Reading Time: 3 minutes

महाभारत युधिष्ठिरने म्हटले आहे की, “दुनिया का सबसे बडा आश्चर्य ये है की हम रोज मृत्यू होते हूंए देखते हैं फिर भी ऐसे व्यवहार करते हैं की हमे अनंत काल का जीवन मिला हो !”

युधिष्ठिराने सांगितलेले सत्य जर समजले तर प्रत्येक व्यक्ती स्वतःला पुरेसे विमा संरक्षण घेईल. 

टर्म इन्शुरन्स (शुद्ध विमा):

 • आर्थिक नियोजनात टर्म इन्शुरन्सला (शुद्ध विमा) खूप महत्त्व आहे. घरातील कमावत्या कर्त्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास परिवारास आर्थिक दृष्टीने सुरक्षित करण्यासाठी हा सर्वात सोपा व प्रभावशाली उपाय आहे.
 • सर्व कमावत्या व्यक्तींचा टर्म इन्शुरन्स असायलाच हवा. कारण कमावती व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या परिवारातील सदस्यांची जीवनशैली सुरळीत राहण्यासाठी हा विमा महत्वपूर्ण ठरतो.
 • शुद्ध विमा संरक्षण घेतल्यानंतरची काळजी विमा संरक्षण नियमित रहाण्यासाठी आपण नियमितपणे प्रीमियम भरणे आवश्यक असते.

मृत्यू नंतर उत्पन्न भरपाईची हमी:

 • टर्म इन्शुरन्स ही एक शुद्ध विमा संरक्षण देणारी नितांत सुंदर अशी योजना आहे. विमाधारकाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तो वारसाला / लाभार्थीस विमा संरक्षणाचे पैसे देऊन त्यांची मदत करतो.
 • टर्म इन्शुरन्सची कोणतीही परिपक्वता रक्कम मिळत नाही. परंतु आकस्मिक मृत्यू झाल्यास हा विमा महत्वपूर्ण भूमिका निभावतो. या विम्याद्वारे मिळालेल्या पैशांतून मुला – मुलींचे शिक्षण, लग्न, परिवारावर असलेले कर्ज चुकते करणे, इत्यादी कामे करता येतात.
 • हा विमा आपल्या पत्नीसाठी उत्पन्नाचा मार्ग ठरू शकतो. जीवनाचा कोणताही भरवसा नसतांना आपला अचानक मृत्यू झाल्यास आपल्या परिवारास यातना सहन कराव्या लागणे कुणासही आवडणार नाही.

स्वस्त , तरीही मोठे विमा संरक्षण:

 • आपण जेवढ्या कमी वयात टर्म इन्शुरन्स घ्याल, तेवढा कमी प्रीमियम तुम्हाला भरावा लागेल. या विम्याचा कालावधी आपण सल्लागाराच्या मदतीने ठरवू शकतो. ५ वर्षे ते ३० वर्षे किंवा आजीवन संरक्षण देणाऱ्या योजनाही आता विविध विमा कंपन्यानी उपलब्ध करून दिल्या आहेत.
 • आपण पारंपरिक विमा योजना घेतल्यास आपल्याला मोठा प्रीमियम भरावा लागतो, शिवाय विमा प्रतिनिधीही गलेलठ्ठ कमिशन मिळवून गब्बर होतो. त्या तुलनेत कमी प्रीमियम असलेला टर्म इंश्युरन्स प्लान घेऊन उर्वरित पैसा आपण गुंतवणूकीकडे वळवू शकतो. एकूणच कमी प्रीमियम मध्ये जास्त विमा संरक्षण मिळविण्यासाठी शुद्ध विमा खरेदी करणे शहानपणाचे ठरते.

करबचत:

 • आयकर कायदा कलम ८० सी अंतर्गत टर्म इन्शुरन्ससाठी भरलेल्या प्रिमियमवर तुम्हाला करसवलत मिळते. मृत्यूदावाही करमुक्त असतो. या विम्याचा प्रिमियम कमी असल्याने तुमचे वाचलेले पैसेही तुम्ही चांगला परतावा देणाऱ्या अन्य गुंतवणूकीसाठी वापरू शकता.

टर्म इंश्युरन्स अर्थात शुद्ध विम्याची गरज:

 • प्रत्येक व्यक्तीला विम्याची गरज नसते. परंतु ज्या व्यक्तीवर आर्थिक जबाबदाऱ्या असतात त्यांनी आपल्या जीवनातील उद्दिष्ट लक्षात घेऊन आर्थिक नियोजकांच्या सल्ल्याने शुद्ध विमा संरक्षण अंगिकारणे आवश्यक असते.
 • ज्या व्यक्तीनी गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज अथवा व्यावसायिक कर्ज घेतले आहे त्यांना तर या विम्याची नितांत आवश्यकता आहे.
 • शुद्ध विमा संरक्षण घेतांना योग्य प्लॅन घेणे महत्वपूर्ण असते. आपल्या जबाबदाऱ्या व त्यानुसार आपल्या मानवी जीवनाची किंमत विचारात घेऊन विमा संरक्षण घेणे हे एक कठीण काम आहे.
 • प्रत्येक विमा कंपन्याच्या योजनांची वेगवेगळी खासियत असते. अनेक कंपन्या तर त्यांचीच उत्पादने कशी श्रेष्ठ आहे यासाठी कॉल्स सुद्धा करतात. याच ठिकाणी आपल्याला आर्थिक सल्लागार मदत करू शकतो.

