Financial freedom
Financial freedom
Reading Time: 3 minutes

Financial Freedom

आज आपल्यातील प्रत्येकजण काही ना काही करून पैसे कमवत असतो. जॉब असो किंवा बिजनेसकोणत्या ना कोणत्या पर्यायाचा निवड करून आपण आर्थिक उलाढाल करतो. पैसे कमावण्यासोबतच त्याची बचत करणेही तितकेच गरजेचे असते. आपल्यातील कित्येकांना पैशांची बचत आणि स्वातंत्र्य(मोकळीक) याबद्दल माहीतही असते. माहित जरी असले तरी त्यावर अंमलबजावणी करणे तितकेच कठीण जाते. 

आर्थिक स्वातंत्र्याची व्याख्या नेमकी काय ? हे देखील आपल्याला  माहित असणे गरजेचे आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्याकडील पैशांवर आपण ठेवलेले नियंत्रण!

आपल्या दैनंदिन गरजा, कर्जे, खर्च या गोष्टींसाठी उत्पन्नाचे चांगले स्रोत निर्माण करणे, शांतीपूर्ण परंतु साधे जीवन जगणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करणे, कर्ज मुक्त असणे आणि कोणत्याही कर्जाशिवाय जगणे यालाही आपण आर्थिक स्वातंत्र्य म्हणू शकतो.

हेही वाचा –  John C. Bogle Quotes : वाचा जॉन बोगल यांची गुंतवणूकसंदर्भातील प्रसिध्द विधाने

आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी याटीप्स करा फॉलो

पहिले तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आर्थिक स्वातंत्र्य हे काही एका दिवसात साध्य करता येणारी गोष्ट नाही. यासाठी आपल्या बराच वेळ द्यावा लागतो. सातत्य, नियोजन, पैशांची काटकसर आणि ठेवलेल्या आर्थिक अंमलबजावणी हे सूत्र आर्थिक स्वातंत्र्यासाठी आपल्याला मांडावे लागणार आहे.

१. खर्चावर नियंत्रण ठेवा !

बऱ्याच जणांचे आपल्या दैंनदिन खर्चाच्या बाबतीत लक्ष नसते. खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आपण एखाद्या मोबाईल ऍपचा देखील वापर करू शकतो. मिंट, खाताबुक यांसारखे अप्लिकेशन्स आपण खर्च लिहण्यासाठी वापरू शकतो. यामुळे आपण दिवसाला किंवा महिन्यात किती खर्च करतो हे लक्षात येईल. यासोबतच जर एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला वेगळी रक्कम बाजूला टाकायची असेल तर लक्ष्य म्हणूनही आपण या ऍपमध्ये टाकू शकतो. यावरून एक नियोजन करता येऊ शकते आणि पैशांची बचत होऊ शकते. एक योग्य रक्कम आपण याद्वारे महिन्याकाठी बाजूला काढू शकतो.  

२. खर्चासाठी एक बजेट ठरवून घ्या.

आपण जो काही खर्च करतो त्याचे एक बजेट असले पाहिजे, मग तो दिवसाचा असो किंवा आठवड्याचा असो, एक निश्चित रक्कमच आपण खर्च करणार आहोत अशी सवय लावून घेतली पाहिजे. खर्चासाठी बजेट केल्यामुळे आपल्याला आपला खर्चाचा आवाका लक्षात येऊ शकतो. यामुळे आपण बचत कुठे करू शकतो हे देखील लवकर समजेल.

हेही वाचा –  Unicorn Startup : युनिकॉर्न स्टार्टअप म्हणजे काय रे भाऊ? 

३.उत्पन्नाचे स्रोत वाढवा.

आपल्यातील काही जण नोकरी करतात किंवा व्यवसाय करतात. एक चांगली रक्कम आपल्याला मिळत असेल तर आपण थोडे आळशी होतो. एक लक्षात घेतले पाहिजे की नेहमी आपण उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यावर भर दिला पाहिजे. एका पेक्षा जास्त आर्थिक स्रोत असलेच पाहिजे असं कित्येक सर्व्हेंमधून समोर आलेलं आहे. उदाहरणार्थ आपण शॉपिंग साईट्स वर काही विकू शकतो. पार्ट टाईम जॉब किंवा आवडते काम करू शकतो. एफिलिएट मार्केटिंग, डिजिटल ,मार्केटिंग, ब्लॉगिंग, कंटेन्ट राईटींग, भाडे उत्पन्न, समभाग (Stocks) किंवा म्युच्युअल फंडाद्वारे लाभांश उत्पन्न, कोचिंग यापैकी आपल्या जे आवडेल ते आपण नक्कीच करू शकतो. उत्पन्नाचे स्रोत वाढल्यामुळे आपल्याला निश्चितच चांगला फायदा मिळतो आणि आर्थिक आवकही वाढते. ह्या सगळ्या गोष्टी आपण एकाच दिवसात करू शकत नाही हे देखील आपण लक्षात घ्यायला हवं. 

