बिटकॉइन
Reading Time: 3 minutes

बीटकॉईन

२०१५ मध्ये २६६ डॉलरला एक ते आज ६६ हजार डॉलरला एक बीटकॉईन, हा आहे बीटकॉईनच्या किंमतीचा सहा वर्षांतला प्रवास. आणि मध्ये प्रचंड चढउतार. ज्याला हे हेलकावे झेपतात, त्यांनी बीटकॉईनच्या गुंतवणुकीत पडावे. ज्याला ही जोखीम पेलवणार नाही, त्याने अशा गुंतवणुकीत अजिबात पडू नये. 

बीटकॉईनचा अवतार जगात येवून आता एक तप पूर्ण झाले आहे. सरकारचा पाठिंबा नसलेले हे आभासी चलन कसे चालेल, त्याच्यावर लोक कसा विश्वास ठेवतील, असे अनेकांना वाटत होते. त्यामुळे त्यात भाग घेणाऱ्यांची संख्या याकाळात कमीच राहिली. पण ऑक्टोबरमध्ये काही घटना अशा घडत आहेत की बीटकॉईन किंवा क्रीप्टोकरन्सी नावाने माहिती झालेली ही आभासी चलने जगातील अधिकाधिक लोक स्वीकारताना दिसत आहेत. सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदारांनी याकडे वळावे की नाही, हा मोठाच पेच आहे. पण त्यापूर्वी बीटकॉईनच्या जगात सध्या काय चालले आहे पहा. 

हे नक्की वाचा: Bitcoin currency: बिटकॉइन चलन की मालमता? 

बीटकॉईनच्या किंमतीचा विक्रम

  • गेल्या गुरुवारी म्हणजे २१ ऑक्टोबर रोजी बीटकॉईनची किंमत एका बीटकॉईनला ६६ हजार डॉलर एवढी विक्रमी झाली होती. त्याला एक निमित्त झाले. 
  • अमेरिकेत बीटकॉईनचा एक्सचेंज ट्रेडेड फंड (म्युच्युअल फंड सारखा) जाहीर झाला आणि त्याला सरकारची मान्यताही मिळाली. 
  • याचा अर्थ असा की अमेरिकन नागरिक आता शेअर बाजारासारखे बीटकॉईनचाच्या गुंतवणुकीवर तुटून पडणार. 
  • आर्थिक जगाचे नेतृत्व करणाऱ्या अमेरिकेच्या या फंडामुळे बीटकॉईनच्या अस्तित्वाला अधिकृत स्वरूप मिळाले आहे. म्हणजे असे फंड जर इतर देशातही निर्माण झाले तर बीटकॉईनचे ट्रेडिंग जगभर वाढत जाणार आणि त्याची किंमतही. 

भारतीय स्वीकारतील का ? 

  • विकसित जगातील गुंतवणूकदारांना शेअर बाजार आणि त्यावर आधारित आर्थिक उत्पादने नवी नाहीत. तेथील निम्म्यापेक्षा अधिक जनतेची गुंतवणूक त्या उत्पादनांत आहे. त्या तुलनेत भारतीयांनी अजून शेअर बाजाराचाही स्वीकार केलेला नाही. मग ते बीटकॉईन स्वीकारतील का? असा प्रश्न आपल्या मनात येवू शकतो. पण आकडेवारी असे सांगते की भारतीयही त्यात भाग घेवू लागले आहेत. 
  • भारताची लोकसंख्या प्रचंड असल्याने भाग घेणाऱ्या नागरिकांची टक्केवारी खूप कमी असते, पण ती कमी असूनही अनेक विकसित देशांच्या तुलनेत ती अधिक ठरते. त्यामुळेच टक्केवारीच्या दृष्टीने कमी असूनही गेल्या काही दिवसांत बीटकॉईनच्या ट्रेडिंगचे भारतातील मूल्य १०० टक्के वाढले असल्याचे बीटकॉईन एक्स्चेंजेसनी म्हटले आहे. 
  • बीटकॉईनच्या किंमती वाढल्यामुळे त्याचे जगातील मूल्य आता २.६ ट्रिलीयन डॉलर झाले आहे. याचा अर्थ ते आता भारताच्या जीडीपीशी स्पर्धा करू लागले आहे. बीटकॉईनचे मूल्य गेल्या १२ वर्षात एवढे होण्याची ही पहिलीच वेळ होती. बीटकॉईनच्या किंमतीत असलेली प्रचंड वधघट लक्षात घेता आता म्हणजे २४ ऑक्टोबर रोजी ते ४९ लाख रुपयांवरून ४५ लाख रुपये इतके खाली आले आहेच. 

महत्वाचा लेख: बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान

२६६ डॉलर ते  ६६ हजार डॉलर!

