Term and Health Insurance
जाणून घ्या टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स मधील फरक
कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे ही कुटुंबातील कमावत्या व्यक्तीची जबाबदारी असते. विमा संरक्षण अनपेक्षित घटनेमध्ये आर्थिक कवच म्हणून काम करते यामुळे विमा संरक्षण असणे महत्त्वाचे झाले आहे. आपल्यासाठी व आपल्या परिवारासाठी जास्तीत जास्त संरक्षण प्रदान करणारी विमा योजना खरेदी करण्यास ग्राहकांची पसंती असते. परंतु बहुतेक ग्राहकांना मुदत विमा व आरोग्य विमा यातील फरक गोंधळात टाकतो. यामुळे योग्य विम्याची निवड करणे कठीण जाते. विमा खरेदी करण्यापूर्वी या दोन्ही विम्यांमधील मूलभूत फरकाची माहिती असणे आवश्यक आहे.
हेही वाचा – Health Insurance Policy: आरोग्य विम्याच्या सहाय्याने हॉस्पिटल खर्च वाचवण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्स…
मुदत विमा-परिवाराची सुरक्षितता सर्वांसाठीच महत्त्वाची असते. यासाठी सर्वजण प्रयत्नशील देखील असतात. परंतु कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर कुटुंबातील सदस्यांना आर्थिक कमतरता भासू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी मुदत विमा योजना असणे महत्त्वाचे आहे. मुदत विमा पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर पॉलिसी धारकाच्या कुटुंबास आर्थिक संरक्षण प्रदान करते.
आरोग्य विमा- आज-काल आरोग्य संबंधीच्या तक्रारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आपण कितीही खबरदारी घेतली तरीदेखील कधी ना कधी आरोग्य संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. परंतु वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महाग होत आहे. अशा परिस्थितीमध्ये आर्थिक अडचण भासू नये यासाठी आरोग्य विमा असणे फायदेशीर आहे. आरोग्य विमा योजना पॉलिसीधारकाला भरलेल्या प्रीमियमच्या बदल्यात वैद्यकीय खर्चामध्ये आर्थिक सुरक्षा प्रदान करते. संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विमा खरेदी करून अनपेक्षित वैद्यकीय स्थितीमध्ये आर्थिक संरक्षण घेऊ शकतात.
मुदत विमा व आरोग्य विमा यामध्ये काय फरक आहे?
- मुदत विमा योजनेमध्ये पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर पॉलिसी धारकाच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण दिले जाते.
तर आरोग्य विमा योजनेमध्ये पॉलिसीधारकाच्या वैद्यकीय खर्चामध्ये आर्थिक संरक्षण दिले जाते.
- मुदत विम्या अंतर्गत पॉलिसी कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला विम्याची रक्कम मिळते.
तर आरोग्य वीमा अंतर्गत पॉलिसीधारकला किंवा विमाधारक परिवारातील सदस्यांना वैद्यकीय उपचार, हॉस्पिटलायझेशन इत्यादी वैद्यकीय खर्च मध्ये आर्थिक संरक्षण मिळते.
हेही वाचा – Life Insurance FAQ: जीवनविमा खरेदी करताना पडणारे ६ मूलभूत प्रश्न …
- मुदत विम्यामध्ये कमीत-कमी प्रीमियम धरून जास्तीत-जास्त विमा संरक्षण मिळते.
तर मुदत विम्याच्या तुलनेत आरोग्य विम्याचा प्रीमियम महाग वाटू शकतो. तरुण वयात सहसा आरोग्य निरोगी असल्याने प्रीमियम कमी असतो त्यामुळे कमी वयात प्रीमियम खरेदी करणे फायदेशीर ठरते.
- मुदत विमा योजनेअंतर्गत नो- क्लेम बोनस लाभ मिळत नाही.
तर आरोग्य विम्यामध्ये नो-क्लेम बोनस लाभ मिळू शकतो,त्यामुळे मागील वर्षी कोणतेही दावे केले नसतील तर प्रीमियमची रक्कम कमी होऊ शकते.
- मुदत विमा योजनेमधील भरलेल्या प्रीमियम वर आयकर कायदा कलम ८०सी अंतर्गत कर लाभ सुविधा मिळते.
तर आरोग्य विमा योजना अंतर्गत पॉलिसी धारकासाठी त्याच्या कुटुंबासाठी तसेच वृद्ध पालकांसाठी भरलेल्या प्रीमियम वर आयकर कायदा कलम ८०डी नुसार कर लाभ उपलब्ध आहेत.
हेही वाचा – Health Insurance Review: आरोग्य विम्याचे पुनरावलोकन करणे आवश्यक असते का?…
मुदत विमा व आरोग्य विमा यामधील फरक पाहिला असता त्यांचे वेगळे फायदे आहेत हे लक्षात घेऊन आपल्यानंतर आपल्या कुटुंबाच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी मुदत वीमा महत्त्वाचा आहे तर आपल्या व आपल्या कुटुंबाच्या अनपेक्षित वैद्यकीय खर्चामध्ये आर्थिक संरक्षणासाठी आरोग्य विमा उपयोगी ठरतो. म्हणून भविष्यात आर्थिक बॅक-अप असणे गरजेचे आहे हा विचार करून आपला विमा पोर्टफोलिओ अधिक सुरक्षित करण्यासाठी योग्य निवड करून तुम्ही तुमच्या व तुमच्या परिवाराची भविष्यातील आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करू शकता.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies