म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २० (अंतिम भाग)

Reading Time: 2 minutes ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदराच्या आजच्या अंतिम भागात आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडाच्या फॅक्टशीट” विषयी. फॅक्टशीट म्हणजे एक रिपोर्ट असतो जो प्रत्येक म्युच्युअल फंड दर महिन्याला प्रकाशित करतात. यामध्ये आदल्या महिन्यात झालेल्या कर्जरोखे आणि समभागबाजारातील बदलाचा आढावा दिलेला असतो. जिथे फंड मॅनेजर आपल्याला विदेशी तसेच भारतातील घडामोडींचे विश्लेषण करून त्याचा नजीकच्या काळात म्युच्युअल फंडावर काय परिणाम होईल त्याबद्दल माहिती देतो.