महिला दिन विशेष: महिलांसाठी आर्थिक नियोजनच्या ५ सोप्या स्टेप्स

Reading Time: 4 minutes आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी वर्तमानपत्राची पानं बातम्यांपेक्षा जास्त जाहिरातींनीच भरलेली दिसतात. त्यात बहुतांश जाहिराती महिला दिनानिमित्त असणाऱ्या कपडे, ब्युटी प्रॉडक्ट आणि दागिन्यांच्या ऑफर्ससंदर्भात असतात. महिला म्हणजे शॉपिंग’ हे जणू एक समीकरणच पक्के झालं आहे. पण प्रत्यक्षात मात्र तसं नाहीये. स्त्रिया म्हणजे शॉपिंग नाही तर त्या उत्तम आर्थिक नियोजन करू शकतात. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत महिलांसाठी आर्थिक नियोजनाच्या ५ सोप्या स्टेप्स.

निवृत्ती नियोजन: निवृत्ती नियोजनाची ११ महत्वाची कारणे

Reading Time: 3 minutes भारतातील ४७% लोक त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर च्या भविष्यासाठी बचत करण्यास सुरुवातच करत नाहीत किंवा केली तरी त्यांना बचत करताना अडचणी येतात. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. सेवानिवृत्ती नंतरच्या भविष्याची काय स्वप्न तुम्ही रंगवता? गोव्यात एका सुंदर पोर्तुगीज शैलीच्या बंगला, ज्याचा अर्धा भाग कॅफे हाउसमध्ये रुपांतरीत केला आहे तिथे पुस्तकांचा संग्रह आहे आणि लज्जतदार पदार्थ तिथे मिळतात? हे माझे निवृत्ती चे स्वप्न आहे. मग तुमचे काय आहे?

Retirement Planning: निवृत्ती नियोजनाची ११ महत्वाची कारणे – भाग १

Reading Time: 3 minutes एचएसबीसी ने केलेल्या विस्तृत जागतिक संशोधनावर मी अभ्यास करत होते, विषय होता, सेवानिवृत्तीचे भविष्य! त्यांनी भारतासह १७ देशांमधील १८,००० हून अधिक लोकांना सेवानिवृत्ती योजनेशी संबंधित माहिती विचारून सर्वेक्षणाचा आढावा घेतला. मिळालेला परिणाम मी स्वतः एक धोक्याची घंटा म्हणून पाहते. बहुतेक लोकांना निवृत्ती नियोजन किती महत्वाचे आहे, हे कळतच नाही. भारतातील ४७% लोक त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर च्या भविष्यासाठी बचत करण्यास सुरुवातच  करत नाहीत किंवा केली तरी त्यांना बचत करताना अडचणी येतात.

नववर्षाचे आर्थिक संकल्प – व्हिडीओ : सीए श्रुती शहा

Reading Time: < 1 minute नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या व्हिडीओामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती देणार आहेत सीए श्रुती शहा!

जागतिक बचत दिन – जगा सन्मानाने…

Reading Time: 2 minutes आज ३० ऑकटोबर! भारतमध्ये आजचा दिवस ‘जागतिक बचत दिन’ (world saving day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ३१ ऑक्टोबर १९२४ रोजी मिलानो, इटली येथील पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय कॉंग्रेस बचत बँक (बचत बँकांच्या जागतिक सोसायटी)’ दरम्यान स्थापित करण्यात आला. इटालियन प्राध्यापक ‘फिलिपो रॅव्हिझाने’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बचत दिन’ म्हणून जाहीर केला. जगभर, ‘जागतिक बचत दिन’ दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारतामध्येही पूर्वी हा दिवस ३१ ऑक्टोबरलाच साजरा होत असे. परंतु १९८४ साली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ३१ ऑक्टोबरला निधन झाल्यामुळे त्यानंतर भारतामध्ये ‘जागतिक बचत दिन’ हा ३० ऑक्टोबरला साजरा केला जातो.