ब्रँड्सच्या नावामागच्या सुरस कथा 

Reading Time: 3 minutes

ब्रँड्सच्या नावामागच्या सुरस कथा 

‘ब्रँड्सच्या नावामागच्या सुरस कथा’ हे शीर्षक वाचून तुमच्या मनात नक्की कुतूहल निर्माण झाले असेल. दैनंदिन जीवनात आपण विविध ब्रँड्सची उत्पादने वापरत असतो. अगदी सकाळच्या ब्रश पासून रात्रीच्या जेवणापर्यंत, स्वयपांकघरातून दिवाणखान्यापर्यंत कित्येक ब्रँड्सची उत्पादने आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेली आहेत. यामधील बहुतांश कंपन्यांची नावे आपल्याला माहिती असतात.अनेकदा काही उत्पादनांची नावे हीच त्या उत्पादनांची ओळख बनतात, तर काही उत्पादने संबंधित क्षेत्रात आपला स्वतंत्र ‘ब्रँड’ तयार करतात. बहुतांश कंपन्यांच्या नावांचा अर्थ मात्र आपल्याला माहिती नसतो.  

बाळाचा जन्म झाल्यावर बाळाचे बारसे करतात, तसेच कंपनी रजिस्टर करताना कंपनीचे नाव ठरवणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे नवीन उत्पादन बनवितानाही त्या उत्पादनाचे बारसे करावे लागते. आपल्या कंपनीचे अथवा उत्पादनाचे  नाव ठरविताना कंपन्या नक्की काय विचार करतात ? किंवा असे नाव का दिले गेले असावे, असे विविध प्रश्न आपल्यामनात कधीना कधी येतच असतात. अशाच काही कंपन्यांच्या नावे कशी तयार करण्यात आली याबद्दलची गमतीशीर माहिती या लेखात पाहूया.

इतर लेख:  Titan – टायटन कंपनीची यशोगाथा (भाग १)

ब्रँड्सच्या नावामागच्या सुरस कथा 

अमूल (Amul) 

 • अमूल दूध पिता है इंडिया, अमूल द टेस्ट ऑफ इंडिया या लोकप्रिय टॅगलाईनसोबत तितकीच लोकप्रिय उत्पादने असणारी अमूल कंपनी म्हणजे आनंद जिल्ह्यातील ‘आनंद मिल्क युनियन लिमिटेड’.  
 • या कंपनीने भारतात सर्वप्रथम व्यावसायिक बटरची निर्मिती केली. कंपनीचे नाव ‘अमूल’ ठेवण्याचे खास असे कोणतेच कारण  नाही. 
 • 𝗔nand 𝗠ilk 𝗨nion 𝗟imited या नावामधील प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर घेऊन कंपनीचे नामकरण अमूल असे करण्यात आले.

तनिष्क (𝗧𝗮𝗻𝗶𝘀𝗵𝗾)

 • ‘तनिष्क’ हे उत्पादन झेरक्सएक्स देसाई, टायटन इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष व एमडी यांनी बनविलेले मास्टरस्ट्रोक होते.
 • दागिन्यांच्या क्षेत्रातील अग्रगण्य असणारी ही कंपनी टाटा ग्रुपच्या  मालकीची आहे.
 • कंपनीला या ब्रँडसाठी आकर्षक नाव हवे होते. अखेर टाटा मधील “𝗧𝗮” आणि “𝗡𝗶𝘀𝗵𝗸” म्हणजे दागिन्यांचा तुकडा या दोन शब्दांच्या संयोगाने 𝗧𝗮𝗻𝗶𝘀𝗵𝗾 हे नाव निश्चित करण्यात आले. 

डाबर (Dabur):

 • सकाळच्या टूथपेस्टपासून ते रात्रीच्या च्यवनप्राशपर्यत विविध आयुर्वेदिक आणि सौंदर्यप्रसाधने बनविणाऱ्या या शंभर वर्षांहूनही जुन्या कंपनीने आजही आपली विश्वासार्हता जपली आहे. 
 • कलकत्त्यामधील आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. एस. के. बर्मन यांनी मलेरिया, कॉलरा, बद्धकोष्ठता यासारख्या अनेक आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक औषधे बनवली होती. 
 • आपल्या आयुर्वेदिक औषधांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु करण्यासाठी त्यांनी 1884 साली ‘डाबर’ कंपनीची स्थापना केली. 
 • बंगालमध्ये अनेकदा ‘डॉक्टर’चा उच्चार ‘डाक्टर’ असा केला जातो. त्यामुळे या शब्दातील ‘डा’ (Dactar = Da) आणि ‘बर्मन’ मधील ‘बर्’ (Bur) या शब्दांच्या संयोगाने डाबर (Dabur) या नावाचा जन्म झाला.

