Reading Time: 2 minutes

आपण सध्या इलेक्ट्रिक वाहने नियमित रस्त्यावर पाहतो. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या भावांमुळे ई वाहने घेणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. कमी देखभाल, इंधन खर्च आणि शून्य कार्बन डायऑक्साईडमुळे इलेक्ट्रिक वाहने घेणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

आपण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करावे का करू नये हे सुरुवातीला समजत नाही, ती आपण समजून घेणार आहोत. 

आपण इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्वात कमी व्याजदरात वाहन कर्ज देणाऱ्या बँकांची सर्वात आधी माहिती घ्यायला हवी.  

आपण सर्वात आधी इलेक्ट्रिक कार घेण्याचे फायदे जाणून घेऊयात. 

1. इलेक्ट्रिक गाडीला कमी खर्च लागतो – 

 • आपल्याला माहित असेल की इलेक्ट्रिक गाडीला धावण्यासाठी चार्जिंग करावी लागते, त्यानंतरच ती रस्त्यावर पळू शकते. 
 • पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा इलेक्ट्रिक गाडीला लागणारा खर्च हा फार कमी असतो. त्यामुळे आपल्याला गाडीच्या इंधनासाठी फक्त विजेवरच खर्च येतो. 
 • आपण घरच्या घरी इलेक्ट्रिक गाडी चार्ज करू शकता, तसेच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनवरूनही गाडीला चार्जिंग करून घेऊ शकता. 
 1. इलेक्ट्रिक गाडीला कमी देखभाल खर्च येतो – 
 • आपल्याकडे पेट्रोल किंवा डिझेलवरील कार असेल तर दर 3 महिन्याला देखभालीवर खर्च येतो. पण त्या प्रमाणात इलेक्ट्रिक गाडीला लागणारा देखभाल खर्च तुलनेने फार कमी असतो. 
 • इलेक्ट्रिक गाडी बनवतानाच अशा पद्धतीने बनवलेली असते की तिला लागणारा देखभाल खर्च हा फार कमी येतो. त्यामुळे इलेक्ट्रिक गाडी घेणे आपल्याला भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

नक्की वाचा :  Electric cars: आगामी काळात रस्त्यावर धावतील या ५ आकर्षक इलेक्ट्रिक कार

 1. पर्यावरणास अनुकूल – 
 • इलेक्ट्रिक वाहने ही अपारंपरिक ऊर्जा मार्गांचा वापर करतात. त्यामुळे या पद्धतीने पर्यावरण दूषित होत नाही. 
 • इंधनाचे भाव वाढत असले तरी त्याची काळजी न करता आपण पर्यावरणास अनुकूल असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांचीच खरेदी करायला हवी. 
 1. चालवण्यास सोपे इलेक्ट्रिक वाहन – 
 • आपल्याला माहित असेल की इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना कोणताही गिअर नसल्यामुळे ते चालवायला अतिशय सोपे असतात. 
 • आपल्याला पेट्रोल-डिझेल वरची गाडी शिकायला वेळ लागू शकतो, पण इलेक्ट्रिक गाडी शिकायला सोपी असल्यामुळे आपण ती लवकर शिकून घेऊ शकता.

नक्की वाचा : इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची ५ कारणे

 1. कमी खर्चात खरेदी – 
 • आपल्याला इलेक्ट्रिक गाडी घ्यायची असेल तर अतिशय किफायतशीर दरात तिची खरेदी केली जाऊ शकते. 
 • केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी कमी कर आकारल्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांची कमी झाल्या आहेत. त्यामुळे आपण इलेक्ट्रिक गाडीची खरेदी नक्की करायला हवी. 

आपण इलेक्ट्रिक गाडीचे फायदे जाणून घेतले, तसेच आता गाडीचे तोटेही आपण माहिती करून घेणार आहोत. 

 1. पायाभूत सुविधांचा अभाव – 
 • आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रिक गाडी ही घरी चार्ज करता येऊ शकते पण जर ती इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनवर चार्ज केली तर आपल्याला कमी खर्च येऊ शकतो. 
 • आपल्याला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन हायवे सोडून इतर ठिकाणी फार कमी प्रमाणावर आढळून येतील. त्यामुळे इलेक्ट्रिक गाडी घेताना या मुद्याचा विचार होण आवश्यक आहे. 
 1. चार्जिंगला जास्त वेळ लागतो – 
 • आपण पेट्रोल किंवा डिझेल गाडीमध्ये अतिशय कमी वेळेत ते भरू शकता, पण इलेक्ट्रिक चार्जिंग करायला आपल्याला जास्त वेळ लागतो. 
 • आपल्याला इलेक्ट्रिक चार्जिंग करायला कमीत कमी पाऊण ते एक तास एवढा कालावधी लागतो. 
 1. गाडीला मर्यादित ड्रायव्हिंग रेंज असते –
 • आपण एकदा इलेक्ट्रिक गाडी चार्ज केली तर ती आपल्याला 200 ते 400 किलोमीटर इतका प्रवास करता येऊ शकतो. 
 • आपल्याला माहित आहे की, हायवेवर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन असतात पण ग्रामीण भागात चार्जिंग स्टेशन नसल्यामुळे आपण गाडी घेताना विचार करायला हवा. 

नक्की वाचा : Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे ५ गैरसमज

 1. मर्यादित निवड उपलब्ध – 
 • सध्याच्या घडीला चारचाकी इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे ही गाडी घेताना निवडीची शक्यता कमी आहे. 
 • सरकारने इलेक्ट्रिक गाड्यांच्या कंपन्यांना जास्त उत्पादन घेण्याचा सल्ला दिलेला असला तरी सध्या गाड्यांचे पर्याय मात्र कमी आहेत. 
 1. वाहन विम्याची जास्त किंमत  – 
 • आपण इलेक्ट्रिक गाड्यांच्या वाहन विम्याची खरेदी करायला गेल्यावर तो आपल्याला महाग मिळू शकतो. 
 • गाड्यांच्या महागड्या बॅटऱ्या हाय फाय तंत्रज्ञानामुळे गाड्यांच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. 

निष्कर्ष – 

 • इलेक्ट्रिक आणि नॉन इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये एका पर्यायाची निवड करणे ग्राहकाच्या दृष्टीने अवघड असते. 
 • त्यामुळे वरील सर्व गोष्टींचा विचार करूनच गाडी खरेदी करावी, त्यामुळे भविष्यात आपल्याला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही. 

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutes व्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

सर्व नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वीच का आहे?

Reading Time: 3 minutes सरकारने रद्द केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या १०० टक्के नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वी झाली, कारण त्यावर आता कर भरला गेला आणि आता ती एका जागी पडलेली रक्कम बँकेत येवून प्रवाही झाली. नोटबंदीपूर्वीची वाढ ही “रोगट सूज” होती, ती जाऊन देश सशक्त होतो आहे आणि दमदार वाटचालीला सज्ज होतो आहे, हे आता अधिक महत्वाचे !