Reading Time: 3 minutes

मागच्या लेखात क्रिकेट मधून आर्थिक नियोजनात आत्मसात करण्यासारख्या काही धड्यांबद्दल आपण चर्चा केली. त्यात आपली उद्दिष्टे ओळखणे, सुरक्षा, लवकर चांगली सुरुवात, अधिक काळासाठी टिकून राहणे आणि योग्य निवड या बाबींचा समावेश होता. आता या संदर्भात आणखी काही मुद्दे पाहूया

क्रिकेटमधून शिका आर्थिक नियोजन  – भाग १

६. योग्य नियोजन –

  • एकदा का योग्य संघाची निवड झाली की पुढचा टप्पा येतो, खेळाचे व्यवस्थित नियोजन करणे
  • नियोजन हा कुठल्याही खेळाचा एक महत्त्वाचा भाग आहे.  ज्यामध्ये आपण त्या खेळाचे, प्रतिस्पर्धी संघाचे, आजूबाजूच्या स्थितीचे व्यवस्थित आकलन करतो आणि त्या हिशोबाने आपला पवित्रा ठरवतो. योग्य खेळाडू निवडले जातात आणि नियोजनाच्या अनुसार ते आपले काम चोख बजावतात
  • हीच बाब आर्थिक नियोजनाच्या बाबतीत देखील लागू होते. एकदा का आपले आर्थिक उद्दिष्ट ठरले की आजूबाजूची स्थिती, सोबत असलेली साधनसंपत्ती, सोबत असलेले सहकारी या सगळ्याचा विचार करून उद्दिष्ट प्राप्तीचा मार्ग ठरवता येतो
  • पूर्ण विचाराअंती ठरवलेल्या मार्गावरून पुढे गेल्यास कमीत कमी जोखीम उचलून जास्तीत जास्त फायद्याचे उद्दिष्ट साध्य करता येते.

७. परिस्थितीच्या नुसार खेळणे – 

  • क्रिकेटमध्ये बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊन खेळणे फार महत्त्वाचे असते
  • उदाहरणार्थ, जर धावपट्टी काहीशी अवघड असेल आणि चेंडू वळत असेल किंवा सुरुवातीचे काही गडी वकर बाद झाले असतील, अशा वेळेला शांत राहून हळूहळू धावसंख्या वाढवणे फायद्याचे असते. अशावेळी लवकर धावसंख्या वाढवण्याच्या नादात चौकार आणि षटकार मारून कोणत्याही प्रकारे बाद होण्याचा धोका पत्करणे हे कधीही मूर्खपणाचे ठरते
  • अशाच प्रकारे वैयक्तिक आर्थिक नियोजनामध्ये चालू स्थितीचा आढावा घेऊनच पाऊले उचलणे कधीही फायद्याचे आहे.

कृष्णाकडून शिका व्यवस्थापन कौशल्याच्या या ५ गोष्टी

८. नियमांची अंमलबजावणी –

  • कोणताही सामना खेळताना तो त्या सामन्यासाठी नेमून दिलेल्या नियमांच्या चौकटीतच खेळला गेला जाणे आवश्यक असते. अन्यथा खूप मोठ्या प्रमाणावर त्याची शिक्षा ही संबंधित खेळाडूंना भोगावी लागते. खेळत असताना खूपदा समोरच्या संघातील खेळाडू एकमेकांना चुकीचे निर्णय घ्यायला प्रवृत्त करतात. अशा वेळेला जर संबंधित संघातील खेळाडूने आपले धैर्य गमावले आणि नियमाच्या बाहेर असणारी कोणतीही कृती केली, तर त्याचा फटका हा केवळ त्या एका खेळाडूला नाही, तर, संपूर्ण संघालाही बसतो
  • हाच नियम वैयक्तिक आर्थिक नियोजनातही लागू होतो. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आजूबाजूला बऱ्याचदा गुंतवणूकदार दडपणाखाली येईल असे बरेचसे घटक कार्यरत असतात. अशा वेळेला जवळचा फायदा डोळ्यासमोर ठेवून ठरलेल्या योजना अनुसार जाता गुंतवणूकदार बऱ्याचदा काहीसे गडबडीचे आणि चुकीचे निर्णय घेतात आणि नंतर त्यांना त्याचा खूप मोठा आर्थिक किंवा इतर स्वरूपाचा फटका बसतो
  • त्यामुळे आर्थिक नियोजन करताना एक शिस्तबद्ध आणि ठराविक मार्गानेच मार्गक्रमण करणे हे दीर्घकालीन फायद्याचे ठरते.

नरेंद्र मोदींचा विजय आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे १२ मूलमंत्र

९. प्रत्येक धाव महत्त्वाची असते –

  • क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आपण बऱ्याचदा बघतो की फलंदाजाने मारलेल्या प्रत्येक चौकार आणि षटकार यावर प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. पण, त्याच वेळेला धावसंख्या मजबूत करण्यासाठी आणि दीर्घकालीन फलंदाजीसाठी एकेरी आणि दुहेरी धावसंख्या सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते.
  • गुंतवणुकीच्या दृष्टीने देखील तुमच्या मनात असा विचार असेल की माझ्या हाती खूप मोठी रक्कम आल्यावरच मी गुंतवणुकीस सुरुवात करेनतर, ही संकल्पना चुकीची आहे. छोट्यात छोटी म्हणजे अगदी तुम्ही प्रतिमहिना पाचशे रुपयांनी सुरुवात करू शकता. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे अनुसरण करून छोट्यात छोट्या गुंतवणुकीवरही मोठ्या पल्यावर आपल्याला बऱ्यापैकी संपत्ती जमा करता येईल. 

१०. सामन्याचे आकलन – 

  • हार आणि जीत हा कोणत्याही खेळाचा एक अविभाज्य भागाच आहेपण हे बाजूला ठेवून प्रत्येक सामन्या गणिक प्रत्येक खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी खेळल्या गेलेल्या प्रत्येक खेळाचे आकलन करणे/ परीक्षण करणे आणि त्याचा अभ्यास करणे हे भविष्यातील सुधारणेसाठी अत्यंत महत्त्वाचे असते
  • यावरून आपल्याला या मुद्द्याचे ही आकलन करता येते की आपले नियोजन हे आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य आहे की त्यात काही किंवा पूर्णच बदल करण्याची गरज आहे. त्याच अनुसार प्रत्येक गुंतवणूकदाराने गुंतवणूक करण्यापूर्वी आणि गुंतवणूक केल्यानंतर सुद्धा आपण निवडलेल्या किंवा आपल्या मनात असलेल्या स्कीमचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ आणि त्याचा प्रवास नियमितपणे तपासले पाहिजेत. 
  • जर एखाद्या गुंतवणुकीतून सातत्याने कमी परतावा होत असेल तर अशा प्रकारच्या गुंतवणुकीला पर्यायी गुंतवणूक देखील शोधणे गरजेचे आहे.

ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र

अशाप्रकारे आपण क्रिकेटचा सामना आणि वैयक्तिक आर्थिक नियोजन यांच्यामधील काही समान दुवे पाहिल आपल्या लक्षात आले असेलच की दोन्ही ठिकाणी एक खेळाडू या नात्याने आपले उद्दिष्ट हे जिंकणे हे जरी असले तरी क्रिकेट प्रमाणेच आर्थिक नियोजनात मध्ये शिस्त नियोजन सुरक्षा आणि आजूबाजूच्या परिस्थितीचे आकलन हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.