ITR : करदाते ITR-1 फॉर्म केव्हा वापरू शकत नाहीत याची १० कारणे

Reading Time: 3 minutes

आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ आहे. त्यामुळे आता करदात्यांना लवकरात लवकर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची घाई करावी लागणार आहे. त्याआधी सर्वप्रथम करदात्यांना आयकर विभागाने जारी केलेल्या विविध फॉर्मपैकी नक्की कोणता फॉर्म कोणासाठी लागू आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

तुम्हाला आयटीआर भरणे का महत्वाचे आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा – ITR भरणे का गरजेचे आहे? – जाणून घ्या ITR भरण्याचे हे ९ फायदे

आयकर विभागातील सर्वात सोपा फॉर्म आयटीआर-१ (ITR-1) हा आहे. बर्‍याचदा करदात्यांचा, कोणत्या परिस्थितीत आयटीआर-१ फॉर्म भरता येत नाही, यामध्ये गोंधळ उडून जातो.म्हणूनच करदाते आयटीआर-१ केव्हा वापरू शकत नाहीत याची कारणे व तो कसा फाइल करावा हे आपण या लेखातून जाणून घेऊयात. 

जेव्हा करदाते ITR-1 फॉर्म भरू शकत नाहीत याची १० प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे – (ITR-1)

1. स्टॉक, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक  

 • जर एका पगारदार करदात्याने शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमद्धे गुंतवणूक केली असल्यास, ती व्यक्ती ITR-1 दाखल करू शकते. 
 • परंतु, हे शेअर्स विकले गेल्यानंतर किंवा म्युच्युअल फंडांची पूर्तता झाल्यानंतर, ती व्यक्ती ITR-1 दाखल करू शकत नाही.

2. असूचीबद्ध इक्विटी शेअर्समधील गुंतवणूक –

 • जर करदात्याकडे कंपनीची असूचीबद्ध इक्विटि शेअर्समध्ये (Unlisted Equity shares) गुंतवणूक असेल तर अशा परिस्थितीमध्ये करदात्याला त्याचा आयटीआर-1 हा फॉर्म भरून आयटीआर दाखल करण्याची परवानगी नाही. 

3. कंपनीचे संचालक –

 • करदाता एखाद्या कंपनीमध्ये संचालक या पदावर असेल, तर तो ITR-1 हा फॉर्म दाखल करू शकत नाही. 

4. हिंदू अविभक्त कुटुंब सदस्य (HUF) –

 • जर करदाता  हिंदू अविभक्त कुटुंबाचा मालक असेल तर त्या व्यक्तीला आयटीआर फायलिंगसाठी आयटीआर-1 फॉर्म वापरता येऊ शकत नाही. 

5. एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून मिळणारी मिळकत –

 • जर करदात्याकडे एकापेक्षा जास्त घर मालमत्ता असतील, तर करदात्याने आयटीआर-1 हा फॉर्म न भरता आयटीआर-2 हा फॉर्म भरावा.

6. शेतीतून मिळणारे उत्पन्न –

 • शेतीतून मिळणारे उत्पन्न हे करपात्र नसले तरीही इन्कम टॅक्स भरताना, एखाद्याचे वार्षिक उत्पन्न रु. ५००० पेक्षा जास्त असल्यास त्याचा योग्य तो अहवाल दाखल करणे आवश्यक आहे. 
 • जरी कृषी उत्पन्न करपात्र नसेल तरी, ते कर आकारणीसाठी स्लॅब दर निश्चित करण्यासाठी अनिवार्य आहे. या प्रकरणांमध्ये ITR-1 दाखल करता येत नाही. 

7. रु. ५० लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न: 

 • जर कमावणार्‍या व्यक्तीचे इतर कोणतेही उत्पन्नाचे स्त्रोत नसताना त्याचे एकूण वार्षिक उत्पन्न रु. ५० लाखांपेक्षा जास्त असेल तर अशा करदात्यासाठी ITR-2 हा योग्य फॉर्म आहे.

8. TDS पेमेंट –

 • कलम 194N नुसार, रु.१कोटींच्या मर्यादेपेक्षा जास्त कोणत्याही बँक किंवा पोस्ट खात्यातून पैसे काढल्यानंतर त्यावर TDS कापला गेला असेल, तर करदात्याला हा फॉर्म भरता येत नाही. 

