Valentine Week
https://bit.ly/3a0c4N9
Reading Time: 3 minutes

व्हॅलेंटाईन विक (Valentine week)

विरोधकांच्या विरोधामुळे वीक (Weak) न होता थेट विक  (Week) पर्यंत पोचलेला ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे आता व्हॅलेंटाईन विक (Valentine week) म्हणजे तरुणाईसाठी एक सोहळाच असतो. व्हॅलेन्टाईन्स डे आता १४ फेब्रुवारीलाच एन्जॉय केला जात नाही तर ‘राजे व्हॅलेन्टाईन’ १४ फेब्रुवारीला अवतरण्यापूर्वी त्यांच्या हाताखलील इतर मंत्रिमंडळ टेडी बिअर, किस डे, रोझ डे आणि आणखी ‘काय काय दे’ आठवडाभर आल्यावर, झाल्यावर संत व्हॅलेन्टाईन्स डे अवतरतात.

हे नक्की वाचा: विवाहानंतरचे आर्थिक नियोजन 

व्हॅलेंटाईन विक (Valentine week)

  • “आय लव यु शोना! आय लव यु बेबी.. सी वॉट आय गॉट फॉर यु!” ओह वाव!! इट्स ए ब्युटीफुल गिफ्ट!” व्हॅलेंटाईन्स वीक सुरू झालाय. आठवडाभर प्रेमी जोडप्यांच्या प्रेमसागराला उधाण येईल. हे असले गोग्गोड संवाद आजूबाजूला ऐकायला मिळू शकतात.
  • कोणत्याही जागरूक व्यक्तीला हे स्पष्टपणे कळतं की या सर्व ‘डेज’चं  योग्यप्रकारे बाजारीकरण केलं गेलंय. यामुळे या आठवड्यात होणारी बाजारातील उलाढाल बघता नात्याची वीण आता इतकी पातळ आणि वरवरची झाली आहे की फक्त गिफ्ट्स आणि डेजच्या माध्यमातूनच ती झिरझिरीत वीण अस्तित्वात राहतेय असं जाणवतं.
  • प्रेम, नातं यातील खोली संपून प्रत्येक गोष्ट उथळ पातळीवर, ‘सुपरफिशियल’ पातळीवरच सुरू होतेय आणि तिथेच संपतेय. वरवरच्या आवरणाने सुरू होऊन एकेकाळी प्रेम भावना मनात खोल जायच्या. आता भावनांचा आवेग जोरदार येतो आणि वरवर सांडून, ओसंडून वाहून वरूनच विरून जातो. आत मनात काही झिरपतच नाही. असा पाऊस काहीही उपयोगाचा नसतो जो फक्त बरसतो आणि जमिनीत खोल न झिरपता  गटारात वाहून जातो.
  • यामुळे नात्याची खोली, प्रेम, निस्वार्थी नातं कमी होत नष्ट होत चाललंय. जेव्हा भावना कमी असतात तेव्हा नात्यातील जवळीक दाखवायला गिफ्ट्स आणि इतर भौतिक गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. यामुळेच व्हॅलेन्टाईन्स डे वीकमधील इतर डेजचं पेव फुटलंय.

