Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutesगुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.

यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये- भाग १

Reading Time: 2 minutesजेव्हा कधी गुंतवणूक, पैसे, संपत्ती, मालमत्ता वगैरे विषय निघतात साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर वॉरन बफेट, राकेश झुनझुनवाला वगैरे गुंतवणूकदारांची नावे येतात. या लोकांनी यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी काय केलं? त्यांच्याकडे नक्की काय अशी गुरुकिल्ली होती की ज्याने ही संपत्तीची दारं उघडली असं एक कुतूहल असतंच. तर या आणि पुढच्या लेखात आपण अशाच काही आर्थिक यशाच्या गुरुकिल्ल्यांचा उहापोह करणार आहोत. 

म्युच्युअल फंड: माझ्या फंडाची किंमत शून्य होईल का?

Reading Time: 4 minutesमी आर्थिक विषयातील तज्ज्ञ आजिबात नाही, फक्त या विषयाची आवड त्यामुळे थोडी अद्ययावत माहिती आणि कठीण गोष्ट जरा सोपी करून सांगता येणे हे माझे भांडवल, त्या जोरावर मला समजेल ते सर्वाना सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. वाचकांच्या प्रश्नांना त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊन माझ्या समजुतीप्रमाणे मी उत्तरे दिली. या सर्व लोकांचे त्यांनी समाधानही झाले असावे असे मला जाणवले. तरीही एक प्रश्न मला सतत टोचत राहिला की माझ्या म्युच्युअल फंड युनिटची किंमत शून्य होईल का?

मी घर का व कसे खरेदी करू?

Reading Time: 6 minutesज्या व्यक्ती स्वतःचे घर शोधत आहेत, त्यांनी कोण काय म्हणतंय याचा विचार करण्याऐवजी जरा स्वतःचे डोकं वापरावं. तुमच्या गरजा जाणून घ्या, पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये घर हे कधीही सर्वात महाग उत्पादन असणार आहे. त्यामुळेच तुमचा खिसा पाहून तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत याचा काळजीपूर्वक विचार करा आणि तुमची खात्री झाली की लवकरात लवकर खरेदी करा.  

Rakesh Jhunjhunwala: राकेश झुनझुनवाला – भारतीय शेअर बाजारातील बादशाह

Reading Time: 3 minutesघरात मित्रांबरोबर शेअर्स, स्टॉक मार्केट बद्दलच्या गप्पा लहान मुलाच्या कानावर पडतात आणि तो मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की शेअर्सच्या किमती का बदलतात, त्याच्यावर त्याचे वडील त्याला उत्तर द्यायचे न टाळता सांगतात की, “जा, वर्तमानपत्रामध्ये ग्वालियर-रेयॉन बद्दल काही बातमी आली आहे का बघ आणि असेल तर त्याच्या शेअर्सची किंमत नक्कीच बदलणार!” या एका वाक्यावरून त्या मुलामध्ये शेअर मार्केटबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि एक दिवस तो याच शेअर मार्केटचा राजा बनतो.अगदी फिल्मी वाटणारी ही खरी गोष्ट आहे, एका सर्वसामान्य भारतीय कुटुंबातील राकेश झुनझुनवाला यांची.

संकटकाळातील आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutesवर्षांची सुरुवातच, बहुतेक सर्वच क्षेत्रात कमी झालेल्या मागणीने झाली. यानंतर जे आरोग्य संकट आले त्याचे रूपांतर आर्थिक संकटात कधी झाले ते समजलेच नाही. या संकटकाळातील आर्थिक नियोजन करताना अनेक गोष्टींचा पुनर्विचार आवश्यक आहे. यापुढे नव्याने आर्थिक नियोजन अधिक काळजीपूर्वक करायला हवे, त्याची पूर्वतयारी लगेचच करायला हवी. यात काही चुकी झाल्यास त्याचा आणखी मोठा फटका आपल्याला बसू शकतो.

अमेरिका-चीनमधील तणावाचे बाजारावरील परिणाम

Reading Time: 2 minutesअमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी चीनने ही महामारी पद्धतशीरपणे रुजवल्याचे पुरावे असल्याचे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट यांनी स्पष्ट केले. अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या आर्थिक शक्तींमध्ये तणावातून युद्ध भडकले असताना सोमवारी स्पॉट गोल्डच्या किंमतीत ०.१४ टक्क्यांनी वाढ झाली. आजच्या लेखात आपण अमेरिका-चीनमधील तणावाचे शेअर बाजारावर झालेल्या परिणामांची माहिती घेऊया.

गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे

Reading Time: 3 minutesवॉरन बफे यांच्या मते, गुंतवणुकीचे फायदे आज नाही भविष्यात दिसून येतात, म्हणून वेळीच गुंतवणुकीची सुरुवात केल्याने ठराविक आर्थिक शिस्त लागते. भविष्याचं नियोजन करता येतं. सर्व लोक समान पर्यायांचा विचार करीत नाहीत. प्रत्येकाचे विचार, गुंतवणुकीची कारणे आणि उद्दिष्ट्ये वेगळी असतात.  आपण या लेखात गुंतवणुकीची प्रमुख कारणे पाहणार आहोत. 

म्युच्युअल फंड सही कितने?

Reading Time: 3 minutesम्युचुअल फंड गुंतवणूक करताना त्यातील धोके नेहमीच समजून घेणे आवश्यक आहे. गेले काही दिवस मी विविध लेखातून तुलनात्मक दृष्ट्या सुरक्षित, मुदत ठेवीस पर्याय समजले जाणारे, आयकराच्या दृष्टीने करदेयता कमी करणारे असे बहुगुणी ‘डेट फंड’, भविष्यात त्यांनी गुंतवलेल्या कर्जरोख्यातून व्याज, मुद्दल न मिळण्याच्या शक्यतेने अधिक धोकादायक ठरतील असा अंदाज केला होता. 

फ्रॅंकलिन टेम्पल्टन इंडिया – जरा चुकीचे, जरा बरोबर…

Reading Time: 3 minutesशुक्रवारी फ्रॅंकलिन टेम्पल्टन इंडिया म्युच्युअल फंड या आघाडीच्या घराण्याने त्यांच्या रोखे गटातील ६ योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. आजवर पतसंस्था, बँका ठेवीदारांचे पैसे देत नाही, हे सर्वसामान्य लोक ऐकून होते. पण सर्वोत्तम तरलता देणारी गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंड अशी बिरुदावली असलेल्या योजना जेव्हा लॉक डाऊन होऊ लागतात तेव्हा सामान्य गुंतवणूकदाराने काय करावे?