Reading Time: 2 minutes
 • कर्ज घेत असताना गृहकर्जावरील व्याजदर कायमच  जास्त असतात. २०१९  वर्षानंतर कोरोना आल्यामुळे गृहकर्जाचे व्याजदर कमी झाले होते. त्यानंतर ते १५ वर्षांच्या निच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले. त्या काळात पैसे असणाऱ्या ग्राहकांनी गृह कर्ज घेऊन घरे खरेदी केली. पण  आता परत गृहकर्जाचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. 
 • गृहकर्जावर कोरोनाच्या काळात सूट देण्यात आली होती. पण ती सूट आता काढून घेण्यात आली आहे. ४ मे २०२२ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने अनियोजित रेपो दरामध्ये ४० बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. 
 • जर तुमचा सध्याचा गृहकर्जाचा दर ७.०५ टक्के असेल आणि मे मधील दरवाढ होण्यापूर्वी तोच दर ६.६५ टक्क्यांवरून  तो ७.५५ टक्क्यांपर्यंत जाईल. रेपोदरात वाढ झाल्यामुळे गृहकर्जावरील व्याजदरात वाढ झाली आहे. 

 

नक्की वाचा : गृहकर्ज घेताना तुम्हाला माहीतच असावीत अशी १० कलमे 

 

आपण गृहकर्ज व्याजवाढीचा सामना कसा करू शकता?

 

१. कर्जाचा ईएमआय वाढवून घ्या – (loan interest rate high in marathi)

 • बँकेतील गृहकर्जाचा व्याजदर वाढला की बँक ईएमआय न वाढवता कर्जाचा कालावधी वाढवत असते. कर्जाच्या परतफेडीचा कालावधी वाढवण्यापेक्षा ईएमआय वाढवला की कमी काळात कर्ज परतफेड करून पूर्ण होते. 
 • बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जाची मुदत वाढवण्यापेक्षा प्रीपेमेंट करून कर्ज परतफेड करावी. 
 • गृहकर्जावरील ईएमआयची रक्कम वाढवली की कर्जावरील व्याजाचा भार कमी होतो. त्यासाठी नियमित प्रीपेमेंट करणे गरजेचे आहे. 
 • प्रीपेमेंट म्हणजे कर्जफेडीचा कालावधी पूर्ण होण्याच्या आधी  पूर्ण किंवा काही अंशी कर्जाची रक्कम भरणे. भविष्यातील अतिरिक्त निधी, मुलांचा शिक्षणखर्च आणि सेवानिवृत्ती सारख्या गुंतवणुकीचे व्यवस्थित नियोजन केल्यास उच्च ईएमआयचा पर्याय उपलब्ध असतो. त्यामुळे कर्जापासून मुक्तता मिळू शकते. 

 

२. अर्धवट प्रीपेमेंट करणे –

 • कर्जदाराने २० वर्षांच्या मुदतीचे कर्ज घेतले तर  उच्च ईएमआय हा पर्याय निवडून ५ ते ७ वर्षांमध्ये कर्जदाराने कर्जाची परतफेड करून टाकावी.
 •  कर्जदाराकडे कर्जाची मोठी रक्कम भरायला पैसे नसतील तर कमी ईएमआय भरायला सुरुवात करावी. ग्राहकाने कमी कालावधीत कर्ज फेडल्यामुळे अधिकच्या व्याजाची रक्कम वाचते. 

 

३. गृहकर्जाचे हस्तांतरण –

 • गृहकर्ज घेणाऱ्या कर्जदारावराला  व्याजाचा बँकेचा जास्त  व्याजदर भरावा लागत असेल तर बँक बदलण्याचा सल्ला दिला जातो. ग्राहकाचे गृहकर्ज हे रेपो दाराशी जोडलेले असेल तर  नवीन बँकेत कर्जाचे हस्तांतरण करून फायदा होत नाही. एखाद्या बँकेत कमी व्याजदर असेल आणि तुम्ही चौकशी केली तर तुमच्या गृहकर्जाचे हस्तांतरण होऊ शकते. 
 • गृहकर्ज घेत असताना  कर्जावरील व्याजदर आणि कर्ज परतफेडीच्या कालावधीची माहिती असायला हवी. दिलेल्या कालावधीत कर्जाची परतफेड करताना किती व्याज लागेल याची माहिती घेऊन त्याप्रमाणे भविष्यात नियोजन करता येते. त्यासाठी वेगवेगळ्या बँकांची कर्जावरील व्याजदर माहित करून योग्य तेथूनच कर्ज घ्यायला हवे. . 

 

नक्की वाचा : गृहकर्ज घेताना बँकेकडून नकार येण्याची ‘ही’ आहेत कारणे 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

UPI : युपीआय म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची (UPI) निर्मिती…

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…