विमा संरक्षण घेतांना कोणते निकष विचारात घ्यावेत?

 • विमा खरेदी करण्यापूर्वी पुढील प्रश्न स्वतःला विचारा आणि मग निर्णय घ्या.
 1. आपण संरक्षणासाठी विमा खरेदी करत आहोत का?
 2. आपण गुंतवणुकीसाठी विमा संरक्षण घेत  आहोत का?
 3. आपण फक्त कर वाचविण्यासाठी विमा संरक्षण घेत आहोत का?
 • खरेतर विमा ही गुंतवणूक नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळ्या योजना असतात. आपण फक्त संरक्षणासाठी शुद्ध विमा योजना घेतली पाहिजे.
 • टर्म इन्शुरन्स घेतांना तुमची वैद्यकीय तपासणी घेतली जाते. उत्पन्न व वय यानुसार ती आवश्यक आहे की नाही हे ठरविले जाते. हा विमा घेतांना आपण काही आजार असतील तर लपवू नये.
 • स्मोकर, नॉनस्मोकर अथवा मद्यपान करणाऱ्या व्यक्तींनी प्रामाणिकपणे तसे सांगणे महत्वाचे ठरते. त्यानुसार व वयानुसार या विम्याचा प्रीमियम ठरविला जातो.

टर्म इन्शुरन्स मधील रायडर्स:

काही टर्म इन्शुरन्स मध्ये वेगवेगळे रायडर्स दिलेले असतात.

१) ॲक्सीडेंटल डेथ बेनिफिट रायडर-  अपघाती मृत्यू झाल्यास वाढीव विमा संरक्षण मिळते मात्र यासाठी वाढीव प्रीमियम आकारला जातो.

२) रिफंडेबल टर्म इन्शुरन्स- विमधरकाचा मृत्यू न झाल्यास भरलेला प्रीमियम परत केला जातो. मात्र यासाठी जास्त प्रीमियम आकारला जातो.

३) प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडर- विमधरकास अपंगत्व अथवा काही कारणाने तो शारीरिकदृष्ट्या असमर्थ झाल्यास पॉलिसी समाप्त न होता विमा प्रीमियम कंपनी भरते.

४) क्रिटिकल इलनेस रायडर-  इंश्युरन्स प्लानने ठरवून दिलेल्या क्रिटिकल आजारांपैकी कोणताही आजार उद्धभवल्यास हॉस्पिटलमधील खर्च कंपनी करते व विमा संरक्षण रक्कम विमाधरकाला दिली जाते. मात्र यासाठी ९० ते १८० दिवसांचा वेटींग पिरियड असतो. या पिरियडमध्ये क्रिटिकल इलनेस आला तर क्लेम दिला जात नाही. मात्र या रायडरला मेडीक्लेम समजू नये. या वेटींग पिरियड मध्ये क्रिटिकल इलनेस आला तरी विमाधारक कमीत कमी ३० दिवस हयात असणे आवश्यक असते, तरच हा रायडर लागू होतो.

एकंदरीत कमी प्रीमियममध्ये आपल्या मानवी जीवनाची किंमत ठरवून  वाचलेला पैसा आपण चांगला परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड्स ,बँक , कार्पोरेट मुदतठेवीत गुंतवू शकतो.

विमा योजना घेतल्या नंतर त्याचे दस्तावेज आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी व्यवस्थित ठेवले पाहिजेत. सर्व सदस्यांना यासंदर्भातील माहिती द्यायला हवी. जी व्यक्ती कमावती व जबाबदार आहे व ज्याचे आपल्या परिवारावर नितांत प्रेम आहे त्या प्रत्येकाने टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे.

– सुनील कडलग

9881327686 / 9422855786

kadlaginvestment@gmail.com

(लेखक हे संगमनेर येथे पूर्णवेळ आर्थिक नियोजक म्हणून  कार्यरत असून आपल्या सल्ल्यासाठी आपण वरील ई-मेल वर किंवा भ्रमणध्वनीवर त्यांच्याशी संपर्क साधू शकता.)

जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचत,

कोणता आयुर्विमा घ्यावा? सोचना क्या,जो भी होगा देखा जायेगा !!!,

जीवन विमा आणि आरोग्य विम्यामधील मूलभूत फरक

अर्थसाक्षरद्वारे प्रकाशित होणाऱ्या पुस्तक प्रकाशनाच्या कामात आम्हाला आपलं मोलाचं सहकार्य आवश्यक आहे.  यासाठी फक्त खालील लिंकला क्लिक करून त्यावरील फॉर्म भरून आम्हाला लेखांच्या निवडीसाठी मदत करा.

                  लिंक : http://bit.ly/Question_Form

(अधिक माहितीसाठी आम्हाला info@arthasakshar.com वर संपर्क करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…