होम लोन टॉप-अप की वैयक्तिक कर्ज?

Reading Time: 3 minutes आपल्या आर्थिक अडचणीच्या वेळी आपण कर्ज घेतो आणि आपली निकड भागवतो. पण “कोणते कर्ज कोणत्या वेळी घ्यावे? कोणते कर्ज कमी लाभदायक आहे? व्याजदर काय आहे? कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यावे? एकावर एक कर्ज घ्यावे का? आणि बरंच काय काय… अर्थशिक्षित व्यक्ती या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि मगच कर्ज घेण्याचा निर्णय घेते. तुम्हीही अर्थसाक्षर होऊ इच्छिता? तर मग सर्वात महत्वाची पायरी म्हणजे तुमच्या समोर असणाऱ्या पर्यायांची तुलना करून बघा. या तुलनात्मक अभ्यासातून कोणते एक असं उत्तर येत नाही. प्रत्येकाच्या गरजा आणि अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यानुसार प्रत्येकाने ठरवावे की त्यांना कोणते कर्ज घ्यायचे आहे. हो पण त्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या पर्यायांमध्ये तुलना करून आपल्यासाठी योग्य काय हे ठरवणे महत्वाचे आहे. ते कसं? ते आपण या लेखात पाहू. 

गृहकर्ज हस्तांतरण करण्यापूर्वी विचारात घ्या या ५ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutes गृहकर्ज हस्तांतरण  गृहकर्ज हस्तांतरण हा खूप मोठा निर्णय असतो. तो घेताना बऱ्याच…

कर्ज घेतलंय? व्याजदर तपासा!

Reading Time: 3 minutes गृहकर्ज घेऊन वर्षानुवर्षे ईएमआय (EMI) भरत असणाऱ्या अनेक ग्राहकांना आपण किती दराने व्याज भरतोय याचाच विसर पडतो. बाजारात किती दर चालु आहे किंवा आपले क्रेडिट रेटिंग अथवा सिबिल (CIBIL) काय आणि त्यानुसार आपल्याला किती कमी दर मिळू शकतो, किंबहुना अशा कमी दरामुळे दीर्घकाळात केवढा फायदा पदरात पडतो, याची माहिती शोधण्याची तसदी फार कमी लोक घेतात.

गृहकर्ज परतफेड – एक वेगळा विचार

Reading Time: 4 minutes ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार कर्ज कोणाकडून घ्यावे, यासंबंधीचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. या कर्जास उपलब्ध असलेल्या करसवलतींचा करदेयतेच्या दृष्टीने कर्जदारास फायदा करून घेता येतो. आपल्यावर कोणाचेही कर्ज असू नये, अगदीच घेण्याची वेळ आलीच तर ते लवकरात लवकर फेडून टाकावे अशा रीतीने आपल्यावर झालेले पिढीजात संस्कार आपली आर्थिक क्षमता वाढल्यावर स्वस्थ बसू देत नाहीत अनेक जण त्यांना उपलब्ध असलेले पर्याय वापरून अंशतः अथवा पूर्णतः लवकरात लवकर कर्जमुक्त कसे होता येईल याचा प्रयत्न करतात. या शिवाय काही पर्याय आहे का? या संबंधीचा हा वेगळा विचार –