Reading Time: 3 minutes

मागील भागात आपण पाहिलं प्रसिद्ध जुळे भाऊ सुरेश आणि रमेश यांचे रस्ते व विचार भाड्याच्या घरात राहायचं की स्वतःच्या? यावरून वेगळे झाले.

सुरेशने भाड्याच्या घरात राहून वाचलेले पैसे दुसरीकडे गुंतवण्याचं ठरवलं, तो आपल्या मार्गाने गेला. तर रमेशची कथा मात्र वेगळी होती. रमेशने स्वतःचं घर विकत घेण्याची हिंमत करण्याचं ठरवलं. त्याने गृह कर्ज घेतलं.

रमेशने सर्व अभ्यास करून घराचं मासिक भाडं आयुष्यभर देत राहिल्यावर जितका खर्च येईल साधारण तेवढाच किंवा त्याहून कमी खर्च स्वतःचं घर विकत घेण्यात येईल. सुरवातीला जरी भाड्याच्या घराचं मासिक भाडं इएमआयहुन कमी वाटतं पण येत्या वर्षांत ते भाडं वाढेल. त्यामुळे त्याने गृहकर्जाचा किंवा घरामध्ये रक्कम गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता.

आर्थिक नियोजन:-

  • रमेशची नोकरी नवी असल्याने पगार कमी असल्याने घराचे हप्ते भरताना त्याला त्रास होऊ लागला. पण तरुण असल्याने त्याला इतर व्याप नव्हते, त्यामुळे रमेश नेटाने ईएमआय भरू लागला.
  • यामुळे त्याने आपल्या इतर अवांतर, निरर्थक खर्चावर नियंत्रण आणले. हॉटेलिंग हाय-फाय लाइफस्टाइल याला आवर घालून त्यामध्ये  होणारा निरर्थक खर्चही कमी केला. त्यातून झालेली बचत तो गृहकर्जाची वेळेपूर्वी परतफेड करण्यासाठी बाजूला ठेवत होता. यामुळे त्याला चांगल्या सवयी लागल्या. आजवर अपरिपक्व असलेला, उधळा असलेला, सतत पार्ट्या करणारा रमेश एकदम समंजस झाला.
  • ईएमआय किती भरायचा आहे; हे त्याला आधीच माहीत असल्याने रमेशने त्यानुसार आखणी केली.
  • सुरेशने मात्र आपल्या लाईफस्टाईलमध्ये फारसा बदल न करता त्याची बचत म्युच्युअल फ़ंड, एसआयपी (SIP) यासारख्या दीर्घकालीन गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवले होते. साहजिकच आर्थिक नियोजनाची गरज त्याला फारशी भासत नव्हती. त्यामुळे त्याला बचतीचे महत्व जाणवलं नाही.

गुंतवणूक व स्थावर मालमत्ता:-

  • काही वर्षांनी रमेशचा पगार वाढला. त्यामुळे त्याची तेव्हा घराचे मासिक हप्ते भरताना होणारी अडचण पूर्वीपेक्षा कमी झाली. कठीण काळ त्याने निभावून नेला. या काळात त्याला चांगल्या सवयी अंगी बाणल्या. त्याला सेविंगचं महत्त्व कळलं. याचा त्याला पुढे आयुष्यभर फायदा होणार होता.
  • शिवाय घराची किंमत वाढतच जाणार होती त्यामुळे त्याची स्थावर मालमत्ता तयार झाली होती काही वर्षांनी ते घर तो विकूही शकत होता. घराचं असेट त्याच्याकडे होतं. एकप्रकारे त्याचे आजवर घरावर गेलेले पैसे तो तो परत मिळवू शकत होता.
  • तिकडे सुरेशचाही पगार वाढला. पण त्याचबरोबर घरभाड्याची रक्कमही वाढत होती. तसेच, त्याने आजवर भरलेले घरभाड्याचे पैसे त्याला परत मिळवता येणार नव्हते. परंतु अतिरिक्त बचतीच्या पैशातून त्याने अगदी बँक एफडी, पीपीएफ पासून शेअर्स, म्युच्यअल फंड यासारख्या ठिकाणी गुंतवणूक सुरु केली.  उशिरा का होईना हळूहळू त्याला बचतीचे महत्व समजू लागले होते. त्याची दीर्घकालीन गुंतवणूक त्याला काही वर्षांनी उत्तम फळं देणार होती हे मात्र नक्की.

पॅसिव्ह इन्कम:

  • स्वतःचं घर झाल्याने रमेशचं ‘पॅसिव्ह इन्कम’ सुरू झालं. तो बाहेर गावातील विद्यार्थ्यांना किंवा नोकरी करणाऱ्याला ‘पेइंग गेस्ट’ म्हणून ठेवू लागला.
  • सुरेशला हा अतिरिक्त अथवा पर्यायी उत्पन्नाचा स्रोत मिळू शकत नव्हता. शिवाय दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे त्याचा परतावा सुरु व्हायलाही वेळ लागणार होता.

मानसिक समाधान:-

  • भारतीय मानसिकतेत स्वतःचं घर असलेल्याला मान मिळतो. यामुळे स्वतःचं घर असल्याने रमेशला नातेवाईकात / समाजात मान मिळत होता. स्वतःचं घर असल्याने त्याचं लग्नही चटकन जुळलं.
  • तिकडे सुरेशला दर अकरा महिन्यांनी घर मालकसोबत भाड्याच्या घराचा करार करावा लागत असे. दरवर्षी घरमालक भाडं वाढवायचा. वाढीव भाडं पटलं नाही तर त्याचा घरमालकाशी वाद व्हायचा किंवा त्याला नवं घर शोधावं लागत असे. त्याला शिफ्टिंगचा त्रास होत असे. दरवेळी नव्या घरांत, नव्या भागात जुळवून घेताना अनेक अडचणी येत असत.

सुरेश आणि रमेश हे दोघेही आपापल्या निर्णयावर आनंदी आहेत. कारण त्यांनी आपापले निर्णय ठरवून, विचार करून घेतले होते. कुठलीही गोष्ट १००% चूक किंवा बरोबर असू शकत नाही. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच. त्यामुळे सुरेशप्रमाणे करायचं आहे की रमेशप्रमाणे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. 

काय आहे मुदतठेवींचे गणित?,

गृहकर्जासाठीचे आवश्यक दस्तऐवज,

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?,

चक्रवाढ व्याजाची जादू

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.