https://bit.ly/3fF5JqA
https://bit.ly/3fF5JqA
Reading Time: 2 minutes

कन्झ्युमर ड्युरेबल लोन (Consumer durable loan)!

कन्झ्युमर ड्युरेबल लोन (Consumer durable loan) म्हणजे मध्यवर्गीय लोकांची छोटी मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठीचा एक सुलभ पर्याय ! 

आपलं घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हेत तर तिथे आपण आपल्या प्रिय कुटुंबियांसोबत सुखी, आनंदी, उत्साही आणि आरामदायी जीवन जगण्याचे स्वप्न पहात असतो. पण आपली कामे आणि दैनंदिन खर्च यांचा ताळमेळ साधत असे जीवन जगणे फक्त स्वप्नवतच वाटत असेल तर असं बिलकुल नाहीये. तुमच्यासाठी ‘कन्झ्युमर ड्युरेबल लोन’ हा अत्यंत तुमच्या सोयीचा पर्याय उपलब्ध आहे.

उत्सव काळात मिळणाऱ्या कर्ज सवलती आणि वस्तुस्थिती

Consumer durable loan -‘कन्झ्युमर ड्युरेबल लोन’ म्हणजे काय? 

  • कन्झ्युमर ड्युरेबल लोन म्हणजे तुमच्या घरातील गरजेच्या वस्तू उदा. टीव्ही, फ्रिज, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, फर्निचर किंवा घराची दुरुस्ती अशा सर्व गरजांसाठी  ‘ग्राहपयोगी कर्ज’ घेता येते.
  • वॉरंटी पिरियड असणाऱ्या वस्तूंसाठी हे कर्ज मिळते आणि हे कर्ज विनातारण कर्ज प्रकारात येते.
  • यासाठी डाऊन पेमेंट कमी असते, वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड पेक्षा व्याजदर कमी असतो आणि अंदाजे ८००० रुपयांपासून ते ५ लाखांपर्यंत असे कर्ज मिळू शकते. 
  • यासाठीच परतफेड कालावधीही तुमच्या सोयीनुसार व ईएमआय च्या रक्कामेनुसार ठरवता येतो. 
Arthasakshar Consumer durable loan
https://bit.ly/2OBqmYT

‘कन्झ्युमर ड्युरेबल लोन’ प्रकराची वैशिष्ट्ये (Features of Consumer durable loan):

  1. कन्झ्युमर ड्युरेबल लोनवरील व्याजदर हा वैयक्तिक कर्ज व क्रेडिट कार्ड यांवरील व्याजदरापेक्षा तुलनात्मकदृष्ट्या कमी असतो. काही कर्ज देणाऱ्या संस्था विना व्याजदर किंवा ०% व्याजदराने देखील अशा प्रकारची कर्ज देतात. 
  2. या कर्जप्रकारात वस्तूच्या किमतीच्या ८०% ते ९५% पर्यंतची रक्कमेपर्यंतचे कर्ज मिळू शकते म्हणजेच २०% ते ५% रक्कमेचे डाऊन पेमेंट करावे लागते. 
  3. काही संस्था वास्तूच्या किमतीएवढे म्हणजेच १००% रकमेचे देखील कर्ज अदा करत आहेत म्हणजेच डाऊन पेमेंट न करता देखील हे कर्ज उपलब्ध होऊ शकते. 
  4. या कर्जासाठीची वयोमर्यादा २५ वर्षे ते ६५ वर्षे अशी असते.
  5. कन्झ्युमर ड्युरेबल लोनसाठी फार कागदपत्रांची आवश्यकता नसते, म्हणजे तुमची ओळखपत्रे (KYC), तुमच्या कमाईसंदर्भातील कागदपत्रे आणि कर्जाच्या पहिल्या हप्त्याच्या धनादेश, साधारण इतकीच कागदपत्रे आवश्यक असतात.
  6.  या प्रकारची कर्जे अल्प प्रोसेसिंग फी घेऊन अत्यंत कमी कालावधीमध्ये मंजूर केली जातात, काही संस्था ही फीदेखील घेत नाहीत.
  7. तुम्हाला किती हप्ता देणे शक्य आहे त्यानुसार साधारणतः ३ ते २४ महिन्यांपर्यंत तुमच्या सोयीनुसार तुम्ही कालावधी निवडू शकता.

कर्जासाठी जामीन राहताय? थांबा आधी हे वाचा

मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दृष्टीने ही कन्झ्युमर ड्युरेबल लोन अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. कन्झ्युमर ड्युरेबल लोन हे योग्य हप्त्यांनुसार तुम्हाला हव्या असणाऱ्या वस्तूंच्या किंमतींची विभागणी करत असल्यामुळे तुम्ही आहे त्या कमाईमध्येदेखील तुमचे राहणीमान उंचावू शकता. ग्रामीण भागांमध्ये LED टीव्ही, रेफ्रिजरेटर, एअर कुलर, मिक्सर्स आणि शिलाई मशीन हि या मार्गाने खरेदी केली जाणारी सर्वांत जास्त उत्पादनांपैकी काही उत्पादने आहेत.

क्रेडिट कार्ड की वैयक्तिक कर्ज, योग्य पर्याय कोणता? 

तुम्हाला हव्या असणाऱ्या वस्तूसाठी बचत करत त्या वस्तूच्या रकमेएवढे पैसे जमेपर्यंत वाट पाहत बसण्यापेक्षा तीच वस्तू कन्झ्युमर ड्युरेबल लोन घेऊन नंतर तेवढीच रक्कम हप्ता स्वरूपात भरायची जे तुमच्या खिशालाही परवडेल आणि तुमची ती वस्तू घ्यायची इच्छा ही पूर्ण होईल.  आहे ना कितीतरी सुलभ मार्ग!! 

तारणकर्ज – सुरक्षित कर्जाचा एक प्रकार

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: Consumer durable loan Marathi Mahiti, Consumer durable loan mhanaje kaay, Consumer durable loanche  fayade marathi, Grahak Tikau karj marathi mahiti, Grahak Tikavu Karj in Marathi 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…