Reading Time: 3 minutes

क्रिकेटच्या तरुण चाहत्यांसाठी गुंतवणुकीच्या काही खास टिप्स. वर्षातून एकदा येणारी आयपीएल मॅचसुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाते. एवढंच काय तर मॅच आपल्याला गुंतवणुकीचे तत्वज्ञान  शिकवून जाते.

कशी? अगदी सोपं आहे! आता आयपीएल मॅच दरम्यान खेळाडू ज्या ज्या गोष्टी करतात त्या लक्ष देऊन बघा आणि त्यांना तुमच्या आयुष्यातील आर्थिक घटनांशी जोडून बघा.

तुमच्या लक्षात येईल की मॅचमध्ये लागणारी खिलाडूवृत्ती, चिकाटी आणि गुंतवणुकीच्या नियमांमध्ये बरंच साम्य आहे आणि क्रिकेटचा जाणकार एक चांगला नियोजक किंवा गुंतवणूकदार होऊ शकतो.

योजना आखा-

 • जेव्हा आपला आवडता आयपीएल संघ वेळोवेळी अडचणींचा सामना करूनही अव्वल राहतो तेव्हा खेळ रंजक होतो आणि खेळाडूंचेही कौतुक होते. हे सारं ते मजेसाठी करत नाहीत. तो ​​रणनीतीचा भाग आहे.
 • आखलेली रणनीती फक्त त्या संघाला माहित असते. त्याच्याच जोरावर ते संकटातून बाहेर पडतात. नियमित फील्डिंग, फलंदाजीचा क्रम आणि इतर योजनांवर चर्चा करतात. 
 • गुंतवणूक याहून वेगळी नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही आपल्या गुंतवणूकीच्या नियमांविषयी /धोरणाविषयी विचार करावा. आवश्यकता असल्यास बदल करावेत. 

विश्लेषण करा-

 • आयपीएल आणि खेळाडू सध्या वेगवान बदलांना सामोरे जात आहेत. जर एखादा खेळाडू खेळत चांगली कामगिरी करत नसेल तर अशा परिस्थितीत त्याला बाहेर काढले जाऊ शकते किंवा त्याचा संघ बदलतो.
 • त्याचप्रमाणे, जर आपली योजना सातत्याने नुकसान करत आहे आणि चांगला परतावा देत नाही तर अशा परिस्थितीत सहजपणे त्याच तत्सम प्रकारच्या दुसऱ्या कुठल्या योजनेत भिन्न गुंतवणुकीने आपली योजना बदल करू शकता आणि चांगले परतावा मिळवू शकता.
 • पण यासाठी वेळोवेळी आपल्या योजनेचे काय होते आहे? ती किती उपयुक्त ठरत आहे? यापेक्षा कुठली योजना अजून चांगले परतावे देऊ शकते का? याचा विचार केला पाहिजे. हे विश्लेषण आपली गुंतवणूक अजून भरभराटीची आणि समृद्ध करू शकेल.

योग्य समिश्र गुंतवणूक करा-

 • एक उत्तम, नावाजलेल्या संघात फलंदाज, गोलंदाज आणि विकेटकीपर या तिघांचेही काम तितकेच महत्वाचे असते. संघातील प्रत्येक सदस्यांचे कष्ट आणि उत्तम कार्य संपूर्ण लक्ष्य प्राप्त करण्यात मदत करतात.
 • त्याचप्रमाणे, आपले आर्थिक नियोजन तयार करताना, आपल्या आराखड्यांमध्ये इक्विटी, कर्जरोखे आणि सोने अश्या विविध गुंतवणुकीचे योग्य मिश्रण असणे गरजेचे आहे. कारण भविष्यात तुमच्या कोणत्या गुंतवणुकीस चांगला भाव मिळेल आणि ज्यामुळे तुमची भरभराट होईल हे सांगता येणार नाही.
 • किंवा उलटा विचार करा, कधी कुठ्लील बाजारपेठ नुकसानीत जाईल हेही सांगता येत नाही म्हणून मोठे नुकसान टाळावे आणि भरपूर नफा मिळवण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी योग्य प्रमाणात गुंतवणूक हा उत्तम पर्याय आहे.

धोका पत्करा आणि अधिक मिळवा-

 • सतत षटकार आणि चौकार मारत फलंदाजी करणे अत्यंत धोकादायक आहे, हे तर सर्वाना माहीतच आहे. तसेच उच्च धावसंख्या मिळवण्यासाठी खेळाडू सामन्यात एकदातरी धोका घेतात हेही माहित आहे.
 • पण हा धोका कधी घ्यावा, किती घ्यावा याचं नियोजन खेळाडूच्या डोक्यात चालू असते. त्याचप्रमाणे, आपले पैसे गुंतवताना, आपले पैश्यांची गुंतवणूक करून एखादा धोका पत्करावा, पण ज्यातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल अशी शाश्वती आहे, असे निर्णय घेणे गुंतवणूकदारासाठी गरजेचे आहे.
 • आपण घेत असलेले धोके आपल्या भांडवलाला चालनाच देतील आणि नुकसानाच्या दरीत ढकलणार नाहीत याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्याने भविष्यातील आर्थिक ध्येय सहजतेने साध्य करण्यास मदत होते. असा धोका कधी घ्यायला पाहिजे यासाठी वेळेचे तारतम्य मात्र कळावे लागते.

गोंधळाकडे दुर्लक्ष करा-

 • प्रेक्षक बहुतेक वेळा खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी नावाचा जयजयकार करत ओरडत असतात. यामुळे खेळाडूंचा हुरूप वाढवा असच त्यांना वाटतं. पण खरे तर हे असे आवाज बरेचदा चांगली कामगिरी करण्यासाठी खेळाडूंवर दबाव आणतात किंवा विरुध्द पक्षातील खेळाडूंचे समर्थक उमेद खचवण्याचा प्रयत्न देखील करतात. अशा कोणत्याही परिस्थितीतही उत्तम क्रिकेटपटू आपले लक्ष कधीही विचलित होऊ देत नाहीत. आणि केवळ त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात.
 • त्याचप्रमाणे, गुंतवणुकदार म्हणून बाजारात  अचानक होणारी वाढ आणि बाजारातील घसरणीलाही घाबरून जाऊ नये. म्हणून आसपासच्या लोकांकडून बाजाराबद्दल केल्या जाणाऱ्या उलट – सुलट चर्चेकडे  दुर्लक्ष करा आणि आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करा.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग १ ,

गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग २ , कलम ८०सी अंतर्गत करबचतीचे १० विविध पर्याय

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…