Capital Market Optimism: दिवस सारखे नसतात, हे सांगणारा भांडवली बाजाराचा आशावाद !

Reading Time: 3 minutesकोरोनामुळे मूळ अर्थव्यवस्था एकीकडे तर शेअर बाजार दुसरीकडे, असे चित्र सध्या जगभर पाहायला मिळते आहे. भारतीय बाजारही त्याला अपवाद नाही. अशा या उलट्या प्रवासाची कारणे समजून घेतली की भांडवली बाजाराचा आशावाद कसा काम करत असतो, हे लक्षात येते. 

Rules Of Financial Planning : आर्थिक नियोजनाचे ५ सुवर्ण नियम

Reading Time: 2 minutesआर्थिक नियोजन करताना काही नियमांचे पालन करणं (Rules Of Financial Planning) आवश्यक आहे. भविष्यासाठी किंवा जीवनशैलीसाठी प्रत्येकाला गंगाजळीची गरज भासते. पूर्वी केलेली काही साठवणूक हवी असते. पण ही साठवणूक, गुंतवणूक करायची तरी कशी? त्यासाठी काही आर्थिक नियोजन नको का?  हे आर्थिक नियोजन कसे करायचे? त्याचे टप्पे काय असतील? कोठे गुंतवणूक करावी? योग्य  गुंतवणुकीतले फायदे, चुकीच्या गुंतवणूकीतले धोके याबद्दल या लेखात सविस्तर माहिती घेऊया. 

Share Market: शेअर बाजार: वाव आहे, पण दिशा … ?

Reading Time: 4 minutesसेबीच्या आकडेवारीनुसार 2020 वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत देशात 63 लाख नवे डिमॅट (अन् अर्थात ट्रेडिंगही) खाती उघडली गेली. पुढे जानेवारी 2021 पर्यंत ही संख्या 1 कोटींच्याही पलीकडे गेली.      

Investment Mistakes: गुंतवणूकदारांच्या ५ मूलभूत चुका

Reading Time: 2 minutesअर्थार्जन सुरु झाल्यावर प्रत्येकजण गुंतवणुकीचा विचार करत असतो. भविष्याची तरतूद म्हणून योग्य गुंतवणूक करणे काळाची गरज आहे.  गुंतवणुकीचे लोकप्रिय आधुनिक पर्याय म्हणजे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, मालमत्ता खरेदी. या गुंतणुकींमध्ये सकारात्मक गोष्टींसोबत काही खाचखळगेसुद्धा तेवढेच पाहायला मिळतात. २०१८ साली मालमत्ता खरेदी म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रात बऱ्याच नकारात्मक गोष्टी दिसून आल्या.यामुळे गुंतवणुकीसाठी हे क्षेत्र फारसा फायद्याचं राहिले नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी व काही चुका कटाक्षाने टाळायला हव्यात.

Investment Strategy: आपली गुंतवणूक योजना कशी तयार कराल? 

Reading Time: 3 minutesआपली गुंतवणूक योजना बनवता येणे अगदी सोपे आहे. आपल्या ज्ञानाचा वापर यश मिळण्यासाठी करता आला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकता. चुकांतून शिकून पुन्हा पुन्हा त्याच चुका न करणे आवश्यक आहे. यासाठी सदैव सावध वृत्ती असावी परतावा थोडा कमी मिळाला तरी चालेल पण मुद्दलही कमी होता कामा नये. याच हेतूने आपली गुंतवणूक योजना बनवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा विचार करूयात.

‘यंदा (PPF मधे गुंतवणूकीचे) ‘कर्तव्य’ नाही’ – भाग २ 

Reading Time: 3 minutesPPF चे व्याजदर ठरविताना 10 वर्षाचे सरकारी कर्जरोख्यांचा दर ( G-Sec ) आधारभूत मानून त्यापेक्षा 0.25% अधिक दराने व्याज द्यावे, असा निकष गेले अनेक वर्षे अस्तित्वात आहे. आणि काल जाहिर केलेला 6.4% दर हा या निकषांवर योग्यच होता.

Investment Portfolio: थेट समभाग सोडून अन्य प्रकारातील गुंतवणूक

Reading Time: 4 minutesआपल्याकडे असलेल्या पैशातून पारंपरिक प्रकार जसे मुदत ठेव, विमा बचत योजना यातून बाहेर पडून थेट समभागात गुंतवणूक करणे अनेकांना अत्यंत जोखमीचे वाटते. पारंपरिक साधनातून मिळणारा परतावा महागाईच्या तुलनेत कमी झाल्याने नाईलाजाने का होईना आता अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाकडे वळले आहेत.

Saving & Investment: बचत आणि गुंतवणूक यामधील मूलभूत फरक

Reading Time: 3 minutesजेव्हा कधी आर्थिक विषयांवर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत चर्चा करतो, त्यातले जवळपास सगळेच आपल्याला असा सल्ला देतात, की महिन्याच्या शेवटी तुमच्यापाशी एक ठराविक रक्कम उरली पाहिजे. जेणेकरून, तुम्हाला तुमची सगळी देणी देऊन व दैनंदिनखर्च भागवून जी रक्कम हातात उरेल रकमेतून एकतर बचत करता येईल, किंवा गुंतवणूक करता येईल. पण मुळात या सगळ्याच गोष्टी बव्हंशी तुमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीवरही अवलंबून असतात. बऱ्याचशा गुंतवणूकदारांना बचत आणि गुंतवणूक यातला फरक समजत नाही. या दोघांचीही उद्दिष्टेही वेगवेगळी आहेत. त्यामुळे आपल्या आर्थिक प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी या दोघांमधला मूलभूत फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

Interest Rate Cut: नव्या आर्थिक वर्षात बचत योजनांच्या व्याजदरात कपात!

Reading Time: < 1 minuteसुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी नव्या आर्थिक वर्षातील निराशाजनक बातमी म्हणजे Interest Rate Cut!

PPF: ‘यंदा (PPF मधे गुंतवणूकीचे) ‘कर्तव्य’ नाही’

Reading Time: 2 minutesसार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) हा आजही आपल्याकडील करबचतीच्या सर्वाधिक लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहे. अतिशय मनमानी स्वरुपाचे नियम असलेला हा मोंगलाईछाप पर्याय लोकप्रिय का असावा, हे मला नेहमीच पडलेले एक कोडे आहे.