महापूर आणि आयकर विवरणपत्रासाठीची (ITR) मुदतवाढ

Reading Time: 2 minutes३१ ऑगस्ट २०१९ ही आयकर विवरणपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. परंतु सध्या ठिकठिकाणे आलेले महापूर आणि त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन याचा विचार करता, किमान पूरग्रस्तांसाठी आयकर विवरणपत्र (ITR) भरून देण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक होतं. सदर मुदत वाढवून देण्यासाठी कायदेशीर मागणीही करण्यात आली होती. परंतु त्याकडे सरकारकडून सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे.

पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यायचा आहे? मग हे वाचा

Reading Time: 4 minutesनिसर्गाचा कोप म्हणजे काय याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्रासाहित अन्य राज्येही घेत आहेत. खरंतर निसर्गाचं रौद्र रूप बघण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पण प्रत्येकवेळी आपला भारत देश येणाऱ्या संकटाला धीराने तोंड देत आला आहे. अशा प्रसंगातच ‘माणुसकी’ नावाच्या धर्माचे प्रकर्षाने दर्शन होते. मदत करणे आवश्यकच आहे. फक्त मदत करताना खात्रीशीर संस्थेच्या अथवा व्यक्तीच्या हातातच मदत सोपवा कारण आपल्याकडे मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.