घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? – दुसरी बाजू

Reading Time: 3 minutes मागील भागात आपण पाहिलं प्रसिद्ध जुळे भाऊ सुरेश आणि रमेश यांचे रस्ते व विचार भाड्याच्या घरात राहायचं की स्वतःच्या; यावरून वेगळे झाले. सुरेशने भाड्याच्या घरात राहून वाचलेले पैसे दुसरीकडे गुंतवण्याचं ठरवलं, तो आपल्या मार्गाने गेला. तर रमेशची कथा मात्र वेगळी होती. रमेशने स्वतःचं घर विकत घेण्याची हिंमत करण्याचं ठरवलं. त्याने गृह कर्ज घेतलं.रमेशने सर्व अभ्यास करून घराचं मासिक भाडं आयुष्यभर देत राहिल्यावर जितका खर्च येईल साधारण तेवढाच किंवा  त्याहून कमी खर्च स्वतःचं घर विकत घेण्यात येईल. सुरवातीला जरी भाड्याच्या घराचं मासिक भाडं इएमआयहुन कमी वाटतं पण येत्या वर्षांत ते भाडं वाढेल. त्यामुळे त्याने गृहकर्जाचा किंवा घरामध्ये रक्कम गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता.

घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? – पहिली बाजू

Reading Time: 3 minutes जर्मनी, इंग्लंड, अमेरिकेत भाड्याच्या घराचं भाडं हे गृहकर्जावरील व्याजापेक्षा जास्त असतं. त्यामुळे या देशांत भाडयाने राहणं परवडत नाही. परंतु भारतात अशी परिस्थिती नाही. भारतात भाड्याच्या घरात राहताना द्यावं लागणारं भाडं गृह कर्जावर भरावं लागणाऱ्या व्याजापेक्षा कमी आहे.

भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करताय? मग आधी हे वाचा

Reading Time: 3 minutes भांडवल बाजाराबद्दल लोकांचे दोन टोकाचे गैरसमज आहेत. ते म्हणजे यातून भरपूर पैसे मिळतात किंवा यात लोक भिकेला लागतात. सर्वसाधारण काही न करता आपल्याला भरपूर पैसे मिळावेत अशी सुप्त इच्छा असलेल्या भरपूर व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेणारे लोकही आहेत. या बाबतीत अनेक प्रकारे प्रबोधन होत असूनही एक क्षण असा येतो की व्यक्तिला मोह होतो आणि ती फसते. फसवे दावे करण्यास कायदेशीररित्या बंदी असली तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यावर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेच्या मर्यादा आहेत.

आयपीएल आणि गुंतवणूक

Reading Time: 3 minutes क्रिकेटच्या तरुण चाहत्यांसाठी गुंतवणुकीच्या काही खास टिप्स. वर्षातून एकदा येणारी आयपीएल मॅच सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाते. एवढंच काय तर मॅच आपल्याला गुंतवणुकीचे तत्वज्ञान  शिकवून जाते. कशी? अगदी सोपं आहे! आता आयपीएल मॅच दरम्यान तुम्ही खेळाडू ज्या ज्या गोष्टी करतात त्या लक्ष देऊन बघा आणि त्यांना तुमच्या आयुष्यातील आर्थिक घटनांशी जोडून बघा. तुमच्या लक्षात येईल की मॅच मध्ये लागणारी खिलाडूवृत्ती, चिकाटी, आणि  गुंतावूणुकीच्या नियमांमध्ये बरंच साम्य आहे आणि क्रिकेटचा जाणकार एक चांगला नियोजक किंवा गुंतवणूकदार होऊ शकतो.