Reading Time: 3 minutes

मागील भागामध्ये आपण गुंतवणुकीचे प्राथमिक पर्याय पहिले. या भागात गुंतवणुकीच्या अजून काही पर्यायांची माहिती घेऊया.

६) कर्जरोखे किंवा बॉण्ड्स:

 • सरकार तसेच कंपन्या नियमितपणे बाजारामध्ये कर्जरोखे जारी करत असतात. कर्जरोख्यावर निश्चित असे व्याज मिळते.
 • सरकारी कर्जरोख्यांमध्ये अजिबात जोखीम नसते मात्र कंपन्यांनी जारी केलेल्या कर्जरोख्याना त्या कंपनीच्या विश्वासार्हतेनुसार जोखीम असते. कर्जरोख्यांमध्ये तरलता असते व ते बाजारात विकता येतात. बॉण्ड्स मध्ये तरलता कमी असते.

७) समभाग गुंतवणूक (शेयर बाजार ):

 • गुंतवणूकदार थेट शेयर बाजारातील समभागामध्ये गुंतवणूक करू शकतात.या गुंतवणुकीसाठी डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे.
 • फक्त समभागांमध्ये गुंतवणूक असल्याने जोखीम वाढते मात्र जास्त परतावा मिळायची शक्यता असते.यामध्ये गुंतवणुकीसाठी शेयर बाजारातील कंपन्यांचा गाढा अभ्यास करावा लागतो. चुकीच्या कंपन्यांच्या समभागामध्ये गुंतवणूक केल्यास मोठे नुकसान सोसावे लागते.
 • बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या कंपन्या असतात जसे ब्लूचीप कंपन्या, सरकारी महारत्न कंपन्या, नियमित लाभांश किंवा बोनस देणाऱ्या कंपन्या, ग्रोथ देणाऱ्या कंपन्या, चक्रीय कंपन्या (सायक्लीकल) इत्यादी.  

८) पी.एम.एस. (PMS – पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्विस ) :

 • यामध्ये सेबीच्या नियमानुसार किमान रु. २५ लाखाची गुंतवणूक करावी लागते. फंड मॅनेजर प्रत्येक गुंतवणूकदाराचे पैसे वैयक्तिक पातळीवर समभागांमध्ये गुंतवणूक करतात.
 • या गुंतवणुकीसाठी डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. फक्त समभागांमध्ये गुंतवणूक असल्याने जोखीम वाढते मात्र जास्त परतावा मिळायची शक्यता असते.

९) भू – संप्पत्ती ( रिअल इस्टेट ) :

 • साधारण गेल्या दशकात रिअल इस्टेट हे एक सर्वाधिक पसंतीचे गुंतवणूक क्षेत्र राहिले आहे. मात्र नजीकच्या काळात मोठ्या शहरात रिअल इस्टेट मध्ये जास्त वाढ न झाल्याने गुंतवणूकदारांचा कल दुसऱ्या पर्यायांकडे वळला आहे.
 • रिअल इस्टेट मध्ये  शेत जमीन, अर्ध शहरी जमीन, व्यावसायिक मालमत्ता, रो हाऊस  किंवा फार्म हाऊस इत्यादींचा समावेश होतो.

१०) मौल्यवान वस्तू :

 • सोने, चांदी, हिरे तसेच इतर मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक हा ही एक चांगला पर्याय गुंतवणूकदारांना आहे. मात्र यामध्ये चोरी किंवा गहाळ होण्याची भीती असते.
 • सरकारने आता गोल्ड बॉण्ड्स काढले आहेत, जे प्रमुख बँकांमध्ये मिळतात. यात बँक आपल्याला सोन्याच्या बाजारभावाप्रमाणे बॉण्ड्स देते. या बॉण्ड्स वर आपल्याला साधारण २.५% व्याज मिळते.
 • या बॉण्ड्समध्ये तरलताही अधिक असते.
 • काही गुंतवणूकदार उच्च प्रतीचे चित्रे (पैंटिंग्स), प्राचीन मूर्ती तसेच विंटेज गाड्या यामध्ये सुद्धा गुंतवणूक करतात, याकरिता त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेणेउपयुक्त ठरते.