४. कर्ज फेडणे

कर्ज लवकरात लवकर फेडणे ही एक चांगली सवय आहे. जर आपल्याकडे ५० हजारांचे कर्ज आहे आणि आपल्याकडे ३० हजार रोख आहे तरी आपण आर्थिकदृष्ट्या मुक्त नसतो. आपल्याला २० हजारांचे देणे असते हे देखील समजायला हवं. कर्जापासून जो पर्यंत मुक्ती होत नाही तो पर्यंत फालतू चैनीचे खर्च करणे आपण टाळले पाहिजे. यासोबतच कर्ज फेडतानाही आपण काही रक्कमेची बचत करायला हवी. यामुळे कर्ज मुक्त झाल्यानंतर बँकेत आपली चांगली रक्कम जमा होऊ शकते.

५. भविष्यासाठी  गुंतवणूक करा.

वर्तमानकाळात जगत असताना आपल्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी आपण गुंतवणूक करायलाच हवी. त्यासाठी आपण महिन्याला एक विशेष रक्कम बाजूला काढू शकतो. म्युच्युअल फंड्स, स्टॉक मार्केट, बॉण्ड्स, पॉलिसी यांसारख्या गोष्टींमध्ये आपण गुंतवणूक करायला हवी.  जेणेकरून आपले पैसे झोपेतही वाढू शकतात. आपत्कालीन निधी, सेवा समाप्ती निधी(retirement funds), आरोग्यविमा यांसारख्या गोष्टींसाठी आपण महिन्याला पैसे बाजूला काढायलाचं हवे. आपत्कालीन निधी आपल्याला संकटकाळी आधार देतो. आरोग्यविमा आजारपणात आपले लाखांमध्ये पैसे वाचवू शकतो. या गोष्टींकडे आपण वेळोवेळी लक्ष दिले पाहिजे.

६. रोख रक्कमेचा वापर करणे.

सध्या डिजिटल युगाला सुरुवात झालेली आहे. एका क्लिकवर आपण पैसे पाठवतो किंवा घेऊ शकतो. मात्र यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की पैसे लवकर खर्च होतात. कुठंही गेलो तरी जर समजा खिशात पैसे नसतील तर आपण नुसतं क्लिक करून बिल भरू शकतो. यामुळे कधी कधी पैसे नसतानाही आपला खर्च होता. खर्चावर कुठंतरी यामुळे नियंत्रण राहत नाही. यामुळे शक्यतो आपण रोख रक्कम ठेऊनच बाहेर पडायला हवं जेणेकरून जास्तीचा खर्च होणार नाही.

हेही वाचा –  Open Network for Digital Commerce : एक महत्वाकांक्षी व्यासपीठ – ओपनमार्केट नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स

  • आयुष्य हे क्षणभंगुर आहे. पैसे कमवत असताना आपण आपल्या जवळच्या लोकांनाही तितकंच जपायला हवं. आपल्या कुटुंबियांसोबत, मित्रपरिवारासोबत आपण नक्कीच वेळ घालायला हवा. 
  • काही गोष्टी आपल्याला एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी मदत करू शकतात. सिनेमा, छोटी पार्टी,ट्रिप अशा गोष्टींमध्ये देखील आपण थोडासा खर्च केला तर आपल्याला समाधानही मिळते. आर्थिक स्वातंत्र्यसोबत आपण समाधानही मिळवू शकतो हे लक्षात ठेवा. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutesआर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

करोडपती कसे व्हावे?

Reading Time: 4 minutesमाझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती…

Education – नामांकन : गरज की आवश्यकता ?

Reading Time: 3 minutesतुम्ही निवडलेली एखादी व्यक्ती जी तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेची उत्तर अधिकारी असेल.…

डिजिटल रुपया म्हणजे काय ? घ्या समजून

Reading Time: 2 minutesडिजिटल रुपया म्हणजे काय आणि त्याचा व्यवहारात उपयोग कसा होईल याची उत्सुकता…