क्रेडिट कार्ड की वैयक्तिक कर्ज, योग्य पर्याय कोणता? 

Reading Time: 3 minutes

क्रेडिट कार्ड की वैयक्तिक कर्ज 

सर्वसामान्य माणसाला मोठी खरेदी करायची असेल, तेव्हा मोठ्या रकमेसाठी क्रेडिट कार्ड व वैयक्तिक कर्ज किंवा पर्सनल लोन (Personal Loan) असे दोन पर्याय समोर असतात. 

सध्याच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे एक किंवा अनेक क्रेडिट कार्ड्स असतात. अर्थात क्रेडिट कार्ड्स बौतांश वेळा खूपच सोयीचं असतं. काही खरेदी करावंसं वाटलं आणि त्यावेळी पटकन पैसे उभे करायचे असतील, तर क्रेडिट कार्डमुळे ते सहज साध्य होतं. शिवाय बँकांच्या स्कीम्स नुसार त्यावर खरेदी केल्यावर जे पॉईंट्स मिळतात त्यातून कॅश बॅक किंवा चांगले डिस्कॉउंट्सही मिळतात.

वैयक्तिक कर्ज घेताय? मग लक्षात ठेवा हे ११ नियम

क्रेडिट कार्ड्सचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत.  क्रेडिट कार्ड्स वापरताना जपून वापरले व वेळेवर बिले भरली, तर त्यात नक्कीच तुमचा फायदा होतो, अन्यथा तुमच्या खिशाला चांगलाच भूर्दंड पडू शकतो. इतकंच नाही तर यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येऊ शकतो. 

विनातारण कर्ज प्रकारांमध्ये क्रेडिट कार्डशिवाय ‘वैयक्तिक कर्ज’ म्हणजेच पर्सनल लोन (Personal Loan) हा पर्यायही उपलब्ध आहे. हे कर्ज मिळणं तसं सहज शक्य नसलं तरी एक कमी जोखमीचा पर्याय म्हणून याकडे नक्कीच पाहिलं पाहिजे.  

आजच्या लेखात  क्रेडिट कार्डशी तुलना करता वैयक्तिक कर्जाचे असणारे फायदे व इतर सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पर्सनल लोन नामंजूर होण्याची कारणे- भाग १

क्रेडिट कार्ड की पर्सनल लोन (Credit Card vs Personal Loan) –

१. कर्ज घेण्याचे कारण

 • घराची डागडुजी, गाडी खरेदी किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी यासाठी पैसे हवे असल्यास ते ‘वैयक्तिक कर्ज’ म्हणजेच पर्सनल लोन (Personal Loan) हा पर्याय जास्त फायद्याचा आहे. 
 • छोट्या-मोठ्या रकमेसाठी म्हणजे नवीन फर्निचर, कंम्प्यूटर, लॅपटॉप अशा आर्थिक गरजांसाठी क्रेडिट कार्ड हा पर्याय चांगला म्हणता येईल. 
 • आपल्याला जास्त रकमेचे कर्ज हवे असेल आणि ते ५ वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळामध्ये परतफेड करण्याचे प्रयोजन असेल, तर अशा वेळी वैयक्तिक कर्ज घेणे उत्तम !

२. व्याजदर: 

 • तुलनात्मकदृष्ट्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर क्रेडिट कार्ड वरील व्याजदरापेक्षा कमी असतो. 
 • वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत काही संस्था ओरिजिनॅशन फी आकारतात. 
 • ही एकदाच आकारली जाते व ही कर्जाच्या एकूण रकमेच्या १% ते ५% या दरम्यान असते. 
 • जर एखादी कर्ज देणारी संस्था ज्यांचा व्याजदर इतर संस्थांच्या तुलनेत कमी आहे पण ते ही फी आकारतात. 
 • व्याजाची गणना करताना त्यात ही रक्कम मिळवल्यास एकूण रक्कम जास्त असू शकते.  त्यामुळे संस्था अशी कोणती फी आकारतात का याबद्दल खात्री करून घेणे महत्वाचे आहे.

क्रेडिट कार्ड वापरताना या ६ चुका कटाक्षाने टाळा

३. कर्ज परतफेड: 

 • क्रेडिट कार्ड बद्दल विचार करायचा झाल्यास यातुन पैसे खर्च केले असल्यास आपल्याला साधारण ४५ दिवस हे पैसे विना व्याजदर वापरता येतात. त्यामुळे तात्काळ लागणाऱ्या मर्यादित रकमेसाठी जी तुम्ही १ वर्ष ते जास्तीत जास्त ३ वर्षाच्या आत खात्रीशीररित्या परतफेड करू शकाल अशा रकमेसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता. 
 • या काळात कर्जाची परतफेड करण्याबाबतची साशंकता असल्यास नक्कीच वैयक्तिक कर्जाला प्राधान्य देणे जास्त योग्य ठरेल. 
 • वैयक्तिक कर्ज घेण्याचा मुख्य  फायदा म्हणजे, तुम्ही नक्की किती रकमेचे कर्ज घेत आहेत, त्यावरील व्याजाची रक्कम, दर महिन्याच्या कर्जाचा हप्ता, त्यात मुद्दल किती असणार आणि व्याज किती असणार, कोणत्या तारखेला तुम्ही वेळेवर कर्जाचे हप्ते भरून कर्जमुक्त होणार हे सर्व तुम्हाला कर्ज घेतेवेळीच माहित असते.  
 • वैयक्तिक कर्ज जडताना तुम्ही तुमची पैशांची अवाक-जावक याचे शिस्तबद्ध नियोजन करू शकता. 

क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

४. तुमचा सिबिल किंवा क्रेडिट स्कोअर: 

 • तुमच्या क्रेडिट कार्डवर जास्त रकमेचे कर्ज जास्त काळ दिसले, तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट कार्ड वापरावर तर होतोच पण त्यासोबतच कोणतेही कर्ज मंजूर होण्यासाठी ग्राह्य धरला जाणारा सिबिल स्कोअर  खाली आणण्यासाठीही कारणीभूत ठरते. 
 • आपल्याला क्रेडिट कार्ड कर्ज मर्यादेच्या ३०% किंवा त्याहून अधिक रक्कम आपण वापरली असल्यास जोपर्यंत आपण त्याची परतफेड करणे सुरु करत नाही तोपर्यंत हा सिबिल स्कोअर खाली राहतो. 
 • याउलट नियमित हप्ते भरावे लागणाऱ्या कर्जाची आपण नियमित वेळेवर परतफेड करत असल्यास आपला सिबिल स्कोअर वर जाण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो.

सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया

थोडक्यात क्रेडिट कार्ड कर्जाला त्याच्या परतफेडीच्या कालावधीचे बंधन नसते त्यामुळे ते लवकर परत न केल्यास व्याजाच्या स्वरूपात आपण जास्त पैसे भरतो शिवाय वैयक्तिक कर्जाची तुलना करता यावर व्याजदरही जास्त असतो. याउलट वैयक्तिक कर्जामुळे कर्ज परतफेडीची एक शिस्त असल्याने वेळेवर हप्ते भरल्यास त्यातून तुम्हाला तुमच्या पैशाचे नियोजन करणे सोपे जाते.

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Credit Card vs Personal Loan Marathi mahiti, Credit Card or Personal Loan which is better in Marathi

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *