डिजिटल रुपया म्हणजे काय आणि त्याचा व्यवहारात उपयोग कसा होईल याची उत्सुकता सामान्य नागरिकांना लागलेली आहे. डिजिटल रुपया नेमका कसा असेल याबाबतची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. नेहमीच्या वापरातील रुपयांपेक्षा हा डिजिटल रुपया हे अधिकृत चलन असणार आहे. डिजिटल रुपया हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणात असणार आहे.
डिजिटल रुपयाची प्रायोगिक चाचणी १ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. भारतामध्ये युपीआय आणि क्यूआर कोड व्यवहारासारखाच डिजिटल रुपया चलनाचा उपयोग करण्यात येईल.
सीबीडीसी म्हणजे काय? – (CBDC meaning in marathi)
- सीबीडीसी म्हणजे सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सी. क्रिप्टोकरन्सीचे प्रमाण वाढत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सिबिडीसी चलन बाजारात आणले आहे. सीबीडीसी हे राष्ट्रीय चलन आहे.
- सीबीडीसी डिजिटल स्वरूपातच असणार आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये असणारी अस्थिरता सीबीडीसी मध्ये असणार नाही. सीबीडीसी हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी संलग्न आहे.
- डिजिटल व्यवहार आणि सीबीडीसी मध्ये फरक असणार आहे. ऑनलाईन व्यापार करत असणाऱ्या ग्राहकाला बँकेतील खाते युपीआयशी जोडलेले असणे गरजेचे असते. पण सीबीडीसी मधील व्यवहार करत असताना हे बंधन असणार नाही.
सीबीडीसी चलनातून असा होईल व्यवहार – (cbdc currency in marathi)
- सीबीडीसी चलन म्हणजे डिजिटल रुपयाचे चलनाच्या माध्यमातून व्यवहार सहज सोप्या पद्धतीने होतील.
- सीबीडीसी चालनामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. चलन अधिक कार्यक्षम होऊन खर्च कमी होईल.
- डिजिटल रुप्याचे नियमन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून करण्यात येईल. डिजिटल रुपया प्रवास, खरेदी किंवा इतर व्यवहारांसाठी सहज वापरता येईल.
नक्की वाचा : युपीआयच्या लोकप्रियतेचे परिणाम
क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल रुपयातील फरक – (Difference between crypto currency and cbdc)
- क्रिप्टोकरन्सी डिजिटल विनामूल्य मालमत्ता आहे. ही करन्सी कोणत्याही सरकारच्या अधिकारात नाही. डिजिटल चलन हे संबंधित सरकारच्या मध्यवर्ती बँकेशी जोडलेले असते.
- क्रिप्टोकरन्सी कोणत्याही सरकार किंवा सरकारी घटकांशी संबंधित नाही. त्याचा खरेदीसाठी वापर केला जाऊ शकतो .
डिजिटल रुपयाची वैशिष्ट्य –
- डिजिटल रुपयाचे रूपांतर रोख रकमेत किंवा बँक ठेवींमध्ये सहज करता येईल.
- डिजिटल रुपयाच्या माध्यमातून करण्यात येणारे व्यवहार सुरक्षित असणार आहेत. फियाट करन्सीप्रमाणे हे व्यवहार अधिकृत असतील.
- नागरिक, व्यवसायिक तसेच सरकारी सेवांमध्ये डिजिटल रुपयाचे व्यवहार करता येतील.
- डिजिटल रुपया ही करन्सी सेंट्रल बँकेच्या ताळेबंदात दायित्व म्हणून असेल.
- आरबीआयच्या मतानुसार डिजिटल रूपयाच्या व्यवहारामुळे भारताची डिजिटल अर्थव्यवस्था बळकट होईल.
रोख पैशांमध्ये रूपांतरित करणे सोपे –
- सामान्य नागरिकांसाठी डिजिटल रुपया हे व्यवहार करण्याचे एक माध्यम असेल. त्या माध्यमातून ते रोजच्या जीवनात गरजेच्या वस्तूंची खरेदी आणि पैशांची देवाणघेवाण करू शकतील.
- डिजिटल रुपया मधील पैशांचे मूल्य दररोजच्या चलनाच्या बरोबरीचे असेल.
- युझर्स डिजिटल रुपयातील पैसे सहज सोप्या पद्धतीने मनी आणि कॅशमध्ये रूपांतरित करू शकतील.
डिजिटल रूपयाचा उद्देश –
- भारतीय अर्थव्यवस्थेतील रोखीचे प्रमाण कमी करून डिजिटल व्यवहार वाढवणे.
- डिजिटल रुपयामध्ये क्रिप्टोकरन्सी प्रमाणे धोका असणार नाही. डिजिटल रुपया हे व्यवहार आणि गुंतवणुकीचे सुरक्षित माध्यम आहे.
- सध्याच्या चलनातील नोटा आणि नाणे छपाईवरचा खर्च कमी करणे हा महत्वाचा उद्देश आहे. तसेच वाहतूक आणि सुरक्षिततेवरील खर्चही कमी केला जाणार आहे.
- डिजिटल रूपयाच्या व्यवहारातून आर्थिक समावेशकता वाढवणे.
- विदेशात व्यवहार करण्यासाठी डिजिटल रूपयाचा उपयोग केला जाणार आहे. या माध्यमातून जलद डिजिटल व्यवहार केले जातील.
- डिजिटल रुपयामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये झालेलं मनिलॉन्डरिंग आणि टेरर फंडींगचे प्रकरणांना आळा घालण्यास मदत होईल.
नक्की वाचा : सावधान? युपीआयच्या माध्यमातून व्यवहार करताय.