PPF: सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी लोकप्रिय का आहे?

Reading Time: 3 minutesसार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) हा भारतातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. म्युच्युअल फंड, शेअर बाजार यासारखे आधुनिक गुंतवणूक पर्याय लोकप्रियतेचं शिखर गाठत असताना पीपीएफ सारखी सरकारी योजनाही तितकीच लोकप्रिय आहे. हा पर्याय एवढा लोकप्रिय का आहे, याबद्दल  सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात घेऊया. 

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी व सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सवलत

Reading Time: 2 minutesआर्थिक वर्ष २०१९-२०२० हे ३१ मार्च २०२० रोजी संपले. यापूर्वी २५ मार्च २०२० पासून जाहीर केलेल्या  लॉकडाऊनमुळे अगदी शेवटच्या क्षणी करबचत करण्याच्या हेतूने गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना होत असलेल्या त्रासाचा विचार करून अपवाद म्हणून केवळ या वर्षीची ८०/क नुसार करसवलत मिळवण्यासाठीची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली. सन २०२०-२०२१ ची गुंतवणूक कधी करायची? ३१ मार्च २०२० रोजी ज्यांच्या खात्याची मुदतपूर्ती होते त्यांनी काय करायचे? अशा प्रश्नांच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या आदेशात पुरेशी स्पष्टता नसल्याने त्यातून निर्माण होणारे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने मार्गदर्शन पत्रके काढण्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी व सुकन्या समृद्धी योजना या दोन योजनांच्या सवलतींचा खुलासा करणारे पत्रक ११ एप्रिल २०२० रोजी वित्त मंत्रालयाने जारी केले असून यात केलेला खुलासा सर्व खात्यांना तात्काळ लागू झाला आहे.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) – काही महत्वाचे बदल

Reading Time: 4 minutesसार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजनेत महत्त्वाचे बदल झाल्याच्या बातम्या समाज माध्यमांत प्रसारित होत आहेत. त्या वाचल्यावर असे लक्षात आले की हे बदल खूप महत्त्वाचे आहेत असे नाहीत. झालेल्या बदलांमुळे आता ही नवी योजना कशी असेल ते जाणून घेऊयात. यासंबंधीचे बदल १२ डिसेंबर २०१९ च्या शासकीय राजपत्रात प्रकाशित झाले आहेत. त्यामुळे त्याच दिवसापासून हे नवे नियम पूर्वी काढलेल्या खात्यांसह सर्व खात्यांना लागू आहेत.

काय आहे पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना?

Reading Time: 3 minutesकोणीही व्यक्ती आयुष्यभर कमाई कशी करू शकेल? म्हणूनच कमवत असतानाच आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची तरतूद आपण करायला हवी.यासाठी बाजारात अनेक बचत व गुंतवणूक योजना उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसतं.  अशा अनेक योजनांपैकी कोणती निवडावी? तर ती निवड सजगतेने करायला हवी.कारण आपल्या मेहनतीचा पैसा आपण गुंतवणार असतो. अशा सगळ्या योजनांमध्ये सर्वात खात्रीशीर म्हणता येतात, भारतीय टपाल खात्याच्या काही योजना. अशापैकीच एक आहे PPF योजना अर्थात सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी योजना. 

सुकन्या समृद्धी योजना वि. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी

Reading Time: 3 minutesएसएसवाय ही दीर्घ मुदतीच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली चांगली योजना आहे.  ही योजना विशेषतः आपल्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टीने लाभदायक योजना आहे. परंतु, इतक्या दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज वाटत नसल्यास पीपीएफ हा एक चांगला पर्याय आहे. वेळेची लवचिकता देणारा पीपीएफ योजना उपयुक्त असून यामध्ये कोणीही गुंतवणूक  करू शकते. दोन्ही योजना कर बचतीच्या उत्तम मार्गांपैकी आहेत. कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा, हे मात्र प्रत्येकाने आपआपल्या गरजांचा विचार करून ठरवावे. संभ्रमाच्या वेळी अर्थाताज्ञाचा सल्ला घ्यायला हरकत नाही.