Reading Time: 2 minutes

आज पॅन कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे अनिवार्य आहे. पॅन कार्ड फक्त कर भरणाऱ्यांसाठीच नाही तर सामान्य नागरिकांकडे देखील असणे आवश्यक आहे. कार लोन, होम लोन असेल अथवा कोणताही मोठा व्यवहार असेल तर तेथे पॅन कार्ड देणे गरजेचे असते. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर नवीन पॅन कार्डसाठी ऑफलाइन अथवा ऑनलाइन देखील अर्ज करता येतो. तसेच पॅन कार्डमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरूस्त करण्यासाठी देखील ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

पॅन कार्डमधील चुका दुरूस्त करण्याची आवश्यकता:-

पॅन कार्डमध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरूस्त करणे आवश्यक आहे. काही वेळेस नाव, जन्मतारखेमध्ये चुक होऊ शकते. अशा वेळेस त्या चुका दुरूस्त करणे गरजेचे आहे. जर पॅन कार्डमध्ये एका अक्षराची जरी चुक असेल तर पॅन कार्ड अमान्य ठरू शकते.

दुसरे पॅन कार्ड बनवणे गुन्हा:-

जर पॅन कार्डमध्ये काही चुका असतील अथवा पॅन कार्ड हरवले असेल, तर दुसरे पॅन कार्ड काढण्याची चुक करू नये. यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. जर एका पेक्षा अधिक पॅन कार्ड असेल तर,  भारतीय आयकर आधिनियम, १९६१ च्या कलम २७२/ब नुसार १० हजार रूपयांचा दंड भरावा लागू शकतो. दोन पॅन कार्ड असतील तर पॅन कार्ड ऑनलाइन देखील जमा करता येते.

( https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html ) या लिंकवर दुसरे पॅन कार्ड जमा करता येईल.

पॅन कार्ड मधील चुका कशा दुरूस्त  कराल ?

– पॅन कार्डमध्ये बदल करण्यासाठी किंवा नवीन बनविण्यासाठी NSDL अथवा UTITSL वेबसाइट वर जावे लागेल.

–  वेबसाइटवरील पॅन कार्ड चुका दुरूस्तीसाठी असलेल्या लिंकवर क्लिक करावे.

– त्यानंतर पुढील पेजवर तुमची माहिती मागितली जाईल. तुम्हाला ज्या पॅन कार्डमध्ये बदल करायचा आहे तो पॅन नंबर भरणे आवश्यक आहे.

– समोर (*) चिन्ह असलेली माहिती भरणे आवश्यक आहे.

–  ज्या माहितीमध्ये बदल करायचा आहे, त्याच्या समोरील बॉक्समध्ये टिक करावे लागेल. जर पॅन कार्ड पुन्हा बनवायचे असेल तर कोणत्याही बॉक्समध्ये टिक करण्याची गरज नाही.

–  बदल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन जमा करावी लागतील.

– सर्व माहिती जमा केल्यानंतर त्यासंबंधीची पोच (Acknowledgement) मिळेल. यामध्ये १५ आकडी युनिक Acknowledgement Number असतो. हा नंबर संभाळून ठेवणे गरजेचे आहे.

– या नंबरवरून पॅन कार्ड कोणत्या प्रोसेसमध्ये आहे ते ट्रॅक करता येते.

यासाठी किती रूपये भरावे लागतील ?

  • पॅन कार्ड बनविण्यासाठी अथवा चुका दुरूस्त करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करता येते. जर तुम्हाला ई-पॅन म्हणजे ऑनलाइनच पॅन कार्ड हवे असेल तर त्यासाठी कमी पैसे भरावे लागतील. ई-पॅन (E- PAN) तुम्ही दिलेल्या मेल वर मिळेल. यासाठी तुम्हाला ६६ रूपये भरावे लागतील.
  • जर तुम्हाला हार्ड कॉपी स्वरूपात म्हणजे तुमच्या पत्त्यावर पॅन कार्ड हवे असेल तर १०१ रूपये भरावे लागतील. जर तुमचा पत्ता भारताच्या बाहेरील असेल तर त्यासाठी तुम्हाला १०११ रूपये भरावे लागतील.

पॅन कार्डचे बदलेले महत्वाचे नियमतुमचंही पॅनकार्ड रद्द झालंय का? लगेच तपासा काही मिनिटांत.. ,

सोने खरेदीविक्रीवर पॅनकार्ड अनिवार्य

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.