हे नक्की वाचा: डेटिंग आणि क्रेडिट स्कोअर

  • पूर्वी फक्त व्हॅलेन्टाईन्स डे असायचा. त्याचंच जास्त प्रस्थ असायचं. पुढे सोशल मीडिया क्रांती झाली आणि डेजचं पेव फुटलं. पद्धतशीरपणे दिवसांचं बाजारीकरण करण्यात आलं.
  • काही वर्षांपूर्वी नवरात्रात स्त्रियांनी आठ रंगाच्या आठ साड्या परिधान करणं म्हणजे देवीची उपासना करणं, हे एका वर्तमानपत्राद्वारे सुनियोजितरित्या मार्केटिंग करून मनावर बिंबवलं गेलं. आता नवरात्रीत स्त्रिया सामाजिक स्टेटसच्या दबावाखाली त्या त्या रंगाचे साड्या, ड्रेसेस परिधान करतातच. ती आता जणू परंपरा झाली आहे. प्रत्येक दिवसांसाठी खास त्या त्या रंगाचे कपडे विकत घेतात. यामुळे बाजारात मोठी उलाढाल होते. या सर्व मार्केटिंग स्ट्रेटजिज असतात.
  • व्हॅलेन्टाईन्स डे – विकचे सर्व दिवस असेच सोशल मीडियाद्वारे मनावर बिंबविले गेले आहेत. सोशल मीडियावर सातही दिवस पोस्टींचा, फोटोजचा पाऊस पडतो. व्यापारीगण आणि त्यांची सोशल मीडियाची क्रिएटिव्ह टीम आपण पेरलेल्या बियांचा वृक्ष आणि मग त्याचं जंगल होताना गंमतीने बघत राहते.
  • पूर्वी ग्रीटिंग कार्ड्सच्या गॅलरीज असायच्या. व्हॅलेन्टाईन्स डेच्या आदल्या दिवशी त्यातून गिफ्ट घेतानासुद्धा मुलं मुली संकोच करत. आता शाळेतील मुलं मुलीसुद्धा रोज डेला, चॉकलेट डेला भरभरून चॉकलेट्स, गुलाबांच्या कळ्या विकत घेतात, भेट देतात, डेटिंग करतात.
  • एखादी क्षुल्लक  घटना घडते आणि “इट्स नॉट वर्किंग एनीमोर, लेट्स कॉल इट ऑफ” म्हणून ‘ब्रेक अप’ करतात. कारण भावभावना या अगदीच उथळ आणि गिफ्ट्सचं देवाणघेवाण याच्या अवतीभवतीच फिरत आहेत. त्यामुळे नात्यांचं तुटणे अगदी सर्रास बाब झाली आहे. या साऱ्यांमध्ये फायदा कोणाचा कोतोय हे स्पष्ट दिसतंय 
  • आजचा वेगवान काळसुद्धा यासाठी नक्कीच कारणीभूत आहे. वेग, प्रगती, दिखाऊपणा या गोष्टींचा अतिरेक होतोय. यामुळे मानसिक शांती ढळतेय आणि याचा परिणाम नात्यांवर होतोय.
  • दिखाऊपणा फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित राहिला नाहीये. त्याचा नात्यांमध्येही शिरकाव झाला आहे. पर्यायी नाती जास्त उथळ झाली आहेत. महागडी गिफ्ट्स, डिनर डेट्स, आउटिंग या गोष्टींचा आधार नाती जोडण्यासाठी तर होतोय पण टिकवण्यासाठी मात्र या गोष्टी कितपत प्रभावी आहेत, याचं उत्तर मात्र कठीण आहे.
  • आजकाल कशावरच चिंतन मनन केलं जात नाही. कदाचित मानसिकरित्या हवी असलेली शांती मिळत नसल्यामुळे असेल, पण हे एक दुष्टचक्र तयार होत आहे  आणि त्या प्रवाहात व्यक्ती वाहू लागते.
  • आजच्या काळात पैसा हेच ‘अंतिम सत्य’ आहे, म्हणूनच भाव भावनांचेही बाजारीकरण झालं आहे. भावना हे मार्केटिंगचं सर्वात प्रभावी तंत्रज्ञान आहे आणि ही गोष्ट हुशार व्यवसायिकांच्या केव्हाच लक्षात आली आहे.  आपण इच्छा असूनही हे सर्व थांबवू शकत नाही आणि कळत-नकळत या साऱ्याचा भाग बनलो आहोत. 
  • विरोधकांचा विरोध असो व प्रेमिकांच्या भावना या ‘व्हॅलेंटाईन वीक’ नावाच्या वाहत्या गंगेत प्रत्येकजण डुबकी मारतोय. आता यात वहावत जायचं की तिथेच थांबायचं, हा निर्णय ज्याचा त्यालाच घ्यायचं आहे. 

“जिंदगी मिले ना दोबारा” मध्ये रितिक रोशन म्हणतो की अगर लडकी के बापके पास हजार करोड है तो एंटरटेनमेंट के लिये बिवीकी क्या जरूरत है?”  एकंदर हीच मानसिकता आजच्या पिढीचीच नव्हे तर आजच्या काळातील साऱ्याच पिढ्यांची झाली आहे. नात्याची भावनिक, आध्यात्मिक पातळी संपून फक्त भौतिक पातळी उरली आहे. कदाचित हा काळच तसा आहे. प्रत्येक गोष्ट अर्थकारणावरच सुरू होऊन अर्थकारणावरच येऊन संपते.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.