 

9. विदेशी मालमत्तेचा हक्क –

 • जर कमावणारी व्यक्ती आयटीआर-1 साठी सर्व निकष पूर्ण करत असेल, परंतु त्याची भारताबाहेर एखादी मालमत्तेवर मालकी हक्क असेल, तर करदाता आयटीआर-1 दाखल करु शकत नाही. 

10. फ्रीलान्सिंगमधून मिळणारी मिळकत –

 • बर्‍याचदा सॉफ्टवेअर व्यावसायिक आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी मोकळ्या वेळेत फ्रीलान्सर म्हणून काम करतात. 
 • शेवटी फ्रीलान्सिंग म्हणजे एक व्यवसायच आहे व याद्वारे मिळणारे उत्पन्न म्हणजे व्यवसायातून मळणारे उत्पन्न. यामुळे अशा प्रकरणांमध्ये कोणतीही फ्रीलान्सर म्हणून काम करणारी व्यक्ती आयटीआर-१ दाखल करू शकत नाही. 

आयटीआर -१ फाइल करण्याच्या सोप्या स्टेप्स – (ITR-1 Filing)

पायरी १ –

 • आयकर विभागाच्या  http://incometaxindiaefiling.gov.in/  या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा पॅन नंबर म्हणजेच तुमचा युझर आयडी वापरुन तुमचं लॉग इन बनवून रजिस्ट्रेशन करावं लागेल. 

पायरी २ –

 • यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता विचारणारा पर्याय येईल. त्यापैकी पॅन डेटा निवडल्यास तुमचं प्रोफाईल आपोआप अपडेट होईल. 
 • यानंतर तुम्हाला फॉर्म 16 मधील पार्ट B मध्ये असलेला करपात्र उत्पनाचा तपशील भरायचा आहे. 

 

पायरी ३ –

 • Sections 80C या पर्यायामधे तुम्हाला फॉर्म 16 मध्ये Sections 80C मध्ये केलेली एकूण गुंतवणूक एकरकमी लिहावी लागेल. 
 • जर तुम्ही NPS म्हणजेच ‘नॅशनल पेन्शन स्कीम’ मध्ये गुंतवणूक केली असेल, तर ती 80CCD मध्ये भरावी, ज्यामधे तुम्हाला NPS साठी ५० हजार अतिरिक्त करसवलत आहे. 

पायरी ४ –

तुम्ही भरलेल्या तुमच्या फॉर्म 16 Part A मधील कराचा तपशील दिसेल. 

 • फॉर्म 16 Part A मधील रक्कम आणि इन्कम टॅक्स रिटर्नवरील एकूण रक्कम समान असते. जर ती रक्कम समान येत नसेल, तर तुम्ही भरलेले आकडे चुकण्याची शक्यता आहे. 
 • तुमचा फॉर्म 16 जनरेट झाल्यानंतर तुम्ही काही गुंतवणूक केली असेल, तर ती माहिती इथे भरा. तुम्हाला तुमचा आयकर रिफंड मिळेल. 

पायरी ५ –

तुमच्या सर्व बँक खात्यांचा अचूक तपशील द्या. तुमचा अकाऊंट नंबर आणि IFSC कोड टाकल्यानंतर तुमचे सर्व बँक तपशील आपोआप येतील. 

पायरी ६ –

यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू दिसेल, तो बरोबर आहे का ते तपासून सबमिट करा. त्यानंतर भरलेला रिटर्न व्हॅलिडेट करा. यामध्ये तीन पर्याय असतील. 

 • प्रिंट काढून सही करुन बंगळुरुला पाठवणे.  
 • डिजिटल सिग्नेचर. 
 • आधार ओटीपी. 

यापैकी आधार ओटीपी हा सोईचा पर्याय आहे.

 

पायरी ७ –

हा ‘आधार ओटीपी’ पर्याय सिलेक्ट केल्यानंतर आधार ओटीपी नंबर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर येईल. तो सबमिट करा. 

तुमचा टॅक्स रिटर्न इन्कम टॅक्स विभागाकडे फाईल झाला असेल. 

लवकरात लवकर तुमचे आयटीआर फाईल करा आणि ते करतांना कोणत्या चुका टाळाव्यात हे समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

Leave a Reply

Your email address will not be published.