  • भारतातील उच्च उत्पन्न गटातील बहुतेक नागरिकांनी शेअर बाजार आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांमध्ये गुंतवणूक केलेली असते. 
  • हा वर्ग आर्थिकदृष्ट्या साक्षर तर असतोच, पण अतिशय सजग असतो. जेव्हा बीटकॉईनची भारतात ओळख तयार होत होती, तेव्हाच या वर्गातील अनेकांनी त्यात गुंतवणूक सुरु केली होती. 
  • बीटकॉईनच्या किंमतीतील चढउतार हा वर्ग सहन करू शकतो. 
  • २०१५ मध्ये एका बीटकॉईनचा दर होता २६६ डॉलर आणि आज आहे ६६ हजार डॉलर! अगदी गेल्या एका वर्षाचा विचार करावयाचा झाला तरी नोव्हेंबर २०२० मध्ये तो दर होता १३ हजार डॉलर आणि एकाच वर्षांत तो झाला त्याच्या पाच पट! 
  • पुढे, पुरेशी माहिती न घेता जे या गुंतवणुकीत पडले, ते नागरिक चांगलेच पोळून निघाले. पण आता काही भारतीय गुंतवणूकदार आता या गुंतवणुकीत स्थिरावले असल्याचे दिसते. कारण आता ते सारखी खरेदी विक्री न करता दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहू लागले आहेत, असे भारतातील बीटकॉईन एक्स्चेंजेसचे निरीक्षण आहे. 
  • (काही बीटकॉईन एक्स्चेंजेसची नावे अशी – मुंबई – WazirX, CoinDCX, बेंगळूरु – Coinswitch Kuber, दिल्ली – BuyUCoin.) ही नावे आपल्यासाठी आज नवी असली तरी इंग्रजी वर्तमानपत्रांच्या आर्थिक पानांवर आणि अर्थविषयक टीव्ही चॅनेलवर ती नियमित दिसू लागली आहेत. याचा अर्थ त्याला वाचक आणि प्रेक्षक आहे, असा होतो. 

बंदी घालणे, एवढे सोपे नाही

  • आता प्रश्न असा निर्माण होतो की काहीही न करता अशा पद्धतीने पैसा कमावणे, जग मान्य करणार आहे का आणि ज्याला कोणत्याही सरकारचा पाठिंबा नाही, अशा बीटकॉईन्सचे व्यवहार जगाला कोठे घेऊन जाणार आहेत? पण आर्थिक जगाला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. 
  • ती एक कमोडिटी आहे, त्यामुळे त्याच्या व्यवहारांवर बंदी घालता येणार नाही, असे न्यायालयीन निर्णय येवून गेले आहेत.  
  • भारत सरकारने त्याविषयी काळजी व्यक्त करून बंदीचा बडगा उगारला होता, पण तो चालला नाही. याचा अर्थ असा की देशांच्या चलनाशी स्पर्धा करणारी बीटकॉईन्सच्या व्यवहारांवर बंदी घालणे, एवढे सोपे नाही, हे भारताच्या आणि जगाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे भारतासह अनेक देश आपले डिजिटल चलन सुरु करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

विशेष लेख: Bitcoin: बीटकॉईनच्या ऐका हाका, पण सावधान, घाईने घेऊ नका ! 

भाग घ्यावा की न घ्यावा ? 

  • बीटकॉईन्सचे व्यवहार ही एक साखळी आहे. कोणा एका माणसाने काही गणिते संगणकावर करून ठेवली असून ती सोडवून बीटकॉईन तयार होतात. त्याला मायनिंग म्हणतात. ते त्या क्षेत्रातील काही अभियंते जगभर करत आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे हे सर्व शक्य होते. 
  • ही अशी साखळी आहे, ज्यात मानवी हस्तक्षेप करता येत नाही, असे मानले गेले आहे.
  • थोडक्यात, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा बीटकॉईन्स हा एक भाग आहे. या तंत्रज्ञानाचा बँकिंग, भूमापन अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापर सुरूही झाला आहे. 
  • इंटरनेटने जसे जग बदलले, तसाच एक मोठा बदल हे तंत्रज्ञान करण्यास सज्ज झाले आहे. त्यामुळे त्यातील फक्त बीटकॉईन्सला नकार देता येणार नाही, असे आज जगाने ठरविलेले दिसते. 

थोडक्यात, त्याचे अस्तित्व आपल्याला मान्य करावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्या किंमती वाढत जाणार, त्याचे ट्रेडिंग होत राहणार, त्यावर सट्टा खेळला जाणार, हे ओघाने आलेच. आपण त्यात पडायचे की नाही, याचे एकच उत्तर आज दिले जाऊ शकते, ते म्हणजे ज्याला त्यातील जोखीम मान्य आहे, त्याने भाग घ्यावा. ज्याला मान्य नाही, त्याने भाग घेऊ नये. नाहीतरी शेअर बाजार आणि कमोडिटी बाजारातील ट्रेडिंगमध्येही जोखीम असताना ते करणारे लोक आहेतच की ! 

– यमाजी मालकर 

[email protected] 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…