Reading Time: 3 minutes

गुंतवणूक हा शब्द वरवर जरी खूप सोपा वाटत असला तरी प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तसेच आपल्या भावी गरजांनुसार योग्य त्या गुंतवणूक पर्यायांचा विचार केला पाहिजे. सामान्य गुंतवणूकदार सहसा योग्य नियोजन न करता काहीवेळा झटपट श्रीमंत होण्याचा हव्यासापोटी फसवणुकीच्या योजनांना बळी पडतात व आपले मुद्दलही गमावून बसतात. गुंतवणूकदारांनी अशा कोणत्याही फसवणुकीला बळी न पडता आपल्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय निवडावा ह्या हेतूने आपल्याला उपलब्ध असलेले गुंतवणूक पर्याय पाहूया.

१) बँक :

 • बचत खाते , एफ. डी., आर. डी.  सरकारी बँकांचे दर हे साधारण खाजगी किंवा सहकारी बँकांपेक्षा कमी असतात मात्र त्यात जोखीम नसते. सहकारी बँका जरी जास्त दर देत असतील तरी त्यात गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. बँकांमधून मिळणाऱ्या व्याजावर ठराविक रकमेच्या वर आपल्याला जास्त कर भरावा लागतो.

२) कंपनी एफ डी :

 • बऱ्याच कंपन्या आपल्या व्यवसायासाठी एफ डी च्या रूपाने भांडवल उभारत असतात. ह्या कंपन्यांचा एफ डी चा व्याज दर हा त्या कंपनीच्या बाजारातील पत मानांकनावर अवलंबून असतो.
 • उच्च मानांकन असलेल्या कंपन्या कमी व्याज दर देतात व कमी मानांकन असलेल्या कंपन्या जास्त व्याज दर देतात. हे व्याज करपात्र असते.
 • सहसा ‘कंपनीच्या एफ डी’मधून ‘बँक एफ डी’पेक्षा जास्त परतावा मिळतो. मात्र तरलता (लिक्विडीटी) खूप कमी असते.

३) पोस्टाच्या बचत योजना :

 • पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपण या योजनांचा लाभ घेऊ शकतो. बचत खाते, ५ वर्षांची  आर.डी., टाईम डिपॉजिट, मासिक आवर्ती योजना , वरिष्ठ नागरिक बचत योजना, १५ वर्षाचे पी.पी.एफ. खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजना अशा निरनिराळ्या योजना असतात.
 • पोस्टाच्या योजनांचे व्याज दर जरी कमी असले तरी सरकारी हमी मूळे कमी जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांचा कल ह्या योजनांकडे असतो. यामध्ये काही योजनांना करसवलत असते तर काही योजनांमध्ये कर भरावा लागतो.

४) विमा योजना:

 • विमा योजना तीन प्रकारच्या असतात,

             १. जीवन विमा,

            २. साधारण विमा आणि

           ३. आरोग्य विमा.

 • आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीने जीवन विमा करणे आवश्यक आहे. जीवन विमा मध्ये  एन्डॉवमेंट योजना, मनी बॅक योजना, व्होल लाईफ योजना आणि टर्म योजना अशा निरनिराळ्या योजना असतात.
 • मात्र या योजनांमध्ये फक्त विमा गरज म्हणून पाहावे, कारण या योजनांतील परतावा हा खूप कमी असतो. टर्म योजनेमध्ये आपल्याला काहीही परतावा मिळत नाही मात्र टर्म योजनांमध्ये कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त विमा सरंक्षण मिळते.  
 • आपल्या वैद्यकीय खर्चाच्या तरतुदीसाठी योग्य आरोग्य विमा घेणे सुद्धा आवश्यक आहे. आपल्या घरातील सामान, दागिने, वाहन ,मौल्यवान वस्तूंसाठी आपण साधारण विमा करणे जरुरीचे आहे. जेणेकरून मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यास आपले नुकसान होत नाही.

५) म्युच्युअल फंड:  

 • यात मुख्यत्वे तीन प्रकारच्या गुंतवणूक योजना असतात.

          अ) कर्जरोखे संबंधित योजना (Debt  Fund),

          ब) समभाग संबंधित योजना (Equity Fund),

          क) कर्जरोखे व समभाग मिश्रित योजना (Hybrid Fund).

 • या तीन मुख्य प्रकारामध्ये एकूण ३६ प्रकारच्या निरनिराळ्या योजना असतात.
 • वेगवेगळ्या वयोगटातील तसेच जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार या योजनांची मांडणी केलेली असते. गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठी योग्य प्रकारच्या योजनांची संयोजन करून आपल्या धनवृद्धी साठी फायदा करून घेता येतो.
 • म्युच्युअल फंडच्या योजना बाजारातील चढ-उताराशी निगडित असल्याने यामध्ये निश्चित असा परतावा नसतो. मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड चांगला पर्याय ठरू शकतो. म्युच्युअल फंड च्या योजनांमध्ये कर सवलतीही जास्त असतात.
 • म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याकरिता एक रकमी गुंतवणुकीबरोबरच एस.आय.पी (SIP – सिस्टिमॅटिव्ह इन्व्हेस्टमेंट प्लॅन) किंवा एस.टी.पी. (STP – सिस्टिमॅटिव्ह ट्रान्सफर प्लॅन) सारख्या सुविधा असतात, जेणे करून लहान गुंतवणूकदार दर महिना छोटी छोटी गुंतवणूक हि करू शकतात.
 • ज्या जेष्ठ नागरिक दरमहा नियमित उत्पन्न हवे असेल त्यांना एस. डब्लू.पी. (SWP – सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन) ची सुविधा ही असते.
 • आजच्या काळात म्युच्युअल फंड हा सर्वात जास्त पसंतीचा गुंतवणूक पर्याय आहे. यासाठी डिमॅट अकाउंट असणे आवश्यक नसते व तज्ज्ञ फंड मॅनेजर्स आपल्या गुंतवणूकीची काळजी घेतात.

 

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2Tdkbuz )

सर्वसाधारण विमायोजना विविध प्रकारचक्रवाढ व्याजची जादू – भाग ३,  चक्रवाढ व्याजाची जादू , चक्रवाढ व्याजाची जादू – भाग २,  आर्थिक नियोजनातून श्रीमंती,  राष्ट्रीय पेन्शन योजना ,  सुकन्या समृद्धी योजना – भाग १ , सुकन्या समृद्धी योजना- नियम व वैशिष्ठ्ये ,  सुकन्या समृद्धी योजना – भाग ३म्युच्युअल फंड योजनेसबंधी माहितीमूल्य आधारित गुंतवणूक – समृद्धीचा महामार्ग

 

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…