११) कमोडिटी बाजार :

 • या बाजारात धान्ये, फळे, भाज्या तसेच धातू यांचा व्यवहार होतो. शेती व्यवसायातील गुंतवणूकदार या बाजाराचा लाभ आपल्या गुंतवणुकीसाठी करून घेतात.
 • या बाजाराचे व्यवहार खूप चंचल असतात त्यामुळे गुंतवणूकदारांना गाढा अभ्यास करणे आवश्यक असते अन्यथा नुकसान सोसावे लागते.

१२) डेरीवेटीव्हस मार्केट :

 • हा गुंतवणूक पर्याय सर्वात जास्त जोखीम वाला असतो, इक्विटी समभाग किंवा कमोडिटी बाजारात डेरिव्हेटीव्हचे व्यवहार होतात.
 • यामध्ये गुंतवणुकीची रक्कम कमी असते व प्रमाण खूप मोठे असते. त्यामुळे बाजारातील छोट्या उतारामध्ये होणारे नुकसान हे ५ ते ६ पटीने मोठे असते.
 • छोट्या गुंतवणुकीदारानी या पर्यायाचा अजिबात विचार करू नये. मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार ह्या पर्यायाचा उपयोग द्वेध व्यवहार रक्षण (हेजिंग) साठी करतात.

१३) अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड :

 • या गुंतवणूक प्रकारामध्ये किमान गुंतवणूक रु १ करोड असावी लागते. फंड मॅनेजर्स यातील गुंतवणूक अनलिस्टेड कंपनीची प्रायव्हेट इक्विटी, स्टार्ट अप्स , रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स यामध्ये करतात.
 • यामध्ये मोठ्या परताव्याची संधी असते मात्र तरलता खूप कमी असते तसेच जोखीमही खूप जास्त असते. मोठ्या प्रमाणात मालमत्ता असलेल्या व्यक्ती (एच.एन.आय.) या गुंतवणूक प्रकाराचा लाभ घेऊ शकतात.

१४) एन.पी.एस (न्यू पेन्शन स्कीम) :

 • २००४ नंतर रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच इतरही लोकांसाठी सरकारने याची स्थापना केली आहे.
 • यामध्ये आपण नियमितपणे दरमहा योगदान करू शकतो.
 • यामध्ये कॉन्सर्व्हेटिव्ह, मॉडरेट व अग्ग्रेसिव्ह असे तीन गुंतवणूक पर्याय असतात.
 • यामध्ये कलम ८० (क) मध्ये अतिरिक्त ५००००/- रुपयांची करसवलत मिळते. पेन्शन योजना असल्याने यात तरलता कमी असते.

जग प्रसिद्ध गुंतवणूकदार वोरेन बफे यांचा सल्ला “डोन्ट पूट ऑल युअर एग्स इन सेम बास्केट” जर आपण मानला व छोट्या गुंतवणूकदारांना भुलविणाऱ्या पोंजी (फसवणुकीच्या) योजनांना बळी न पडता, आपण वर उल्लेखिलेल्या योजनांचे योग्य संयोजन, जे आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेला तसेच आपल्या भावी गरजांना पूरक असेल, असे केले तर दीर्घावधी मध्ये आपण निश्चित उत्तम धनवृद्धी करणे शक्य आहे.

– निलेश तावडे

 ९३२४५४३८३२, nilesh0630@gmail.com

(लेखक हे २० वर्षे म्युच्युअल फंड मध्ये कार्यरत होते, सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत.)

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2Q0NpKU )

गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग १ ,  भारतीय स्टॉक एक्सचेंज- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?राष्ट्रीय पेन्शन योजनाम्युच्युअल फंड योजनेसबंधी माहितीसार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी – मुदतपूर्तीनंतरचे विविध पर्याय, 

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

UPI : युपीआय म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची (UPI) निर्मिती…

गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची निवड कशी करावी?

Reading Time: 3 minutes तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि समजा एखाद्या व्यक्तीने ती पद्धतशीरपणे करून दिली…

शेअर बाजारात ६ गोष्टींपासून कायम राहा लांब !

Reading Time: 2 minutes कोरोनाच्या कालावधीत अनेक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून काढता पाय घेतला. पण काही गुंतवणूकदारांनी…