हे नक्की वाचा: Titan – टायटन कंपनीची यशोगाथा (भाग २) 

महिंद्रा अँड महिंद्रा (𝗠𝗮𝗵𝗶𝗻𝗱𝗿𝗮 𝗮𝗻𝗱 𝗠𝗮𝗵𝗶𝗻𝗱𝗿𝗮)

 • जे. सी. महिंद्रा आणि के.सी. महिंद्रा या दोन बंधूनी मलिक गुलाम मोहम्मद यांच्यासह 1945 मध्ये म्हणून ‘महिंद्रा  अँड मोहम्मद’ नावाने स्टील ट्रेडिंग फर्म स्थापन केली होती. 
 • जेव्हा मोहम्मद पाकिस्तानात स्थलांतरित झाले, तेव्हा या कंपनीचे नाव बदलून ‘महिंद्रा आणि ‘महिंद्रा’  ठेवण्यात आले.
 • आजच्या घडीला ऑटोमोबाईल क्षेत्रात या कंपनीचे खूप मोठे नाव आहे.

रॅनबॅक्सी (𝗥𝗮𝗻𝗯𝗮𝘅𝘆):

 • रॅनबॅक्सी (𝗥𝗮𝗻𝗯𝗮𝘅𝘆) या प्रसिद्ध औषध कंपनीचे नाव त्यांच्या संस्थापकांचा नावांमधून जन्माला आले आहे. 
 • जपानी औषध कंपनीचे डीलर म्हणून काम करणारे रणजित सिंग आणि गुरबँक्स सिंग यांनी अमृतसरमध्ये रॅनबॅक्सी या कंपनीची स्थापना केली.
 • रणजित मधील (Ran) आणि गुरबँक्स मधील (𝗯𝗮𝘅) अशा दोघांच्या नावांच्या संयोगातून 𝗥𝗮𝗻𝗯𝗮𝘅𝘆 हे नाव उदयास आले. 

डालडा (Dalda):

 • एकेकाळी  प्रत्येकाच्या  स्वयंपाकघरात मानाने विराजमान झालेल्या पण सध्याच्या ‘डाएट’च्या जमान्यात मागे पडलेले उत्पादन म्हणजे डालडा. 
 • यालाच वनस्पती तूप असेही म्हणतात.   पण या उत्पादनाचे ‘डालडा’ हे नामकरण करण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे  हे उत्पादन डच मधील प्रसिद्ध तूप कंपनी ‘दादा आणि कंपनी’ (Dada & Co) या कंपनीकडून हिंदुस्तान लीव्हर या कंपनीने आयात केले होते. 
 • यामध्ये आपला मालकी हक्क प्रतिबिंबित करण्यासाठी हिंदुस्तान लीव्हरने ‘दादा’च्या मध्यभागी ‘𝗟’ जोडले आणि त्याचे ‘डालडा’ (Dalda) असे नामकरण केले. हे नाव इतके प्रसिद्ध झाले की आजही अनेकजण वनस्पती तूप म्हणजे डालडा असंच मानतात.

विप्रो (𝗪𝗶𝗽𝗿𝗼):

 • 29 डिसेंबर 1945 रोजी अमळनेर, महाराष्ट्र येथे मोहम्मद प्रेमजी यांनी “वेस्टर्न इंडिया पाम रिफाईंड ऑइल लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली. 
 • कंपनीच्या  इंग्रजी नावाच्या (Western India Palm Refined Oil Limited) आद्याक्षरांवरून ‘𝗪𝗶𝗽𝗿𝗼’ हे नाव निश्चित करण्यात आले. 
 • 1966, मध्ये मोहम्मद प्रेमजींच्या निधनानंतर, त्यांचा मुलगा अझीम प्रेमजी यांनी २१ व्या वर्षी विप्रोचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रवेश केला. 

हे नक्की वाचा: Samsung: सॅमसंग कंपनीचा इतिहास 

टीव्हीएस (𝗧𝗩𝗦)

 • तिरुक्कुरंगुडी वेंगरम सुंदरम अय्यंगार यांनी  1911 साली चेन्नई येथे 𝗧𝗩𝗦 या नावाने सुरु  केलेली ट्रान्सपोर्ट कंपनी आज ऑटोमोबाईल क्षेत्रातील  एक  प्रसिद्ध  कंपनी  आहे.  
 • तिरुक्कुरंगुडी वेंगरम सुंदरम अय्यंगार यांनी  आपल्या  नावाच्या इंग्रजी स्पेलिंगमधील (Thirukkurungudi Vengaram Sundram Iyengar) आद्याक्षरे उचलून आपल्या कंपनीला ‘TVS’ असे  नाव  दिले. 

सिप्ला (Cipla)

 • सिप्ला (Cipla) कंपनीचे संस्थापक डॉ. के.ए. हॅमिड यांनी मुंबईत 1935 साली  सुरु  केलेल्या ‘केमिकल, इंडस्ट्रियल आणि फार्मासिटिकल लॅबरेटरीज’ (Chemical, Industrial and Pharmaceutical Laboratories) या कंपनीच्या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरांमधून Cipla या नावाचा जन्म झाला. 
 • सिप्ला ही भारतातील एक अग्रगण्य औषध उत्पादक कंपनी आहे. 

देना बँक (𝗗𝗲𝗻𝗮 Bank )

 • देना बँकेची स्थापना 26 मे 1938 रोजी सी.डी. देसाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारतीय फायनान्सर देवकरण नानजी यांच्या कुटुंबाने केली. 
 • देना हे नाव Devkaran Nanjee मधील इंग्रजी आद्याक्षरांमधून निश्चित करण्यात आले.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *