Reading Time: 2 minutes

नमस्कार! म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, फंड मॅनेजमेंट शैली विषयी. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ११

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १२

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १३

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग १४

 • चांगला फंड कसा निवडायचा हे आपण बऱ्याच वेळा फंडाची पूर्वीची कामगिरी पाहून ठरवतो. परंतु तो पुढेही तितकाच चांगला परतावा देईल हे खात्रीने नाही सांगता येत, अशावेळी काहीवेळा आपण त्याची सातत्यता किंवा कॉन्सिस्टंसी पाहतो. तसेच बाजाराच्या उताराच्या काळात फंड मॅनेजरने कसा परतावा दिला आहे ते पाहतो. 
 • त्याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, फंड मॅनेजरची कामाची शैली. 
 • भारतात प्रामुख्याने ग्रोथ शैली किंवा व्हॅल्यू शैली या दोन शैलींमध्ये फंड मॅनेजमेंट केली जाते. 
 • ग्रोथ शैली
  • यामध्ये फंड मॅनेजर्स अशा कंपन्यांवर लक्ष ठेवतात ज्यांचे एका शेअर मागे उत्पन्न हे सरासरी उत्पन्नापेक्षा जास्त आहे.
  • बाजारामध्ये एक टर्म वापरली जाते ‘इपीएस’ म्हणजेच एर्निंग पर शेयर, ग्रोथ शैली मधील कंपन्यांची वाढ बेंचमार्क कंपन्यांपेक्षा जास्त जोमाने होते. 
 • व्हॅल्यू गुंतवणूक शैली –
  • यामध्ये फंड मॅनेजर अशा कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतो ज्यांचे ‘प्राईस टू अर्निग गुणांक’ हा सरासरी गुणांक पेक्षा कमी आहे, म्हणजे असे शेअर जे आज जरी खाली दिसत असले तरी येणाऱ्या काळामध्ये जोमाने वाढू शकतात.
  • फंड मॅनेजर फक्त हे गुणांक बघून गुंतवणूक करत नाहीत, तर आणखी काही गोष्टी जसे कंपनी प्रयोजकांचा प्रामाणिकपणा (कॉर्पोरेट गव्हर्नन्स), व्यवसाय वाढीची शक्यता (बिसिनेस  स्केलेबिलिटी) वगैरे. 
 • अल्प कालावधी मध्ये ग्रोथ शैली आणि व्हॅल्यू शैली फंडाची तुलना योग्य नाही. 
 • मात्र ३ ते ५ किंवा त्याहून जास्त कालावधीमध्ये दोन्ही शैलीनी दिलेल्या परताव्यामध्ये तुलना करू शकतो. 
 • शेअर बाजाराच्या उताराच्या काळात फंड मॅनेजर काय पावले उचलतो व आपली कामगिरी खाली पडू देत नाही याला जास्त महत्व आहे. 

दोन्ही शैलीच्या फंड मॅनेजर्सवर विश्वास ठेवून दीर्घ मुदतीसाठी शिस्तबद्ध गुंतवणूक केली, तर नक्कीच गुंतवणूकदारांना लाभ होईल. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १५

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात –  भाग १६

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १७

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १८

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

म्युच्युअल फंड सही है l

धन्यवाद!

–निलेश तावडे 

9324543832 

[email protected]

(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…