ज्या बँक सार्वजनिक भविष्य निधी (पीपीएफ) खाते उघडण्याची सुविधा देतात त्या सुकन्या समृद्धी योजनेसाठी (एसएसवाय) देखील पुरवते.
  • सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठली?
    • सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याचे फॉर्म.
    • मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र (खाते लाभधारक).
    • ठेवीदाराची ओळख (पालक किंवा कायदेशीर पालक) म्हणजे, पॅन कार्ड, राशन कार्ड, वाहनचालक परवाना, पासपोर्ट.
    • ठेवीदाराचा पत्ता (पालक किंवा कायदेशीर पालक), अर्थात पासपोर्ट, राशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल, वाहनचालक परवाना.
  • हा फॉर्म कुठे भरता येतो?
    • हा फॉर्म योजनेच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे, तो डाऊनलोड करून माहिती भरून तुम्ही जमा करू शकता.
    • तसेच हा फॉर्म ऑफलाईन मार्गाने पोस्ट ऑफिस किंवा योजाना पुरवणाऱ्या बँक येथून मिळू शकेल.
  • या खात्यात रक्कम कशी जमा करता येते?
    • या खात्यात तुम्ही रोख किंवा डिमांड ड्राफ्ट किंवा चेकच्या स्वरुपात जमा करू शकता.
    • चेक, डीडी, किंवा इतर मार्गाने रक्कम भरत असल्यास बँकेशी संपर्क साधून योग्य ती पद्धत वापरावी
  • पासबुक कसे मिळवावे?
    • एकदा खाते उघडले की, पोस्टऑफिस किवा बँक खाते उघडल्या नंतर तत्काळ पासबुक तुमच्या हातात देते.
  • सुकन्या समृद्धी खात्याशी संबंधित अटी कोणत्या आहेत?
    • ठेवीदार खऱ्या अर्थाने ती लहान मुलगी आहे जिच्या वतीने पालक खाते उघडतात. परंतु, मुलगी सज्ञान होई पर्यंत पैसे पालकांच्या नावावर जमा होतात.
    • भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये सदर खाते उघडता येते. तसंच केंद्र सरकारद्वारे अधिकृत केलेल्या कोणत्याही बँकेमध्ये खाते हे खाते उघडता येते.
  • या खात्यात प्रतिवर्षी रक्कम भरणा करण्याची जास्तीत जास्त मर्यादा किती आहे?
    • या खात्यात जास्तीत जास्त १,५०,०००/- रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते.
  • या खात्यात १,५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरणा करता येते का?
    • बँका किंवा पोस्ट ऑफिस दर वर्षी रु. १,५०,०००/- पेक्षा जास्त स्वीकारत नाहीत. तथापि, कोणत्याही चुकीमुळे,  जास्त रक्कम भरणा केली गेली तर  अशा (रु. १,५०,०००/- पेक्षा जास्त) रकमेवर कोणतेही व्याज मिळत नाही.
  • परिपक्वता (Maturity) नंतर व्याज मिळते का?
    • सुकन्या समृद्धी योजनेचे (खाते) खाते उघडण्याच्या तारखेपासून २१ वर्षे किंवा मुलगी २१ वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी असेल ते) किंवा;
    • मुलगी विवाहित असेल तर; या दोन कारणांनी खाते परिपक्व होते व परिपक्वतेनंतर त्यावर कोणतेही व्याज मिळत नाही.
  • परिपक्वता (Maturity) संदर्भातील नियम व अटी काय आहेत?
    • मुलीचे खाते  तिच्या विवाहाच्या तारखेपासून बंद केले जाईल.
    • जीवघेणा आजार किंवा तत्सम कोणत्याही कारणाने हे खाते पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर बंद करता येते. परंतु यावर सामान्य बचत खात्याचे व्याज मिळते.
    • खातेधारक मुलीचा अकाली मृत्यू झाला तर मृत्यू प्रमाणपत्र सादर करून खाते ताबडतोब बंद केले जाते व त्यानंतर खातेधारकाच्या पालकांकडे खात्यात जमा असलेली रक्कम व्याजासह दिली जाते.
  • योजनेमुळे कर लाभ होतो का?
      • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत जमा केलेल्या रक्कम व  व्याज अशा एकूण मोबदल्यावर कोणताही आयकर भरावा लागणार नाही. ही करसुट मिळते.
      • कलम ८० सी अंतर्गत, सुकन्या समृद्धी खात्यावर तुम्हाला प्रतिवर्ष दीड लाखांच्या मर्यादेपर्यंत करकपातीचा लाभ मिळतो.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2rtXwht )

सुकन्या समृद्धी योजना – भाग १ , सुकन्या समृद्धी योजना- नियम व वैशिष्ठ्ये ,  
लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग १लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग २,  
आयुष्यमान भारत योजना, 
आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय?

(Disclaimer: येथील लेखांचा हेतू हा अर्थसाक्षरते निगडीत विविध माहितीचा प्रसार करणे असून, सदर विषयांसंदर्भातील निर्णय आपल्या नेहमीच्या वकिल/ चार्टर्ड अकाऊंटंट/ सल्लागार यांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. अधिक माहितीसाठी  https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.