Life Insurance: जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचत

Reading Time: 3 minutes जीवन विमा पॉलिसी आयुष्यातील अत्यंत आवश्यक आणि अविभाज्य भाग तर आहेच शिवाय आजच्या युगात त्याकडे उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणूनही बघितले जाते. ही पॉलिसी केवळ मृत्यूपश्चात कव्हरेज पुरवत नाही तर तात्पुरते अथवा कायमस्वरूपी शारीरिक अपंगत्व आल्यास त्यासाठीही या पॉलिसी अंतर्गत कव्हरेज मिळते. गुंतवणूक व कर-लाभ (Tax benefit) एकत्रीतपणे मिळवून देणारा एक अत्यंत आवश्यक पर्याय म्हणजे जीवन विमा पॉलिसी.

गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग १

Reading Time: 3 minutes गुंतवणूक हा शब्द वरवर जरी खूप सोपा वाटत असला तरी प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तसेच आपल्या भावी गरजांनुसार योग्य त्या गुंतवणूक पर्यायांचा विचार केला पाहिजे. सामान्य गुंतवणूकदार सहसा योग्य नियोजन न करता काहीवेळा झटपट श्रीमंत होण्याचा हव्यासापोटी फसवणुकीच्या योजनांना बळी पडतात व आपले मुद्दलही गमावून बसतात. गुंतवणूकदारांनी अशा कोणत्याही फसवणुकीला बळी न पडता आपल्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय निवडावा ह्या हेतूने आपल्याला उपलब्ध असलेले गुंतवणूक पर्याय पाहूया.

General Insurance -सर्वसाधारण विमा योजनेचे विविध प्रकार

Reading Time: 3 minutes विविध प्रकारच्या धोक्यातून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा काढला जातो,  हे आपल्याला माहीत आहेच. विम्याद्वारे ही भरपाई पैशांच्या स्वरूपात केली जाते. आयुष्याची अशाश्वतता ही जीवनविमा (Life insurance) घेऊन सुरक्षित केली जाते तर इतर सर्व गोष्टीतील धोका हा सर्वसाधारण विमा योजना (General Insurance) घेऊन सुरक्षित केला जातो. असे अनेक प्रकारचे धोके निश्चित करून त्यावर मात करण्यासाठी सर्वसाधारण विमा घेतला जातो. हा ग्राहक आणि विमाकंपनी यातील कायदेशीर करार असून उभयपक्षी यातील अटींचे पालन करावे लागते. या योजनांची मुदत सर्वसाधारण पणे एक वर्ष असून क्वचित २/३  वर्षाचीही असू शकते. यातील काही योजना या कायद्याने आवश्यक असून अनेक योजना ऐच्छिक आहेत.

Types of Life Insurance: जीवनविमा योजनेचे विविध प्रकार

Reading Time: 3 minutes भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा विमा व्यवसाय हा खाजगी क्षेत्राकडे होता. त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात येऊन तो भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे एकवटला. नंतर खाजगी क्षेत्राला परवानगी देण्यात आली आणि एक वर्तुळ पूर्ण झाले. यापूर्वी ‘आयुर्विम्याला पर्याय नाही’ असे भारतीय आयुर्विमा महामंडाळाचे घोषवाक्य होते. अधिकाधिक लोकांनी स्वतःहून जीवनविमा घेऊन आपल्या आयुष्याच्या अशाश्वततेवर मात मिळवल्याचे समाधान मिळवावे, असा त्यामागील हेतू होता. लोकांची क्रयशक्ती एवढी कमी होती की आपल्या आयुष्याचा जोखमीकरिता काही रक्कम खर्च करावी, हे त्यांच्या गळी उतरवणे खूप कठीण होते. अनेक योजनांना बचतीची जोड देऊन विमा देण्यात एल आय सी (LIC) ला यश मिळाले.