होम लोन टॉप-अप की वैयक्तिक कर्ज?
Reading Time: 3 minutesआपल्या आर्थिक अडचणीच्या वेळी आपण कर्ज घेतो आणि आपली निकड भागवतो. पण “कोणते कर्ज कोणत्या वेळी घ्यावे? कोणते कर्ज कमी लाभदायक आहे? व्याजदर काय आहे? कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यावे? एकावर एक कर्ज घ्यावे का? आणि बरंच काय काय… अर्थशिक्षित व्यक्ती या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि मगच कर्ज घेण्याचा निर्णय घेते. तुम्हीही अर्थसाक्षर होऊ इच्छिता? तर मग सर्वात महत्वाची पायरी म्हणजे तुमच्या समोर असणाऱ्या पर्यायांची तुलना करून बघा. या तुलनात्मक अभ्यासातून कोणते एक असं उत्तर येत नाही. प्रत्येकाच्या गरजा आणि अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यानुसार प्रत्येकाने ठरवावे की त्यांना कोणते कर्ज घ्यायचे आहे. हो पण त्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या पर्यायांमध्ये तुलना करून आपल्यासाठी योग्य काय हे ठरवणे महत्वाचे आहे. ते कसं? ते आपण या लेखात पाहू.