वैयक्तिक अपघात विमा – काळाची गरज !

Reading Time: 6 minutes एका माहितीनुसार भारतामध्ये दर तासाला ५५ अपघात होतात. म्हणजे जवळपास मिनिटाला एका अपघाताची नोंद होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१६ मध्ये देशात पाच लाख अपघात झाले. परिणामी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही भारतात सर्वाधिक आहे. हे पाहता वैयक्तिक अपघात विमा गरजेचा आहे.

आरोग्य विम्यावर बोलू काही…

Reading Time: 5 minutes सर्वच लोक आर्थिक दृष्टीने सक्षम नाहीत, की जे मोठ्या वैद्यकीय उपचारांचा खर्च पेलू शकतील. दुर्दैवाने मग लोक आपले सोने, शेती (प्रॉपर्टी) आणि इतर मौल्यवान गोष्टी विकतात, भविष्य काळासाठी केलेल्या गुंतवणुकीला अशा प्रकारे हात लावला जातो. वेळप्रसंगी इतरांकडून कर्ज घेतले जाते. अतिशय किरकोळ प्रीमियम भरून घेतलेला आरोग्य विमा तुमची जिद्दीने केलेली बचत व भवितव्य सुरक्षित करू शकतो.

सेकंड होम की म्युच्युअल फंडचा ई-फ्लॅट?

Reading Time: 3 minutes ढोबळमानाने तुम्हाला तुमच्या रियल इस्टेट फ्लॅटमधून वार्षिक उत्पन्न जर ३% पेक्षा कमी येत असेल तर, ती गुंतवणूक नक्कीच फायदेशीर नाही. तसेच, समजा तुम्हाला तुमच्या फ्लॅटच्या गुंतवणूकीमधील रक्कम ठराविक अथवा आंशिक हवी असेल तर ते मात्र शक्य नसते. म्युच्युअल फंडाच्या ‘ई- फ्लॅट’मधील रक्कम तुम्ही अंशतः देखील काढू शकता, हा फरक आपण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

संपत्ति निर्माणाचा राजमार्ग: एसआयपी

Reading Time: 4 minutes जागतिक गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांनी वयाच्या ११ व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. आपण बँकांच्या मुदतठेवी, बँक व पोस्टल आरडी, विमा या पारंपरिक बचतीला आर्थिक ज्ञान नसल्याने गुंतवणूक समजतो. अशा प्रकारची गुंतवणूक महागाई निर्देशांकापेक्षा अधिक परतावा देऊ शकत नाहीत. म्हणूनच या बचत गुंतवणुकीत परावर्तित केल्यास दीर्घकालीन संपत्ती निर्माण होईल. आपण विमा पॉलिसीसाठी वीस वर्षे सहज देतो . मग असा कालावधी “म्युच्युअल फंड्स सही हैं..” साठी का देत नाही?

टर्म इन्शुरन्सबद्दल सारे काही

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनात टर्म इन्शुरन्सला (शुद्ध विमा) खूप महत्त्व आहे. घरातील कमावत्या कर्त्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास परिवारास आर्थिक दृष्टीने सुरक्षित करण्यासाठी हा सर्वात सोपा व प्रभावशाली उपाय आहे. सर्व कमावत्या  व्यक्तींचा टर्म इन्शुरन्स असायलाच हवा. कारण कमावती व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या परिवारातील सदस्यांची जीवनशैली सुरळीत राहण्यासाठी हा विमा महत्वपूर्ण ठरतो.

आर्थिक नियोजनाचे मूलमंत्र

Reading Time: 3 minutes विमा ही गुंतवणूक नव्हे. खरेतर शालेय जीवनापासून अर्थसाक्षरतेचे धडे गिरवले जाणे आवश्यक आहे. आता कुठे नववी व दहावीत म्युच्युअल फंडाबद्दल पाठ समाविष्ट केला गेलाय. पोस्टल  व बँक आर. डी., पारंपरिक विमा, मुदत ठेवी, सोन्यातील गुंतवणूक महागाईला पार करू शकत नाही. बँकेत सात टक्के परतावा घेऊन सात टक्यांच्या महागाईला आपण सामोरे कसे जाणार?