Reading Time: 2 minutes
  • दि. २ ते ४ डिसेंबर या ३ दिवसांत आयपीओद्वारे ७५० कोटी रुपये उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेला उभे करायचे होते. 

  • कंपनीला तब्बल ७६,००० कोटी रुपयांच्या शेअर्ससाठी मागणी अर्ज प्राप्त झाले आहेत. शेवटच्या दिवशी आयपीओ बंद होईपर्यंत १६५.६८ पट शेअर्सची मागणी नोंदवली गेली. 

  • उज्जीवने १२. ३९ कोटी शेअर्स आयपीओ द्वारे भांडवल उभारणीसाठी बाजारात आणले होते.  कंपनीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून  इतर समव्यवसायिक स्मॉल फायनान्स बँकेच्या तुलनेत स्वस्त असणाऱ्या उज्जीवन शेअर्सला प्रचंड मागणी नोंदवण्यात आली. ही  मागणी थोडी थोडकी नसून तब्बल २०५३. ८ कोटी शेअर्सला गुंतवणूकदारांकडून मागणी नोंदली गेली.

आयपीओ बाबत कॅलेंडर –

शेअर्स ऍलॉटमेंट 

९  डिसेंबर २०१९

रिफंड प्रोसेस सुरुवात

१० डिसेंबर २०१९

डिमॅट अकाउंटला शेअर्स क्रेडिट होणार

११ डिसेंबर २०१९

आयपीओची शेअर बाजारात लिस्टिंग (नोंदणी)

१२ डिसेंबर २०१९

 

  • तुम्ही जर या आयपीओला मागणी नोंदवली असेल तर 9 डिसेंबर नंतर येथे क्लिक करून शेअर अलॉटमेंट  स्टेट्स चेक करु शकता.

  • २०१९ मध्ये आतापर्यंत बाजारात आलेल्या आयपीओंमध्ये उज्जीवनला सर्वात जास्त प्रतिसाद लाभलेला आहे. 

  • बहुतेक ब्रोकरेज संस्थांनी या आयपीओसाठी सबस्क्राईब करा या अर्थाचेच रिसर्च रिपोर्ट्स दिले होते. लिस्टिंगच्या दिवशी या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांला बंपर लिस्टिंग प्रॉफिट कमवण्याची संधी आहे.

  • तुम्ही या शेअर्सला मागणी नोंदवली नसेल किंवा रु. १४,८०० इतकी किमान रक्कम भरणे शक्य झाले नसेल तर तुम्ही लिस्टिंग झाल्यावर अगदी छोट्या रकमांचेही शेअर्स खरेदी करू शकता. 

  • इतर सर्व लोक हा शेअर घेत आहे म्हणून तुम्ही घेतलाच पाहिजे असे नाही. स्वतः अभ्यास करून तुमच्या आर्थिक गणितात बसत असेल तरच हा शेअर दीर्घकालीन उद्दिष्टांचा विचार करून खरेदी करायला हवा.

(या लेखमालेतील कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची, अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच या कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात माहिती दिलेल्या कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…