Zero cost EMI
‘झीरो कॉस्ट ईएमआय (Zero cost EMI) ‘ही सुविधा वापरून आपल्यापैकी अनेकांनी वस्तू खरेदी केल्या असतील. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवर जवळपास बाराही महिने कोणता ना कोणता सेल चालूच असतो. या सेलचे सर्वात मोठे आकर्षण असते ते म्हणजे ‘झीरो कॉस्ट ईएमआय’. आजकाल तर, शॉपिंग मॉल्स किंवा मोठमोठ्या कंपन्यांच्या शोरूम्समध्येही हे ‘झीरो कॉस्ट किंवा इंटरेस्ट फ्री ईएमआय’ ऑफर केले जातात. अनेकदा तर इंटरेस्ट फ्री ईएमआय’ सुविधा वापरून वस्तू घेतल्यास वस्तूंची किंमत कमी केली जाते. नक्की काय आहे हे झीरो कॉस्ट ईएमआय? यामागचं गणित नेमकं कसं असतं?
हे नक्की वाचा: उत्सव काळात मिळणाऱ्या कर्ज सवलती आणि वस्तुस्थिती
Zero cost EMI: झीरो कॉस्ट ईएमआय म्हणजे काय?
- जेव्हा ग्राहकाला एखादी महाग वस्तू विकत घ्यायची असते, पण त्यासाठीचे पैसे एकदम भरणे शक्य नसते तेव्हा ही रक्कम 3, 6, 9 किंवा 12 महिन्यांमध्ये समान हप्त्यात भरण्याची सूट दिली जाते. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत नाही.
- उदा. अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या वेबसाईट मोबाईल फोन, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर यासारख्या गोष्टींवर झीरो कॉस्ट ईएमआय सुविधा देता.
- समजा तुम्हाला 30,000 रुपये किंमतीचा मोबाईल फोन घ्यायचा असेल आणि तुम्ही एवढे पैसे एकदम भरू शकत नसाल, तर तुम्ही इंटरेस्ट फ्री ईएमआयचा पर्याय निवडू शकता. यामध्ये 3, 6, 9, 12 यापैकी कोणताही कालावधी निवडून समान हप्त्यात पैसे भरायचे असतात. उदा तुम्ही 6 महिन्यांचा कालावधी निवडल्यास प्रति महिना रु. 5000 भरावे लागतील.
- झीरो कॉस्ट ईएमआय ही सुविधा निवडताना खरेदीच्या वेळी ईएमआय चा कालावधी निश्चित करावा लागतो.
- झीरो कॉस्ट ईएमआयला इंटरेस्ट फ्री ईएमआय किंवा नो कॉस्ट ईएमआय असेही म्हणतात
Zero cost EMI: एक मार्केटिंग गिमिक
- तज्ज्ञांच्या मते, इंटरेस्ट फ्री ईएमआय हे एक मार्केटिंग गिमिक आहे. यामागचा उद्देश हा केवळ विक्री वाढवणे हा आहे.
- यामध्ये प्रामुख्याने 3 घटकांचा सहभाग असतो. प्लॅटफॉर्म (शॉपिंग वेबसाईट किंवा शोरूम), कंपनी आणि बँक किंवा वित्तीय संस्था
- कल्पना करा की एखाद्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न आहे रु.20,000. त्या व्यक्तीला 30,000 रुपयांची वस्तू खरेदी करणं नक्कीच कठीण आहे. परंतु, जर 6 महिने 5000 रुपये किंवा 12 महिने रु. 2500 देणं मात्र त्या व्यक्तीला सहज शक्य होईल. त्यामुळे संबंधित व्यक्ती ऐपत नसतानाही 30,000 रुपयांची वस्तू खरेदी करू शकेल.
- यामध्ये ग्राहकांना वाटते त्यांचा फायदा झाला आहे, पण प्रत्यक्षात फायदा होतो तो 3 घटकांचा प्लॅटफॉर्म (शॉपिंग वेबसाईट किंवा शोरूम), कंपनी आणि बँक किंवा वित्तीय संस्था. कारण त्यांचा ब्रँड अशा व्यक्तीही खरेदी करतात ज्यांची ऐपत नसते. यामुळे कंपनीच्या ग्राहकांमध्ये लक्षणीय वाढ होते.
- तसेच ज्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी केली जाते उदा. अमेझॉन, फ्लिपकार्ट, इ. त्यांना अधिक कमिशन मिळते.
- आता तुमच्या मनात येईल, बँक किंवा वित्तीय संस्थेला यातून काय लाभ होणार? तर, त्यांनाही या व्यवहारातून लाभ होतो. कसा? याबद्दल या लेखात सविस्तर माहिती घेऊया.
विशेष लेख: क्रेडिट कार्ड की वैयक्तिक कर्ज, योग्य पर्याय कोणता?
Zero cost EMI: बँक किंवा वित्तीय संस्था नफा कसा कमवतात?
- कंपनी आपल्या ब्रॅण्डच्या विक्रीसाठी बँक किंवा वित्तीय संस्थेशी करार करते आणि त्यांना वस्तूवर ठराविक रकमेची सूट देते. उदा. सॅमसंग कंपनीचा मोबाईल असेल, तर कंपनी बँक किंवा वित्तीय संस्थेशी करार करून त्यांना हा मोबाईल 5% कमी दराने देते.
- वर दिलेल्या उदाहरणामध्ये रु. 30,000 चा मोबाईल बँक किंवा वित्तीय संस्थेला 10% कमी दराने म्हणजेच 27,000 रुपयांना मिळेल. पण ग्राहकांकडून मात्र त्यांना रु.30,000 मिळतील.
- ही मिळणारी अतिरिक्त रक्कम बँक असे कर्ज देण्यासाठी वापरते ज्यावर त्यांना व्याज मिळेल. यालाच cash flow असे म्हणतात.
थोडक्यात, झीरो कॉस्ट ईएमआयमुळे कंपनी अधिक उत्पादने विकते, शॉपिंग वेबसाईट्स किंवा विक्रेत्यांना अधिक कमिशन मिळते, बँक / वित्तीय संस्थांना कॅश फ्लो आणि आणि ग्राहकांना ग्राहकाला खरेदीचा एक सुलभ पर्याय मिळतो.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: What is Zero cost EMI? Marathi, Zero cost EMI Marathi Mahiti,Zero cost EMI in Marathi, NO cost EMI Marathi, Interest Free EMI Marathi