Reading Time: 2 minutes

लोकांनी, लोकांचे, लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. लोकशाही हा देशाचा चौथा खांब आहे. ती खंबीर सत्ताधारी पक्ष आणि तत्वनिष्ठ विरोधक या दोन्हींच्या आधारे सुरळीत चालू राहते. परंतु, आज परिस्थिती बदलली आहे. निवडलेला प्रत्येक प्रतिनिधी आणि पदाधिकारी फक्त सत्ताधारी पक्षात प्रवेशाची संधी कधी मिळेल या प्रतीक्षेत असतात. 

याच कारणामुळे विरोधकांचा आवाज काहीसा मंदावला आहे. कारण सत्ताधारी पक्षामध्ये सामील होण्याची संधी न मिळण्याची अथवा नाकारले जाण्याची भीती आहे. 

इतर विरोधक ईडी किंवा कर विभागाच्या ससेमिऱ्यामुळे गोधळलेले व घाबरलेले आहेत. या परिस्थितीत सत्ताधारी पक्षाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. पण याच वेळी त्यांनी सर्वसामान्य जनतेचा विचार करणेही आवश्यक आहे.  काही निर्णय सर्वसामान्य जनतेच्या अडचणींचा विचार करून घेतले जाणं अभिप्रेत आहे. 

  • सत्ता मिळाली असली तरी त्याचा उपयोग लोकहितासाठी करणे आवश्यक आहे. देशहित आणि लोकहित एकत्र साधताना होणारी तारवरची कसरत सांभाळणे हे सत्ताधारी पक्षाचं आद्य कर्तव्य आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. तसंच सत्ताधाऱ्यांचा अति आत्मविश्वासही देशहिताला घातक ठरू शकतो.
  • राजकारणातील या घडामोडींमुळे नकळतपणे देशातील नागरिकांनाच त्रास सहन करावा लागत आहे. 
  • सध्याच्या परिस्थितीचा विचार करूया. ३१ ऑगस्ट २०१९ ही आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळाल्यानंतरची शेवटची तारीख आहे. परंतु सध्या ठिकठिकाणे आलेले महापूर आणि त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन याचा विचार करता, किमान पूरग्रस्तांसाठी आयकर विवरणपत्र (ITR) भरून देण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक होतं. 
  • सदर मुदत वाढवून देण्यासाठी कायदेशीर मागणीही करण्यात आली होती. परंतु त्याकडे सरकारकडून सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. आपत्तीग्रस्त समाजाकडून आलेली मागणी ही कायद्याचा व नीतिमत्तेचा विचार करता अजिबात चुकीची नव्हती. तसेच, काही ठिकाणी कर विभागाच्या वेबसाईटमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे आयकर विवरणपत्र दाखल करताना नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु सरकार मात्र या पार्श्वभूमीचा विचार न करता कर वसुली करण्यामध्येच व्यस्त आहे. 
  • सरकार फक्त कर कसा जमा होईल याचा विचार करत आहे. परंतु नैसर्गिक आपत्ती व त्याद्वारे उद्भवलेली परिस्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे. 
  • अशा परिस्थितीत व्यापारी व व्यावसायिक पुढाकार घेऊन मुदतवाढीसाठी प्रयत्न करत आहेत.  त्यांच्या प्रयत्नांना यश यावं एवढीच प्रार्थना आहे. 
  • शेवटचा दिवशी मुदतवाढ मिळाल्यास कायद्याचे पालन करणारे नागरिक आणि व्यावसायिक यांचे नुकसान होऊ शकते. जर असंच घडणार असेल तर, ‘फिट इंडिया’ आंदोलन सुरू करण्यामागे नक्की हेतू काय आहे? या समाजाला पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधानां द्यावंच लागेल. 

– सी.ए. चंद्रशेखर चितळे

(श्री.चंद्रशेखर चितळे चार्टर्ड अकाउंटंट असून दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस् ऑफ इंडियाचे सेंट्रल कौन्सिल सदस्य आहेत.)

 मागिल आर्थिक वर्षांचे आय.टी.आर.(ITR) भरू शकतो का?

बँक व्यवहार, परदेशी सहली आणि वीज बिल ठरवणार तुमचा ‘आयटीआर’

पगारदारांनो आयकर विवरणपत्र भरताना ही काळजी घ्या

आयकर रिटर्न वेळेत दाखल करण्याचे ९ फायदे

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:  https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutes व्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.