https://bit.ly/2N6PRiJ
Reading Time: 2 minutes

काही दिवसांपूर्वी व्हॉट्स ॲपवर एक मेसेज आला होता; पोळी का करपते? दूध का उतू जाते? कारण व्हॉटसॲप चालू असल्यामुळे! खरंतर हा एक विनोद होता. पण व्हॉट्सॲपवर फिरणारा प्रत्येक मेसेज हा विनोद नसतो. वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देणारे अनेक मेसेज व्हॉट्सॲपवर फिरत असतात. असे मेसेज फॉरवर्ड करण्यात काही चूक नाही. फक्त ती माहिती योग्य आणि बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय मात्र मेसेज फॉरवर्ड करु नका. सद्ध्या सोशल मिडयामुळे सगळ्यांनाच आपले विचार,  माहिती याची देवाणघेवाण करायला एक चांगलं व्यासपीठ मिळालं आहे. याचा वापर योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. मध्यंतरी व्हॉट्सॲपवर एक मेसेज फिरत होता. त्यामध्ये लिहिलं होतं, “मोटार व्हेइकल ॲक्ट, १९८८ सेक्शन १६६ नुसार जर अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीने तीन वर्षांचे टॅक्स रिटर्न्स भरले असतील तर त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना, त्या व्यक्तीच्या तीन वर्षांच्या सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या दहापट नुकसान भरपाई सरकारकडून देण्यात येते. जर त्या व्यक्तीने त्याचे इन्कम टॅक्स रिटर्न नियमित भरलेले नसतील, तर त्याला थोडी कमी नुकसान भरपाई मिळेल आणि जर रिटर्न भरलेलेच नसतील तर नुकसान भरपाई मिळणार नाही. अनेकांना हा नियम माहिती नसल्यामुळे कोणीही सरकारकडे या नुकसानभरपाईची मागणी करत नाही.”

हा मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांनो सावधान! हा अतिशय चुकीचा आणि खोटा मेसेज आहे. मोटार व्हेइकल ॲक्टमध्ये अशी कुठल्याही प्रकारची तरतूद केलेली नाही. ॲक्ट, नियम, कायदा या सगळ्या गोष्टी एकवेळ बाजूला ठेवा. जरा शांतपणे  विचार करा, आपण वर्तमानपत्रामध्ये जवळपास रोजच अपघाती मृत्यूबद्दल ऐकतो. मार्ग परिवहन आणि महामार्ग खात्याच्या सर्वेनुसार २०१७ मध्ये वाहन अपघातात मृत्यू पावलेल्या  लोकांची संख्या १,५०,००० च्या वर गेली आहे. एवढ्या सगळ्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या दहापट नुकसान भरपाई द्यायची असं ठरवलं, तर सरकारची तिजोरी काही महिन्यातच रिकामी होइल. 

मोटार व्हेइकल ॲक्ट, १९८८चा सेक्शन १६६ काय आहे ?

मोटार व्हेइकल ॲक्ट, १९८८  सेक्शन १६६ मध्ये 

  1.  अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाने नुकसानभरपाईसाठी करायचा अर्ज,
  2. त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे
  3. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 

या तरतुदी नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये कुठेही सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. 

मोटार व्हेइकल ॲक्ट, १९८८च्या सेक्शन १६६ बद्दल काही ठळक मुद्दे:

या सेक्शननुसार, जेव्हा वाहन अपघातामध्ये एखाद्या व्यक्तीचा अथवा व्यक्तींचा मृत्यू झाल्यास अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास; अपघातास कारणीभूत असलेलल्या वाहनाच्या मालकाने; अपघातग्रस्त व्यक्तीच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देणे बंधनकारक आहे.

सदर प्रकरणामध्ये नुकसानभरपाईची किंमत मोटार दुर्घटना दावा न्यायाधिकरणाद्वारे निश्चित केली जाते.
तर असा आहे  मोटार व्हेइकल ॲक्टचा सेक्शन १६६. यामध्ये सरकारकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईचा कुठेही उल्लेख केलेला नाही. अथवा टॅक्स रिटर्न भरण्याबद्दल किंवा न भरण्याबद्दलही कुठलाही उल्लेख केलेला नाही. मुळात या गोष्टींचा परस्परांशी काहीही संबंध नाही. 

अशा प्रकारचे मेसेज हे ‘इंटरनेट व्हायरस’ प्रमाणे काम करतात. अशा प्रकारच्या मेसेजेस बरोबर येणाऱ्या वेगवेगळ्या लिंक्स क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलमध्येही व्हायरस शिरु शकतो. तेव्हा असे मेसेज आल्यास सावध व्हा. त्यामधील सत्यता पडताळून पहा आणि योग्य वाटला तरच पुढे पाठवा. सावध व्हा, सतर्क रहा!

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutesगर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesमागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते…

Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutesगुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.