Browsing Tag
विमा संरक्षण
4 posts
बँक ठेव सुरक्षा मर्यादेत भरीव वाढ
Reading Time: 3 minutesपीएमसी बँक घोटाळ्यानंतर बँक ठेव सुरक्षा मर्यादा वाढवायला हवी या मागणीस जास्त जोर आला. वास्तविकपणे सन २०११ मध्ये स्थापन केलेल्या दामोदरन कमिटीने आपल्या अहवालात ही मर्यादा ५ लाख रुपये एवढी वाढवावी. बँकेस आजारी घोषित केल्यावर ताबडतोब ही रक्कम ग्राहकांना मिळायला हवी अशी शिफारस केली होती. यापैकी ठेव सुरक्षा मर्यादा वाढवल्याने फक्त अर्धीच मागणी पूर्ण होत आहे आणि १ मे १९९३ नंतर आता १ एप्रिल २०२० पासून म्हणजेच जवळपास २७ वर्षांनी ही मर्यादा भरीव प्रमाणात वाढवली जात आहे.
बँक बुडाली? किती पैसे परत मिळतील? जाणून घ्या सगळे नियम
Reading Time: 4 minutesगेल्या काही वर्षात बँक बुडण्याची साथच आलेली आहे. पोल्ट्रीच्या कोंबड्या जशा एका रात्रीत मारतात तशी एखादी बँक एका रात्रीतच मरून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून खातेदार रागावून, चिडून बँकेकडे धाव घेतात. त्यांना फक्त १ हजार रुपये काढण्याची परवानगी मिळते. पेपर आणि टीव्हीमध्ये गवगवा होतो. दोषारोपण होते. काहीच दिवसात जनता हे सगळे विसरून जाते न जाते, तोच दुसरी बँक बुडते. वाचकहो अशावेळी सरकार काय संरक्षण देते हे जाणून घेण्यासाठी आजचा हा लेख वाचा…
टर्म इन्शुरन्सबद्दल सारे काही
Reading Time: 3 minutesआर्थिक नियोजनात टर्म इन्शुरन्सला (शुद्ध विमा) खूप महत्त्व आहे. घरातील कमावत्या कर्त्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास परिवारास आर्थिक दृष्टीने सुरक्षित करण्यासाठी हा सर्वात सोपा व प्रभावशाली उपाय आहे. सर्व कमावत्या व्यक्तींचा टर्म इन्शुरन्स असायलाच हवा. कारण कमावती व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या परिवारातील सदस्यांची जीवनशैली सुरळीत राहण्यासाठी हा विमा महत्वपूर्ण ठरतो.