Reading Time: 2 minutes
 • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आयकर रिटर्न्स भरण्यासाठी आधार बरोबर (PAN) परमनंट अकाऊंट नंबर जोडणे अनिवार्य आहे. त्यामुळे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना न जोडल्यास संबंधितांचे पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.
 • न्यायमूर्ती ए. के. सिक्री आणि एस. अब्दुल नाझीर यांनी हा निर्णय आयकर कायद्याच्या कलम १३९ AA  नुसार घेतला असून आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना जोडण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत आहे. आधार कार्ड पॅन कार्डशी सलंग्न होण्याची अंतिम मुदत जवळ आलेली असताना अद्याप पन्नास टक्के पॅनकार्डधारकांनी हि प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
 • सीबीडीटीचे प्रमुख सुरेश चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने आजपर्यंत ४२ कोटी पॅनकार्डांचे वितरण केले आहे आणि त्यापैकी फक्त २३ कोटी पॅनकार्डधारकांनीच आतापर्यंत आधार-पॅनकार्डशी संलग्न केले आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाच्या ‘आधार- पॅन कार्ड संलग्न ‘ या निर्णयामुळे बोगस पॅनकार्डधारकांना ओळखणे सोपे जाणार आहे. आयकर रिटर्न्स भरण्यासाठी आणि पॅनचे वितरण करण्यासाठी आधार अनिवार्य राहील.
 • सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या देशात ७.५ टक्के आर्थिक विकास दर केवळ १.५ लाख रिटर्न्स दराने १ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न दर्शवित आहे. ही एक अतिशय खेदजनक बाब आहे की, ‘या देशात जीडीपी, खर्च खुप वाढत आहे, सर्व 5 स्टार  हॉटेल्स भरले आहेत , परंतु जर तुम्ही कोणाला विचारले तर किती लोक १ कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा देत आहेत ?- खरचं ही खूप खेदजनक बाब आहे.
 • आयकर कायद्याच्या कलम १३९ AA (२) मध्ये  असे म्हटले आहे की, १ जुलै २०१७ रोजी प्रत्येक व्यक्तीला पॅन मिळाल्यास आणि आधार प्राप्त करण्यासाठी पात्रता असलेल्या व्यक्तीस आपला आधार क्रमांक कर अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे.
 • यावर्षी आतापर्यंत ६.३१ कोटी रिटर्न्स दाखल केले गेले आहेत, जे  गेल्या वर्षी दाखल केलेल्या ५.४४ कोटी व्यक्तींपेक्षा जास्त आहेत. विभागाने आतापर्यंत ९५ लाख नवीन करदाते जोडले आहेत.
 • एकदा  आधार – पॅन  लिंक केले की, आधार वापरून तुम्ही आयकर रिटर्न्सची ई-पडताळणी करू शकता आणि दोन कार्डे जोडून तुम्हाला आयकर विभागाकडे आपली आयकर पावती जमा करावी, लागणार नाही.
 • आधार कार्डसह पॅन कार्ड जोडण्याचा आणखी एक महत्त्वाचा हेतू म्हणजे दोघेही ओळखपत्र आहेत जे नोंदणी सत्यापनासाठी आवश्यक असलेला ओळखीचा पुरावा म्हणून काम करतात.
 • पॅनला आधार लिंक करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे कारण आहे की, सरकारची फसवणूक आणि कर भरणे टाळण्यासाठी एकाधिक पॅन कार्डांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना शोधणे.
 • तुमचे आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी आयकर खात्याच्या वेबसाईटच्या लिंकवर येथे क्लिक करा-  https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/LinkAadhaarHome.html?lang=eng

सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन

कसे होईल १० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त ?

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर खात्याच्या मदतीने आयटीआर फॉर्म भरणे होईल सुलभ

Reading Time: 2 minutes कर भरणाऱ्याला जो आयटीआर फॉर्म लागू होतो त्याची निवड करणे हे फॉर्म…

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.